हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांनी यशवंतराव मोरेला दंडीत का केले?

जावळी …पूर्ण हिंदवी स्वराज्य हे केंद्र असलेले हा भाग आता अर्ध्या हुन अधिक कोयने धरणाच्या पत्रात बुडालेला आहे.जेव्हा प्रचंड दुष्काळ पडतो तेंव्हा तिथले बुडालेले मंदीर आणि काही अवशेष तोंड बाहेर काढतात पण त्याकडे पाहण्याची कोणाला सोया नसते.आज पण इथे भुयारे , छुपे मार्ग असतील जे आता इतिहासाच्या पडद्या मागे गेले आहे.सातारा जिल्ह्यात प्रतापगड सोडल्यावर महाबळेश्वरकडे जाताना साधारण ३-४ किमी डावीकडेजावळीच्या मोरे घराण्याचे कुळ आहे. हे जावळीचं बेलागखोरं इतकं अवघड आणि अभेद्य की, १४व्या शतकात ५०००यवनी फौजा जावळीत गेल्या , त्या परतल्याच नाहीत आणि त्याचं काय झालं याचा ठाव ठिकाणदेखील लागला नाही.एकबाजूला घनदाट झाडी, महाबळेश्वर , भोरप्या(आता प्रतापगड) रायगड सारखे अभेद्य जंगलआणि किल्ले कपारी आणि तिथूनच कोकणात उतरला तर थेट अरबी समुद्र अशी ही जावळी खोऱ्याची रचना आहे.

अशी हि जावळी प्रत्यक्ष ताब्यात घ्यावी अशी कोणाची हिम्मत नव्हती.चंद्रराव हे विजापुरकरांचे (आदिलशहा)पिढीजात जहागीरदार होत.जावळीच्या संस्थानची स्थापना करण्याऱ्या मूळ व्यक्तीचे नाव 'चंद्रराव' असे होते. या चंद्ररावला ६ मुलेहोती. त्यापैकी थोरल्या मुलाला त्याने स्वत:जवळ ठेवलेआणि इतरांना जावळीतील निरनिराळ्या जागा नेमूनदिल्या. थोरल्या शाखेत चंद्रारावापासून पुढील ८पिढ्या झाल्या. चंद्रराव - चयाजी - भिकाजी -शोदाजी - येसाजी - गोंदाजी - बाळाजी - दौलतराव.जावळीचा हा प्रत्येक शाखापुरुष किताब म्हणून चंद्रराव हे नाव धारण करू लागला.या शाखेतला आठवा पुरुष दौलतराव निपुत्रिक होता,. तर या दौलतराव ला येशवंतराव ला दत्तक आणि पुढे ह्याला "चंद्रराव" होन्यासाठी शिवाजी महाराजांनी मदत केली.. या दत्तक प्रकरण दरम्यान काही कारणास्तव आदिलशाहीकडून मदत ना घेता माणकाईने शिवाजी महाराजांना मदतीसाठी बोलावले.

या चंद्ररावाला जे भाऊबंद होते त्यापैकी प्रतापराव,यशवंतराव (कसबे शिवथर), हणमंतराव (जोर),दौलतराव (महिपतगड), गोविंदराव (जांभळी), कोंढवी परगण्यातील केवनाळे व वाकण येथील बागराव ऊर्फभिकाजीराव, आटेगाव तरफेतील देवळी येथील सूर्यराव .वाई परगण्यातील बावधन या गावच्या गोमाजी नरसिंहव रामजी कृष्ण या दोन अधिकाऱ्यांनी चंद्ररावालापाठविलेले पत्र उपलब्ध आहे चंद्ररावाला गादीवर बसवण्यात शीवाजीमहाराजांची मदत झाली.पुढे इ. स . १६४८ मध्य स्वराज्यावर चालून आलेल्या फतहखानच्या स्वारीपूर्वी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सांगितले की चंद्रराव ला गादी वर बसवले. हा चंद्रराव आता स्वराज्य च्या प्रकरण मध्ये ढवळाढवळ करु लागला.

(वासोटा किल्ला आज सुद्धा जाण्यासाठी अतिशय अवघड आहे.सातारा हुन कास पठार तिथून बामणी तिथून शिवसागर तल्याम्सधून बोटीनेनप्रवास आणि तिथून कैक किलोमीटर चालत….)

स्वराज्यातील बंडखोर , पुंड,गुन्हेगार याना चंद्रराव सरळ सरळ अभय देऊन रक्षण करू लागलं.हा येशवंतराव आपल्या कह्यात राहील हा राज्यांचा अंदाज साफ साफ चुकला म्हणून त्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे आणि संभाजी कावजी याना जावळी वर पाठवले.ते पाहून चंद्रराव रायरी (रायगड) वर सटकला. चंद्ररावाला महाराजांचं श्रेष्ठत्व मान्य होणारं नव्हतं. मोरेंनी महाराजांना लिहिलं, ‘‘..तुम्ही काल राजे झालात. तुम्हाला राज्य कोणी दिले? आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा महाबळेश्वर! त्याच्या आणि (विजापूरच्या) बादशहाच्या कृपेने आम्हास सिंहासन मिळाले आहे. जावळीत येणारच तर यावे. दारूगोळा मौजूद आहे. जावळीतून एकही मनुष्य माघारी जाणार नाही. येता जावळी, जाता गोवळी!’’ अखेरीस इ. स. १६५६ ला महाराज स्वत जातीने जावळीवर चालून आले. महाबळेश्वरवरून जावळीत उतरण्यासाठी मोठी तुकडी दक्षिणेच्या ‘रडतोंडी घाटा’ने उतरली आणि तिथे मोऱ्यांच्या सन्याने प्रतिकार केला. त्याच वेळी खुद्द राजे छोटी तुकडी घेऊन उत्तरेच्या ‘निसणीच्या घाटा’ने महाबळेश्वरवरून जावळीत उतरले आणि जावळी जिंकून घेतली. जावळी स्वराज्यामध्ये आली, म्हणजे – अत्यंत मोलाचे दुर्ग (रायरी, चंद्रगड, मकरंदगड, मंगळगड, सोनगड, चांभारगड), दुर्गम घाटवाटा (वरंध, ढवळेघाट, पारघाट), डोंगरी देवस्थानं (महाबळेश्वर, चकदेव, पर्वत), ताकदीचे डोंगर (भोरप्या. ज्यावर प्रतापगड बांधला), थेट सिंधुसागरापर्यंत झेप घेता येणं अन् मुख्य म्हणजे जावळीतले तालेवार हिरे (मुरारबाजी देशपांडे) गवसणं अशा खूप गोष्टी साधल्या होत्या. शिवरायांनी जावळी ताब्यात घेतल्यानंतर आसमंतात घोडय़ांच्या टापा, नगारे, तुताऱ्या आणि तोफांचा आवाज निनादत राहिला.चंद्रराव आणि त्याच्या मुलं ठार केले आणि स्वराज्याचा सर्वात भक्कम प्रदेश मिळाला.1648 ते 1655 पर्यंत राजे शांत होते कारण गनिमी कावा साठी उपयुक्त प्रदेश तो पर्यंत स्वराज्यात नव्हता.या प्रदेशाचे महत्व एवढे होते की आदिलशाही सुद्धा अंकित असलेल्या चंद्रराव च्या वाकड्या मध्ये गेली नाही.काही वर्षे महाराजांनी शुद्ध नमते घेतले.मात्र हा प्रदेश गेल्यावर मात्र आदिलशाहीच्या बेगम ने अफझल खान ला महाराजांवर आक्रमण करायला पाठवले.गनिमी काव्यासाठी उप्युक्त असलेला हा प्रदेश राजानी सोडला नाही.,अफझल खान सुद्धा इकडेच बोलावून संपवले.त्या नंतर प्रतापराव मोरे नि उरल्या सुरल् आदिलशाह सैन्याला विजापूर पर्यंत मार्ग दाखवला.

महाबळेश्वर जवळ बांधला…प्रतापगड (जावळीचा भोरप्या डोंगराचा राजानी स्वतः किल्ला बांधला आन नाव ठेवले प्रतापगड)

केवळ उद्यम पणे वेगळ्या ममूळे आणि दांडी बंडखोर स्वराजच्याला बेईमान लोकांना आश्रय दिला आणि यशवंतराव ने ही जावळी गमावली.

या जावळीतून स्वराज्याला खूप गोष्टी मिळाल्या1)बंदलचे

संदर्भ: शकाकर्तेबशिवराय by विजय देशमुख

जावळीचे राजधानी रायरी उर्फ रायगड


जावळी प्रांत

जावळी हा आजच्या सातारा जिल्हाच्या वायव्य कोपऱ्याचा भाग. जावळी म्हणजे जयवल्ली. हिंदवी स्वराज्याच्या दक्षिण पश्चिम सीमेला लागूनच चंद्रराव मोऱ्यांचे जावळीचे राज्य होते. वास्तविक चंद्रराव हे विजापूरकरांचे पिढीजात जहागीरदार. पण आठ पिढ्या खपून त्यांनी आपले वैभव एखाद्या सार्वभौम राजासारखे वाढविले होते . मोऱ्यांजवळ १०-१२ हजार फौज होती. महाडपासून महाबळेश्वर पर्यंतचा डोंगरी भाग व बव्हंश सातारा जिल्हा त्यांनी काबीज केला होता. या बाजूने कोकणात उतरणाऱ्या हातलोट व पार घाटातील माल वाहतुकीची जकात मोरे वसूल करीत. त्यांच्या अमलाखाली महाबळेश्वर, जावळी(कोयनेचे खोरे), वरंधघाट, पारघाट, शिवथर, रायगड इतका प्रांत होता.

१६४७ साली दौलतराव मोरे निपुत्रिक वारला. आता नवा 'चंद्रराव' नेमण्याचा अधिकार आदिलशाहीचा. परंतु, दौलतरावाची आई माणकाईने परस्परच शिवथरच्या यशवंतराव मोरेच्या वंशातील कृष्णाजी बाजीला दत्तक घेतले व त्याची चंद्रराव पदावर स्थापना केली. मोरे घराण्यातील काहींचा याला विरोध होता. माणकाईने शिवाजीराजांकडे सहकार्य मागