हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

शिवाजी महाराजांनी कोणत्या चुका केल्या आहेत का? असल्यास पुराव्यासह स्पष्ट कराल का?

महाराष्ट्रात एक म्हण आहे 100 वर्षांपासून , "शिवाजी महाराज यावे जन्माला, पण आपल्या नाही शेजारच्या घरात."

365 किल्ल्यांची एक ढाल बनवून काही हजारांची फौज घेऊन तीनही शाह्याना (मुघल,आदिल, कुतुब),सिद्दी, इंग्रज,पोर्तुगिज ,डच,फ्रेंच याना अवघ्या 25 वर्षात उरावर घेऊन त्याना पळो की सळो सोडले ते आपल्या सारख्या स्वाभिमानी आणि प्रगतशील समाजाची निर्माण करावी म्हणून…….

आपल्या चारित्र्यावर एकही डाग न घेणाऱ्या शिवाजी महाराजानाकाय माहीत ,आपण ज्या समाजासाठी झगडतोय तो पुढे जाऊन भ्रष्टाचाराच्या क्रमवारीत जगात पहिला असेल…अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच….

कल्याणच्या सुभेदाराची सुनेला लुगडी चोळी घेऊन मुलीप्रमाणे रवानगी करणाऱ्या ,शत्रूच्या स्त्रियांना हात काय नजर सुद्धा उचलायची नाही अशी ताकीद देणाऱ्या , तसेच बलात्कारी रांझे पाटील चे दोन हात दोन पाय तोडणार्या महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी ते झगडले आहेत तो जगात बलात्काराच्या क्रमवारीमध्ये अव्वल स्थान मिळवेल,"निर्भया " सारखे गुन्हे करतील…असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच….

400 जहाजे निर्माण करून सिंधुदुर्ग, विजय दुर्ग, सुवर्ण दुर्ग बनवून दूरदृष्टी ठेवून उच्च दर्जाचे आणि पश्चिमी ताकदीच्या हृदयात धडकी भरवणा-या आरमाराची रचना करणाऱ्या शिवाजी महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी आपण झगडतोय त्यातील सैनिक एका चिलखतासाठी आणि चांगल्या शस्त्रास्त्रांसाठी तडफेल अशी अपेक्षा त्यांनी बाळगली असेल ही त्यांची चूकच….

सर्वात उत्कृष्ट हेरखाते निर्माण करून सर्व शत्रूंना अतिशय कमी रसदेत मात देणाऱ्या शिवाजी महाराजांना काय माहीत, ज्या समाजासाठी आपण झगडतोय त्यात हेर खातेच नको म्हणणारे पंतप्रधान होतील, मुंबईतून सरळ आत येऊन शिरून शेकडो लोकांची हत्या करेल.कारगिलमधून आत येऊन 10 किलोमीटर बंकर बनवतील पण आमच्या हेर खात्याला कल्पनाच नाही…असे वाटणाऱ्या शिवाजी महाराजांची चूकच….असा खोटा आशावाद त्यांनी बाळगला असेल ही त्यांची चूकच….

असा प्रश्न आपण विचारात आहे ही आपली चूक नाही तर खरोखर महाराजांना पण कल्पना नसेल ज्या समाजासाठी त्यांनी स्वतः आणि आपले कुटुंब खर्ची घातले, त्यांना आजकाल फक्त चौथीच्या इयत्ता मधेच काही धड्यात त्यांना स्थान दिलंय, शम्भू महाराजांना 1 धडा, राजाराम महाराज आणि ताराबाईला मिळून एक धडा , पहिला बाजीरावला दोन पाने अन् उरलेले पेशवे एक पानात संपवणार आहे …… ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या असहकार आणि अहिंसा शिकवण्यास तब्बल नऊ इयत्ता खर्ची पडल्या….मोठे झाल्यावर कळते की स्वातंत्र्य मिळाले ते दुसऱ्या महायुद्ध मुळे……अशा आंदोलनामुळे नाही.

👉मोठे झाल्या वर कळते की स्वातंत्र्य मिळाले ते दुसऱ्या महायुद्ध मुळे……अशा आंदोलन मुळे नाही.

👉माळी साहेब! तुमच्या उत्तराला सलाम!!! शिवाजी महाराजांकडून काही शिकण्याऐवजी महाराजांची उणीव काढण्यात काय समाधान लोकांना लाभत असेल देव जाणो. एक गोष्ट प्रखरतेने जाणवते की महाराजांचं चरित्र एवढं महान आहे की त्यावर एखादा डाग किंवा चूक तर लांबची गोष्ट आहे एखादा चुकीचा शिंतोडा सुद्धा सुद्धा सापडणार नाही🚩🚩🚩

👉शिवाजीमहाराजांनी अहिंसेचा आणि सत्याग्रहाचा मार्ग नाही स्वीकारला हीच त्यांची मोठी चूक. नाहीतर नसते का झाले ते राष्ट्रपिता किंवा महात्मा? त्यात त्यांनी तसा मार्ग स्वीकारला असता तर भारत भारत राहिला असता का हा असा कद्रू विचार करायचा नाही. त्यांनी सर्व धर्माच्या आणि जातीच्या लोकांना त्याच मानाने वागवले ही पण त्यांची घोडचूक आहे. आता आपण त्यांची तीही चूक सुधारत असून ह्या सर्व गोष्टीत एकमेकांशी भांडत आहोत हे अतिशय चांगले झाले.

👉अष्टप्रधान मंत्री नेमले त्यात 7 ब्राह्मण नेमून त्यांनी जणू शाहू महाराज समोर आदर्श ठेवला व त्यामुळे शाहु महाराजांनी पेशवे नेमले ब्राह्मणांवर जरा जास्तच विश्वास ठेवला… . …

👉शेजारच्या घरात जन्म घ्यावा ही म्हण शहीद भगतसिंगांशी संबधीत आहे कारण आपला मुलगा शहीद व्हावा असे कुणाला वाटत नाही. छत्रपती शिवाजी महाराज तर घरा घरात जन्माला यावे असे वाटते कारण ते राजे होते.

👉Prataprao Gujar sarakhya senapatila atmaghat karanyapasun thopvile nahi he chukiche vatate

👉बहलोल खान ला सोडून दिल्या बद्दल शिवाजी महाराजांनी त्यांना खडसावले होते . शिवाजी महाराज आणि प्रतापसिंग गुर्जर हे त्यावेळी दूर अंतरावर वर होते . त्यामुळे फक्त पत्रव्यवहार झाला होता . त्यामुळे रागावून त्यांनी हे पाऊल उचलले . आणि अनर्थ झाला. यात शिवाजी महाराजांची चूक असेल असं मला नाही वाटत. बहलोल खान ला सोडून प्रतापरावानी वमहाराजांना होत

♨️प्रथम मला श्री छत्रपती शिवाजी महाराज जे काही समजले ते थोडक्यात सांगू इच्छितो (मुळातच ज्या ज्या गोष्टी संशोधनात पुढे येत आहेत त्यावरून महाराज कोणालाच कळणे शक्य नाही, त्यांची व्याप्ती एका ब्रहामांडा एवढी असेल असं वाटतं) आणि मग मुख्य प्रश्नाकडे वळतो: म्हणजे उत्तर देण्याची आपली सर्वांची नक्की पात्रता आहे की नाही हे समजेल. पुराव्यासह चुका मागण्याचे प्रयोजन नक्कीच कुजक्या आणि वाईट हेतुपुरसस्पर असेल वाटतं, असो सर्व उत्तरे वाचून मी माझं मत मांडत आहे.

मी मूळचा पश्चिम महाराष्ट्रातील, आणि अगदी लंगोटी वापरत असल्यापासून महाराजांचं नाव कानी, ध्यानी, मनी आहे. मग शिवजयंती साठी ठराविक किल्ल्यांवर ज्योत आणण्यासाठी जायचो, नवरात्रात नऊ दिवस पहाटे महाराजांचा जयघोष करत फेरी काढायचो, शिवजयंती मध्ये नाचायचो पण खरे शिवाजी महाराज तोपर्यंत समजलेच नव्हते, परंतु जेंव्हा जेंव्हा शिवाजी महाराज हे नाव घेतलं जायचं तेंव्हा तेंव्हा आपोआपच रक्त सळसळत होत अंगावरती काटा यायचा (आत्तपण हे सगळं होतं). जसं मी अभियांत्रिकी ला प्रवेश घेतला, तेंव्हा मला या सर्वाच्या मुळात जायची इच्छा झाली. आणि वाचन, ऐतिहासिक स्थळांना भेटी, थोरामोठ्यांच्या कथा ,गोष्टी, शिवकालीन पत्रांचा अभ्यास, शिव इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांशी संवाद हे सगळं सुरू झालं. सुदैवाने कॉलेज पण किल्ले पन्हाळगड परिसरात होते.

महाराज: एक विलक्षण महा तेजस्वी सुर्य आहेत, आणि त्यांनी घडवलेले सरदार, मावळे, सामान्य लोक हे असंख्य ताऱ्यांप्रमाने त्यांच्या भोवती भ्रमण करतात, आपल्या कडे खूपच तुरळक माहिती उपलब्ध आहे. खरे शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील या भोवतालच्या लोकांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. मुघलांनी रायगड ताब्यात घेतल्यानंतर रायगडाचा दफ्तर खाना जाळून टाकला त्यातच बरीच माहिती वाया गेली . महाराजांनी जे पत्र व्यवहार केले त्यातूनच ही आताची माहिती उपलब्ध आहे. महाराज : विषयच अफाट असल्याने कृपया संयम बाळगा.

३५० वर्षाच्या काळोखातून एक प्रकाशाचा झोत असा येतो की अख्खा काळोख चं नाहीसा होतो. रोज रोज मरणाऱ्यांसाठी, आत्मविश्वास गमवून बसलेल्यांसाठी महाराज हे एक खूप मोठे आशेचे किरण होते. अगदी स्वतः ला अतिउच्च समजणाऱ्या काशीपंडित सुद्धा दिल्लीच्या बादशाह हाच भविष्य असून त्याच्या नावाने अभिषेक घालून लोकांना समर्पण करण्यास सांगत होते, अश्या परिस्थितीत असा एक सूर्य येतो आणि अन्याय करणारे, बलात्कारी, देशद्रोही, ढोंगी यांना भस्मसात करतो आणि त्यांनी शिकवलेल्या स्वाभिमानाच्या जोरावर त्यांचे वंशज (त्यामध्ये सर्व महाराष्ट्र आला) २३०/२५० स्वराज्य वर्षे चालवतात .

महाराज हे एक धर्माभिमानी होते, मातृभक्त होते, आत्मविश्वासाचा परमोच्च बिंदू होते, उत्कृष्ट अभियंता, धर्मपरिवर्तन करणारे, सर्वधर्म समभाव करणारे होते, सकळगुणमंडित होते.

उदा. त्यांनी मराठा मुठीची तलवार आपल्या सैन्यामध्ये वापरण्यास चालू केली, मराठा मुठ अशी आहे की हातामधे पकडण्याच्य पुढच्या भागाचे आणि मागच्या भागाचे वजन सारखेच असते, जेणेकरून balance साधता येतो. थोडक्यात सेंटर ऑफ ग्रविटी पकडण्याच्या जागेत आल्याने चालवताना काहीच अडचण येत नाही, तसेच उंचीने मराठी लोक अफगाण, पठाण लोकांपेक्षा कमी असल्याने पात्याची उंची पण वाढवली गेली. स्वतः चा तोफखाना चालू केला, मराठी भाषेमध्ये त्याकाळचे फारसी शब्द फार असल्याने भाषा शुद्धीची चळवळ चालू करून मराठी शब्दकोश तयार केला, अशीअगणित उदाहरणे आहेत .

तर अश्या या न भूतो न भाविष्यती महापुरुष महाराज यांच्या चुकांचे आपण मोजमाप देणे म्हणजे काजव्याच्या आधारे सूर्याला प्रकाश दिल्यासारखे आहे. आणि मी या गोष्टीस माझ्या आयुष्यात पात्र नाही आणि या भूतलावर कोणीही पात्र नाही याची खात्री सुद्धा आहे. चुकांचे पुरावे मागण्यापेक्षा चांगल्या कामाचे पुरावे जमा करणे हेच समाजहित व राष्ट्रहित आहे. श्रीरामां इतके अतिउच्च पुरुषोत्तम कोणी असेल तर ते फक्त शिवाजी महाराजच .

परंतु काही समाजातील लोकांनी आपलं खोटं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी खूप प्रयत्न केले (तो काही मंडळींना अजूनही खरा वाटतो, वरील काही उत्तरात असेच लिहिले आहे). पक्षपाती इतिहास लिहून त्यात विनाकारण दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी यांना गुरु करण्यात आले. जेम्स लेन प्रकरणामध्ये त्याला मदत करणार्या लोकांच्या प्रवृतीनेच हा इतिहास लिहिला गेला आणि याला मी महाराजांवरती केलेला अन्याय समजतो.

धन्यवाद..!

तामिळनाडूतील तंजावर मधील सरस्वती महाल लायब्ररी ही आशिया खंडातील एक जुनी लायब्ररी आहे. सरफोजी राजे मेमोरियल म्यूजियम म्हणूनही ती ओळखली जाते. तिकडे छत्रपती शिवाजी महाराज यांचे बंधू व्यंकोजी राजे भोसले यांचे राज्य होते. ही लायब्ररी 16 व्या शतकात आधीच्या नायक राजांनी सुरु केली असली तरी व्यंकोजी राजेंचे वंशज सरफोजी भोसले II यांनी ती 17व्या शतकात खूप वाढवली. भूर्जपत्रे, हस्तलिखिते अशा सुमारे 60 हजार प्राचीन, जुन्या ग्रंथांचा तिथे समावेश आहे. त्यापैकी काही इंटरेस्टिंग पुस्तके तिथे डिस्प्लेला ठेवली आहेत.

सरफोजी II हे स्वतः अतिशय मोठे अभ्यासक, ज्ञानी आणि कलाकार होते. अनेक विज्ञानशाखा तसेच भारतीय भाषांबरोबरच त्यांना जर्मन, फ्रेंच, इटालियन अशा अनेक भाषा अवगत होत्या. लायब्ररी संपन्न करण्यासाठी त्यांनी उत्तरेकडील संस्कृत अध्ययन केंद्रांकडून पुस्तके मिळवणे, विकत घेणे, लिहिणे, प्रति करणे ह्यासाठी अनेक पंडितांना नोकरी दिली.

साधारण 40 हजार हस्तलिखिते ही तामिळ आणि संस्कृतमधील असली तरी 3 हजार पेक्षा जास्त मराठीतील ग्रंथही आहेत. मराठीत 1200 ग्रंथ हे मोडी लिपीतही आहेत. तेलगू, पर्शियन, उर्दू असेही ग्रंथ आहेत. मराठीत संत साहित्य आहे तसंच मराठा राज्याचे खूप मोठे रेकॉर्ड सांभाळून आहे.

विषयांचं वैविध्य प्रचंड आहे. आयुर्वेद, धन्वंतरी, मेडिकल केस स्टडी, चित्रमय बायबल, जगाचे प्राचीन नकाशे, तंजावरचे टाऊन प्लांनिंग आणि underground drainage नकाशे, व्याकरण, भाषाशास्त्र, अश्वशास्त्र, वनस्पतीशास्त्र, जीवशास्त्र, फुलपाखरे, प्राणी, पक्षी प्रकार, चित्र, शिल्प कला, संगीत अशी वेगवेगळी पुस्तके, मराठा दरबारातील भोजन कुट्टुकेलम आणि सरभेंद्र पाकशास्त्रम अशा नावाने मराठी पाककलेची दोन पुस्तके तिथे संग्रहि आहेत. प्राण्यांच्या चेहेऱ्याचे मनुष्य अशी प्रत्येक प्राण्यांच्या चेहेऱ्यावरून केलेली मजेशीर पुस्तकेही तिथे होती.

जगाचा प्राचीन नकाशा आणि अखंड भारत बघून स्वस्थ वाटलं. बरोबरच समर्थ रामदासांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वेदांत उपदेश केल्यासंदर्भातील हस्तलिखित तिथे महाराज आणि समर्थ रामदास दोघांच्या चित्रासहित डिस्प्ले केलं होतं. समर्थ रामदासांचे सतराव्या शतकातले एक चित्र तिकडे तंजावर मधल्या लायब्ररीत महाराजांच्या भावाच्या वंशजांनी अजून जपून ठेवलं आहे. बरं वाटलं. *ही त्या काळातली गोष्ट आहे जेव्हा राष्ट्रवादी तिथे पोहोचली नव्हती....*

मित्रा मी देखील त्या ग्रंथालयाला भेट दिली आहे. माझा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता, आणि मी काही राजकीय पक्ष्याचा कार्यकर्ता नाही. महाराजांनी रामदास याना गुरु राज्याभिषेकानंतर केले आधी नाही. तू एवढ्या उत्कंठेने सांगतोस तर राजवाडेंचा इतिहास वाच म्हणजे तुला कळेल. राजवाडेंच्या मते रामदास नी सांगितल्यामुळे महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, त्यांच्या भाषेत कर्ता: शिवाजी करविता : रामदास , हे तुला पटत का?. महाराजांची आणि रामदास यांची पहिली भेट १६७२ झाली, राज्याभिषेकाच्या अगोदर २ वर्षे, राज्याभिषेकाच्या प्रसंगी रामदास यांची अनुपस्थिती होती, या गोष्टी काय सांगतात. तंजावूर मधला हा पुरावा रामदास यांनी स्वराज्याच स्वप्न बघितला आणि महाराजांनी ते सत्यात उतरवलं असं सांगत नाही.

निपक्षपातीपणा ठेवून जर इतिहास लिहिला असता तर एवढे संभ्रम झालेच नसते. शाहू महाराजांच्या बाबतीत तर याहून वाईट झालं, त्यांच्याबद्दल तर आमच्याइकडे एवढ्या अश्लील अफवा आहेत कि विचारायला नको. जेंव्हा आपला वर्चस्व प्रस्थापित होत नसतं तेंव्हा त्यांची बदनामी करायची हे सूत्र आहे. यातून खुद्द शिवपुत्र संभाजी महाराज सुद्धा वाचले नाहीत. असो सूर्यावर खरकटं पाणी फेकले तरी ते पाणी जळत सूर्य गालीच्छा नाही होत. येईल हळू हळू सगळं बाहेर.

👉चूक शोधून आणखी कट कारस्थान रचायच्यात का महाराजांच्या विरोधात

♨️

शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करताना असे लक्षात येते की त्यांनी त्यांच्या जीवनात फारच कमी चुका केल्या. प्रत्येक वेळी जेव्हा त्यांनी चूक केली तेव्हा ते त्यापासून शिकले आणि पुन्हा ती कधीही केली नाही. चूक का केली गेली आणि त्याचे कारण काय होते याचे विश्लेषण त्यांनी केले.

  • पुरंदरचा तह

पहिली चूक पुरंदरचा तह मिर्झा राजा जयसिंग यांच्याशी होता. ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपले ,२३ किल्ले (काही रेकॉर्ड १९ सांगतात) औरंगजेबाला दिले. त्यांनी त्याची मनसबदारी स्वीकारली आणि औरंगजेबाला भेटण्यास आग्रा येथे गेले ज्याच्या परिणामी शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवशी संपूर्ण दरबारसमोर औरंगजेबाचा अपमान केला होता, परंतु ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी असा तह केला नाही.

  • पन्हाळ्याची लढाई

पन्हाळा किल्ल्याच्या बाबतीतही शिवाजी महाराजांनी आपले 1000 सैनिक गमावले आणि बरेच जखमी झाले. त्यांचे सेनापती नेताजी पालकर आणि त्यांच्यात काही गैरसमज होते. नेताजी काही कारणास्तव वेळेवर मजबुतीकरण प्रदान करू शकले नाहीत. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पन्हाळा किल्ल्यावर थेट हल्ला केला नाही. त्यांनी गनिमी कावा युद्धाचा उपयोग केला आणि केवळ ६० सैनिक घेऊन हा किल्ला जिंकला.

  • प्रतापराव गुजर यांचे निधन

नेताजी पालकरानंतर प्रतापराव गुजर यांना सेनापती म्हणून निवडले. एकदा प्रतापरावांनी आदिलशाही भहलोल खानचा पराभव केला. त्याने सर्व सैनिकांसह त्याला जिवंत पकडले. भहलोल खान यांनी दयेची विनंती केली आणि शिवाजी महाराजांना न विचारता प्रतापरावांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर त्याने स्वराज्यावर हल्ला न करण्याच्या कराराने व सर्व संपत्ती व शस्त्रे जप्त करून त्याला सोडले. शिवाजी महाराजांना जेव्हा हे कळले तेव्हा ते फार रागावले आणि त्यांनी प्रतापरावांना विचारले की त्यांनी कोणाच्या परवानगीने भहलोल खान पठणला सोडले? शिवाजी महाराजांना खात्री होती की भहलोल खान त्यांच्या बोलण्याशी एकनिष्ठ राहणार नाही आणि स्वराज्यावर पुन्हा हल्ला करेल. नेमके तेच घडले. आता शिवाजी महाराजांनी प्रतापरावांना सांगितले की “त्या भहलोल खानला मारून टाका किंवा अटक करा किंवा नंतर मला तुमचा चेहरा दाखवू नका”. राजा रागावला म्हणून हे शब्द खूप कठोर होते. शिवाजी महाराजांनी आपल्या जवळच्या कोणालाही असा शब्द कधी वापरला नाही. हे ऐकून प्रतापरावांना अत्यंत दोषी वाटले आणि त्यांच्या लक्षात आले की शिवाजी महाराज व स्वराज्याला आपल्या चुकीमुळे त्रास होणार आहे. प्रतापरावांना भहलोल खानचे नेमके ठिकाण कळले तेव्हा त्यांचा सोबत ६ सैनिक होते. अचानक त्याला राजाचे शब्द आठवले आणि त्या क्षणीच त्या 7 जणांनी भहलोल खानच्या 12000 सैनिकांवर थेट हल्ला केला. त्यांनी निर्भयपणे लढाई केली पण आपल्या जिवाचे बलिदान दिले. हे कळताच शिवाजी महाराज फार दु: खी व अस्वस्थ झाले. आपला एखादा रत्न गमावल्यामुळे त्याने पुन्हा कधीही अशा प्रकारचा शब्द वापरला नाही.

महाराज नेहमीच आपल्या चुकांमधून शिकले आणि पुन्हा कधीही त्या चूक केल्या नाहीत

महान राजा !!!

अशा प्रकारच्या अन्य सामग्रीसाठी माझे कोरावर अनुसरण करा Onkar Pawar

धन्यवाद!!

👉त्यांनी त्याची मनसबदारी स्वीकारली आणि औरंगजेबाला भेटण्यास आग्रा येथे गेले

ह्याचे कारण तहापेक्षा वेगळे असावे असा माझा कयास आहे. वाटाघाटी मध्ये ही बाब टाळता आली असती.

दिल्लीला जाण्याचे कारण म्हणजे उत्तर भारतीय राजे-सरदार यांच्या सोबत संबंध प्रस्थापित करणे, म्हणजे मुघल सत्ता जेव्हा उलथून पडेल तेव्हा यांचा उपयोग होईल.

👉अगदी बरोबर,

आपण आज चुका काढत आहोत, ती कदाचित पश्चात बुद्धी आहे,

प्राप्त परिस्थतीतून त्यावेळेस योग्य सुचलेले मार्ग हेच त्यावेळी योग्य मार्ग असतात. आणि महाराजांच्या चुका ह्या सदराखाली, आपण भाष्य करणे म्हणजे अतिच होईल नाही का? हे परीक्षण म्हणजे मानस शास्त्रीय दृष्टिकोनातून "the missing tile " ह्या सदराखाली घ्यायला हवे

👉पुरन्धर चा तह ही चूक नव्हे तर नाइलाज होता. गुजर यानी चुकीचा वागले होते. नेताजीनी सान्गितल्याप्रमाणे काम केले नाही. ह्यात महाराज चुकीचे वागले नाहीत. त्यानी केलेली एकच चूक म्हणजे सम्भाजीना तयार करण्याची योग्य व्यवस्था केली नाही. तिथे सुद्धा त्यांचा नाइलाज झाला. दादोजी कोन्डदेव, जीजामातान्चा अकाली निधन, परचक्राशी सलग झुन्ज . त्या युगपुरुषाला शतशः प्रणाम.

👉छान.

मला उत्तरात आवडलं कि शिवाजी महाराजांना देव बनवले गेले नाही. एवढं मोठं कार्य करताना काही निर्णय चुकणे साहजिक आहे. पण कोणत्या परीस्थितीत ह्या गोष्टी घडल्या हे आपण समजू शकत नाही.

👉पुरंदरचा तह ही महाराजांची चूक? काय बोलताय राव! राजनीतीचा भाग तरी समजून घ्यावा. अहो महाराजांच्या राजनितीमुळे याच मिर्झा राजास औरंगजेबाला तोंड दाखविण्याआधीच मरण पत्करावे लागले.

पन्हाळा युद्ध. .. लढाई म्हटले की वीर मरण येणारच. पण मराठ्यांची हजार माणसे मेली. .. ही आणखी हजार जणांचे प्राण वाचविण्यासाठी उडविलेली हूल होती.

प्रतापराव गुजर यांनी स्वतः जीव धोक्यात का घातला. हे समजत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांच्यावर फक्त राग काढला होता. त्याना दुःसाहस करायला सांगितले नव्हते. आणि तसे प्रतापराव यांनी केले नसावे. पण यात महाराज कुठे चुकले? शिवाजी महाराजांच्या चुका साक्षात परमेश्वराला सुध्दा काढता येणार नाहीत.

👉शिव इतिहासात अनेक प्रसंग होऊन गेले। काही चांगले काही वाईट। कधी यश कधी अपयश। प्रत्येक प्रसंगाकडे सगळे जण वेगवेगळ्या दृष्टीकोणाने बघतात। प्रत्येकाचे मतं सुध्दा वेगळी असू शकतात।

पुरंदर चा तह ही एक नाहीलाजने करावी लागलेली चूक आहे। महाराज एक दूरदृष्टी व्यक्तिमत्त्व होते। त्यांना सुद्धा माहीत होतं की या चुकीचे परिणाम काय होणार आहेत। महाराजांना ही चूक करवी लागली कारण दुसरा कुठला पर्याय उपलब्ध नव्हता। पण नाहीलाजने करावी लागलेल्या चुकीला चूक म्हणण्यात काय हरकत आहे?

या तहा मुळेच आपले २३ किल्ले गेले। महाराजांना कैदेत राहाव लागल। जीव गेला असता तर??। आपणच म्हणतो की लाख मेले तरी चालेल पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे। पोशिंदाच गेला असता तर??। किती भयाण कल्पना आहे ही। आई भवानीचा आशिर्वाद आणि जगदीश्वराची कृपा म्हणून महाराज वाचले। परतीचा मार्ग काय सोपा होता का? शंभूराजे कधी पकडले गेले असते तर?? आपल्या राजाला साधू चा वेष घ्यावा लागला।

जेव्हा एका तहा चे परिणाम राजाच्या, युवराजच्या आणि साम्राज्याच्या जीवावर येतायत तर तो तह चूक असेल का बरोबर?

शिवाजी महाराजांनी सुद्धा अश्या प्रकारचा तह यापुढे कधी केला नाही।

एकीकडे आपणच म्हणतो की शिवाजी महाराजांनी एक चूक परत कधीच केली नाही आणि दुसरी कडे कोणी त्या चुका सांगत असेल तर आपणच त्याचा एक वेगळा अर्थ लावतो।

होय मी शिवाजी महाराजांना देव मानत नाही।

आराध्य दैवत सुद्धा मानत नाही।

माझ्यासाठी शिवाजी महाराज एक खरे राष्ट्र पुरुष आहेत।

धन्यवाद!!!

जय हिंद!!!

👉प्रतापराव गुजर यांनी ठरवून हल्ला केला नाही, तर ते चुकून सापडले, ज्या ला आजच्या भाषेत petrolling म्हणतात ते करत असताना हे 7 जण आपल्या छावणी पासून खुप दूर गेले होते आणि ते नेमके खानच्या एका टोळीला सापडले, त्या काळी जिथे छावणी असेल तिथे आजूबाजूच्या परिसराची टेहळणी करायची पद्धत होती

👉Hi mahiti purna chukichi aahe.

👉संदर्भ श्री बाबासाहेब पुरंदरे यांचा म टा मधील लेखमाला

👉वरील अभ्यासपूर्ण लिखाण खूप सुंदरपणे सादर केले आहे. काही प्रसंगी महाराजांच्या आडाख्यात नंतर पेच निर्माण होतील असे वर्तन झाले. मला त्यांची बाजू घ्यायची आहे असे नाही. पण विचार करता त्या त्या प्रसंगी जे पर्याय उपलब्ध असतील त्यातून त्यांनी निवडलेले पर्याय कमी जोखमीचे, नंतर सावरायला शक्य आहेत असे असावेत. औरंगजेबाच्या दरबारी भेटायला जाणे हे मृत्यूला निमंत्रण आहे हे त्यांना माहित असूनही परिस्थितीचा तगादा असा होता की नंतरचे नंतर पाहू..

घरगुती नाते संबंध, मुलांना आपल्या पश्चात राज्य कारभाराची घडी घालून देण्याचा वेळ, संधी त्यांना कमी मिळाला. मिळवलेले राज्य वैयक्तिक ऐषारामाकरिता नाही. मुघल, मुस्लिम सत्ता केंद्रे ही तात्कालिक शत्रू आहेत. अन्यथा आपापसातील मतभेद, हेवेदावे, ऐदी जीवन जगायची जागिरदारी पद्धत, बापांच्या पराक्रमावर पुढच्या पिढीने मिशांवर ताव देत परंपरागत जीवन जगायचे. ,महसूल वसूलीची पद्धत धाक न दाखवता कशी करायची, शेती अवजारांचे, शस्त्रे व वाहन व्यवस्था यांचे आनिकीकरण न करायची मानसिकता, लेकिन वगैरे राज्य शासनाच्या महत्वाच्या बाबींवर वैचारिक स्वातंत्र्यातून प्रगति करायची उसंत मिळाली असती तर मुलांच्या हातात सत्ता देऊन त्यांना अनेक आदर्श निर्माण करता आले असते.

असो…

👉लढाईत खूप नुकसान होत होते म्हणून तह करावा लागला. आग्रा भेटीचा निर्णय मात्र चुकीचा होता.

👉मुळात असा कुप्रश्न मनात येणे हे पाप आहे

अजून खूप गोष्टी आहे इतिहास मध्ये प्रश्न विचारायला

पण का असे प्रश्न येतात देव जाणे

तह करणे म्हणजे हार नाही हे कृपया लक्षात घ्या

मी उदाहरण देतो सोप्प्या भाषेत

समजा क्रिकेट match चालू आहे

पहिल्या डावात शत्रूची खूप मोठी आघाडी आहे मग त्याला हरवण्यात स्वतः हरण्यापेक्षा माघार घेऊन हळूहळू खेळून draw करणे म्हणजे 'तह'

तत्कालीन परिस्थिती अशी होती

मिर्झा राजे जयसिंग हे हिंदू आणि स्वदेशीय होते

त्यांची सेना अफाट होती

त्यांचा खजिना ही खूप होता आणि नुकसान काही स्वतःचे होणार नव्हते

त्यांच्याशी लढून खूप सैन्य शेतकरी मेले असते

गड परत जिंकता आले असते पण सैन्य नाही

कराराप्रमाणे मनसबदारी मिळवून दक्षिण भारत वर वर्चस्व कायम राहिले असते

दिल्ली अशीही राजपूत आणि जाट लोक चालवत होते तिथे महाराष्ट्राचे ही वजन वाढले असते

मिर्झाराजे चा मुलगा स्वतः जामीन राहणार होता आग्रा भेटीला जो त्यावेळी सक्षम सरदार होता

आणि जगात अजून ही कोणाकडे नाही

परत सांगतो जगात अजून ही कोणाचं कडे नाहीच असा दूरदृष्टीकोन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे होता

चुका काढणारे तर बाई ला पण मीशी आहे बोलून नाकारता

पण वरील प्रश्न बाद करा

हीच नम्र विनंती

👉माफ करा पण ३रे छायाचित्र सरसेनापती हंबीरराव बाजी-मोहिते यांचे आहे.

♨️मला ओशो यान्नि एका प्रवचनात् सान्गितलेलि गोष्ट आठवली.

कृष्ण बाबत बोलताना ओशो म्हणाले कि कृष्णाने लहानपणि आन्घोळ करणारया युवतिन्चे कपडे चोरले होते असा उल्लेख् आहे. आता कृष्ण देव आहे तर तो असे कसे करु शकतो? मग त्या युवतिन्ना असे आन्घोळ करणे चुकीचे आहे असे त्याला सुचवायचे होते असा तर्क निघाला. ओशो म्हणतात कि कृष्ण त्यवेळि 12-14 वर्षाचा असेल, अशा वयात हे आकर्षन असणे नैसर्गिक आहे. कृष्ण खोडकर स्वभावाचा असु शकतो. म्हणजे कृष्ण हा एक आपल्या सारखी व्यक्ति होति असा विचार केला तर त्याच्या वागण्याचे उत्तर मिळते. त्यामुळे त्याचे पुढिल कार्यचे महत्व कमी होत नाही.

तसेच शिवाजी महाराज हि आपल्या सारखी एक व्यक्ति होते. त्यातहि राग, द्वेष्, वासना इ दोष असणारच, त्यान्चे काहि निर्णय चुकु शकतात.

पण हे निर्णय चुकले हे कोण ठरवणार? एक तर इतिहासात नेमके काय घडले, आपण जे वाचले ते कितपत सत्य आहे हे हि माहित नाहि. अजून महाराजान्चि जन्म तारिख नक्की माहित नाहि. गुरु कोण होते? यावर जातिवाद होत आहे. पूर्ण माहिती नसताना काय बोलायचे?

.

दुसरे म्हणजे चुकले म्हणायचे तर ते व्यक्तिगत मत असते. त्यावेळी नेमकी काय परिस्थिति होती, त्यात काहि निर्णय घेतले गेले हे आपण कसे पाहणार? मग त्यान्चे चुकले म्हणणे योग्य नाहि

तिसरा मुद्धा कि काहि चुका असतील, दोष असतील ते खोदत बसणे योग्य कि जे कार्य केले ते बघावे? चुका मुळे केलेले कार्य लहान होत नाहि.

शेवटी ज्याला चिकित्साच करायची असेल तर त्यासाठि हि योग्य व्यक्ति नाहि. महाराष्ट्रात शिवाजी व आंबेडकर यान्ची चिकित्सा (आता ) शक्य नाहि. एक वेळ राम, कृष्ण, इतर राजे, संत, गान्धी, सावरकर इ चि होइल् पण या दोन व्यक्तीची नाहि कारण यान्ना देवत्व दिले गेले आहे. आमच्या शहरात मध्यभागी शिवाजी पुतळा आहे. पूर्वी नव्हते पण या काहि वर्षात बरेच लोक येता जाता नमस्कार करतात. त्यात अधिकतम युवक असतात जे महाराजा सारखी दाढि ठेवतात, चन्द्रकोर काढतात, त्याच वेळी पुढे जावून तोण्डातिल गुटखा रस्त्यावर थुन्कतिल, भरधाव गाडी चालवतिल पण उत्सवात पुढे राहतील, मरणे मारणे चि तयारी ठेवतिल.

त्यामुळे असा प्रयत्न न केलेला बरा. इतिहासात जे घडले ते घडले त्यावर भाण्डत बसण्यात काय ठेवले आहे?

👉पारीख तू पूर्वग्रहदूषित आहेस काय तर म्हणे शिवाजी महाराजांचे भक्त गुटखा खातात

तुझ्या मायच्या नवऱ्याला विचार तो गुटखा खात होता का नाही

मी कट्टर शिवप्रेमी आहे मला कुठलेही व्यसन नाही

गुटखा विकायचे धंदे तर तुम्ही लोकांनी महाराष्ट्रात येऊन केले तारीख

♨️महाराजांच्या पराक्रमाला चूक बरोबरच विशेषण लावणं हे "पातकंच"!

त्यांनी जे केलं ते त्यांना बरोबर,योग्य वाटलं म्हणूनच, पण त्याला स्वार्थाचा लवलेशसुद्धा नव्हता. ज्या वेळेस परकीय आक्रमणाखाली अखंड भारत भरडला जात होता त्या वेळेस त्यांनी मूठभर मावळ्यांसोबत या असुरी शक्तींना तोंड द्यायचं ठरवलं यात चूकीच ते काय ? आणि कसे ? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात वाऱ्यासारख्या वावरणाऱ्या आणि वाघासारख्या काळजाच्या लोकांमध्ये अस्मितेचं स्फुल्लिंग चेतवणं याचे चुकीत काय मोजमाप करायचे.

आपण आता अखंड धर्मनिरपेक्षता म्हणतो ती ते नसते तर बघायचं सोडाच काय असते तेही कधी माहिती झालं नसत. भारत भू चा भाग असण्याऐवजी आपणही आता त्या हिरव्या कापडावरच्या चंद्रकोरीचे मिंधे झालो असतो.

त्यांनीच तर देव देश आणि धर्म म्हणजे नेमके काय ते नुसतेच सांगितले नाही तर रक्तात एवढे भिनवले की अजूनही आपण "मराठी" गरज पडेल त्यावेळीसच नाही तर अखंड देशहिताचाच विचार करतो.

महाराजांच्या पराक्रमाची महती एवढी की अजूनही भारतभरात महाराष्ट्र ओळखला जातो तो पराक्रमी आणि देव देश धर्माला वाहून घेतलेले लोक म्हणून ही काय कमी आहे की त्याची गोळाबेरीज मांडत बसायचे.

अहो उत्तरेला बघा कितीतरी राजपूत बाटवले गेले इतके की पाकिस्तानच्या मुसलमानांमध्ये अजूनही राजपूत मुसलमान हा एक वर्ग आहे, निदान महाराजांच्या मुळेच आपण आज हिंदुत्वाचा जो घोष चालविलेला आहे तो अस्तित्वात आहे नाहीतर तुम्हाला माहीतच आहे एक प्रसिद्ध कवी काय म्हणून गेला "तो *** होती सबकी"

त्यांनी आपल्याला नुसताच मान दिला नाही एक जीवनपद्धती दिली एक शिकवण दिली एक अस्मिता दिली एक राष्ट्र दिले आणि आपण करंट्यानी ते टिकवायचे सोडून त्यांनी चुका काय केल्या त्याचे "बुद्धिवादी बनून विश्लेषण करणे" म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्यापलीकडे काही एक नाही.

निदान आपण तरी हा कपाळकरंटेपना करायला नको असे माझे स्पष्ट मत आहे.

हो, इतिहास वाचणाऱ्यांना भूतकाळात केल्या गेलेल्या गोष्टींचा उहापोह करणे जरूर सोपे जाते पण मी जे सुचवत आहे ते तुम्हाला करता येते का ते बघा

चार "सुशिक्षित" बरोबर घेऊन आपल्या गल्लीतल्या लोकांना फक्त गल्लीच स्वच्छ ठेवायला उद्युक्त करा.तुम्हाला लवकरच कळेल की ही गोष्ट वाटते तेवढी सोप्पी नाही, याउलट महाराजांनी तर शीर तळहातावर घेऊन लढणाऱ्यांची फौजच उभी केली होती हे काय एव्हडे सोपे आहे ?

महाराजांच्या कृती या फक्त आणि फक्त "पराक्रमच" आणि त्याचा ताळेबंद मांडणे कृतघ्नपणाचं.

आज मी घरात शांतपणे बाप्पाची आरती करतो, महाराष्ट्रात बायकामुलीना मिळणारा मान, त्यांना घराबाहेर निश्चितपणे पडत येणे, सगळ्या धर्माच्या लोकांना त्यांचा धर्म पाळता येणे याचा काय तोटा सांगू ? आणि काय पुरावे देऊ ?

आमच्या अखंड कितीतरी पिढ्या भगव्यामुळेच तर आहेत आणि तो भगवा ज्या "देवामुळे" शाबीतच नाही तर मानाने डौलत राहिला त्याला का म्हणून चूक म्हणू ? आणि काय पुरावे देऊ ?

♨️सामान्यतः इतिहास या विषयावरील आणि विशेषतः महापुरुषांच्याबाबत कोणतेही नकारात्मक वक्तव्य करणे मी शक्यतो टाळतो कारण आपल्याला इतिहास म्हणून जे काही सांगण्यात येते किंवा शाळेत इतिहास म्हणून जे काही शिकवले जाते त्याच्या सत्यतेबाबत मला शंका आहे. इतिहासात जी गोष्ट घडली ती घडली …. जरी तिचे अर्थ बदलले तरीही घटना बदलत नाही.

पण शिवाजी महाराजांच्या बाबतीत महाराष्ट्रात एक शिकवले जाते तर गुजरातमध्ये विपरीत शिकवले जाते. साधारण ४५ वर्षांपूर्वी आम्हाला शाळेत शिकवले गेले होते की शिवाजी महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव हे होते परंतू नंतर इतिहास बदलला. आता तर दादोजी कोंडदेव अशी कोणी व्यक्तीच नव्हती असेही काही स्वयंघोषित विद्वान इतिहासाचार्य म्हणतात. काही लोकं तर महाराजांना प्रत्यक्ष भवानीमातेनेच समशेर चालवायला शिकवली असेही अधिकारवाणीने सांगतात. कोणता तर्कनिष्ठ माणूस यावर विश्वास ठेवेल?

शिवाजी महाराजांना भवानी तलवार साक्षात भवानीमातेने स्वप्नात दिली असे सांगितले जाते असे सांगितले जाते परंतू स्वप्नात मिळालेली वस्तू वास्तवात कशी काय प्रकटली हा तर्कशुद्ध प्रश्न म्हणजे अविश्वास ठरवला जातो हा आपल्याकडचा बुद्धीप्रमाण्यावाद आहे त्यामुळे खरा इतिहास कोणता याबाबतच जिथे प्रश्नचिन्ह आहे त्याबाबत अधिकारवाणीने काय दावा करणार?

आग्र्याहून सुटका ह्या प्रकरणाचेसुद्धा अनेक अर्थ काढण्यात येतात.

काही महापुरुषांना समाजाने देवत्व बहाल केलेले असते आणि आपल्या संस्कृतीत एकदा का कोणाला देवत्व बहाल केले की त्याची चिकित्सा करणे म्हणजे पापच नव्हे तर सामाजिक गुन्हा आहे. त्यामुळे शक्यतो यांची चिकित्सा कोणी करत नाही. प्रत्यक्ष श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची चिकित्सा केली तरी चालते पण देवत्व प्राप्त झालेल्या महापुरुषांच्या बाबतीत केलेली चिकित्सा म्हणजे गुन्हा असतो ……….. मला तो गुन्हा करायचा नाही.

👉जोपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानू तोपर्यंत असेच होईल पण मी मात्र महाराजांना ह्या जगातील सर्वाधिक चांगले राजे मानतो ,पिता मानतो,पाती मानतो,आणि सगळ्या देवांपेक्षाही चांगले मानतो कारण माझ्या राजामुळे देवळलात देव सुरक्षित आहे पण मी त्यांना देव मनात नाही कारण महाराज हे माला देवाहून चांगले वाटतात आणि ते माझे idol पण आहे

👉जगातल्या सगळ्याच राजांच्याविषयी मला खरंच माहित नाही त्यामुळे मी तसे म्हणणे मला योग्य वाटत नाही पण नक्कीच ते एक महापुरुष होते…. जो शब्दप्रयोग मी माझ्या उत्तराच्या पहिल्याच वाक्यात केला. नक्कीच एक आदरणीय राजा. देव मी अजून तरी पाहिलेला नाही त्यामुळे मला त्यांची देवाशी तुलना करणेसुद्धा योग्य वाटत नाही. परंतू तत्कालीन राजेशाही पद्धतीत ते नक्कीच एक आदर्श राजा होते.

👉पन्नास वर्षाच्या आयुष्यात महाराजांची एकही चूक सापडत नाही मानून मी त्यांना जगात श्रेष्ठ मानतो

👉अभिनंदन. खरंच तुमचा चांगला अभ्यास आहे.

भारताच्या इतिहासाबद्दल मी बर्यापैकी पूर्वग्रहदुषित आहे त्यामुळे मी ठाम उत्तर लिहू शकत नाही.

👉माला हितिहास हा विषय आवडतो फक्त त्यामुळे मला असे वाटते पण मी तुमच्या मताशी संपूर्ण सहमत आहे की महाराजांना देव मानू नये

👉उत्तर लिहायचे नाही तर कशाला नाक खुपसता प्रत्येक वेळी लुडबुड करायला हवी असे जरुरी नाही

👉तुम्हाला माझ्या उत्तरावर टिपणी करायला मी काय निमंत्रण दिले होते?

निदान मला प्रश्न विचाराला होता म्हणून मी उत्तर लिहिले.

पटले नसेल किंवा समजले नसेल तर सोडून द्या … सगळ्यांसाठी सगळे नसते.

👉शिक्षण संस्थेने शाळेतील पाठ्यपुस्तकात एखादी गोष्ट टाकण्याआधी त्याची पूर्ण पुष्टी (पुराव्यासहित) करणे गरजेचे आहे. कारण सत्य लपत नसते, कधी ना कधी प्रत्येकाला ते कळते आणि नंतर आपल्या शिक्षण संस्थेवरचा सर्वांचा विश्वास उडतो.

👉आपल्याकडे पुरावे तपासून लिहिणेसुद्धा कठीण आहे. उदाहरणार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मोहनदास गांधी यांना भारतातील सर्वात मोठा दांभिक माणूस म्हणायचे … आता तुम्हीच सांगा. येणार आहे का हे शालेय इतिहासाच्या पुस्तकात.

व्यक्तीपूजेस प्राधान्य देणाऱ्या आपल्या समाजात सत्य पुढे येतेच असे नाही. आज शास्त्रीजींची हत्या कोणी केली हे जरी समजले तरी भारत म्हणजेच आपण काय करणार आहोत?

शालेय शिक्षण हे फक्त प्रमाणपत्र आणि पदवी मिळवण्यासाठी असते 

♨️मी एक महाराष्ट्रीय म्हणून या प्रश्नाला छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेप असा समज न करुन घेता . याउलट मी या प्रश्नाद्वारे स्वत:कडे आपले बोट करून पाहणे किंवा पाहण्याची संधी मिळणं मानते. शिवाय शिवाजी महाराज यांची किर्ती व महती हि एखाद्या प्रश्र्नाने खोडूनं निघूं शकतंच नाही. शिवाजी महाराजांची चूक पकडण्याआधी ह्या इतिहास जमा युगपुरुषाने चूकीची न केलेली कार्ये खोलवर समजून घेण्यांतच मी वां आपण कमी पडत आहोत.

इतिहास जमा झाल्याने काळ बंधिस्त नृसिंह (छत्रपती शिवाजी महाराज) यांच्या चूका जे आज आपण ह्यात आहोत यांनी जाणून घेऊन त्या आपल्या हातून घडणार नाही याची काळजी जरी घेतली तरी छत्रपति शिवाजी महाराजांचेच(खडतर वेळेत हि चूका होऊ नयेत याची काळजी घेणाचे बुद्धी चातुर्य असलेला जाणता राजा) नाव राखलं वाढवलं असं होईल .शेवटी पाण्यासाठी धरतीच्या उरावर कुदळीने घाव घालूनच तर पाणी लागतं विहिरीला. या प्रश्नाद्वारे हाती लागलेल्यां चूकीतून आपल्याला काही (मी आपल्याला म्हणत आहे येथे लक्षात घ्या माननीय सर्वजण ) हाती लागले तर महाराजांसारखे किर्ती मान व चारित्र्यसंपन्न पाण्याचा झरा बनु शकू आपण. याच निमित्ताने" शिवचरित्र" समजूं मघ ते उमजूं हि शकेल सगळ्यांना 🙏🏼🙏🏼🙏🏼.

👉महाराजांनी कोणती चूक केली असा प्रश्न उपस्थित करायला खरंच धाडस म्हणावे लागेल,कारण महाराजांचे कार्य आणि त्यांचं प्रत्येकाच्या मनात असणारे स्थान म्हणजे "न भूतो न भविष्यती"

मला असं वाटत की, ज्या प्रमाणे महाराजांनी मासाहेब जिजाऊनां त्या काळात असलेल्या अनिष्ट प्रथेप्रमाणे 'सती' जाऊ दिले नाही, त्याचप्रमाणे महाराजांनी तेव्हापासूनच "सतीबंदी"करायला हवी होती.

चूक नाही म्हणू शकत पण काळाच्या मर्यादा असतील .

♨️महाराज राजा असून ही ब्राह्मणी वर्चस्व मोडू शकले नाही.( जे पुढे त्याचे वारस शाहू महाराजांनी मोडून काढले) त्यामुळे त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यापर्यंत त्यांची मजल पोचली, आणि त्यांच्या मृत्यूस ही कारणीभूत झाली.( महाराजांना कोणताही असाध्य आजार नव्हता, तरीही वयाच्या केवळ पन्नास व्या वर्षी रक्ताची उलटी होऊन महाराजांचे निधन झाले)

♨️माणूस जेव्हढा मोठा, कर्तृत्ववान तेव्हढ्या त्याच्या काही चुकाही असू शकतात. त्यातूनच ते शिकतात आणि आणखी मोठे होतात…..महाराज हे ह्याच गोष्टीचे उदाहरण ते तर वयानेही लहान होते , एकटे होते, शेती भाती करणार्आया सामान्य लोकांना लढवय्ये मावळे बनवले, मोंगलांना विरोध करणारे ह्या भागतले पहिलेच होते त्यामानाने चुका फारच किरकोळ आहेत.

👉आग्र्याला युवरजासह भेट देणे ही चूक मानता येईल. कदाचित नाईलाजही झाला असेल.

👉साहेब आपणाला एक गोष्ट माहित नसावी कि संभाजी महाराज हे मुघलांचे १० हजारी मनसबदार होते. आणि मनसबदार म्हणले कि राजकीय शिष्टचार (प्रोटोकॉल) म्हणून त्यांना हजार व्हावं लागत.आणि स्वतः औरंगजेब चा हुकूम मिर्झा राजा जयसिंग ला होता कि पितापुत्र दोन्ही आले पाहिजेत, त्याचा हेतू कधीच चांगला नव्हता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट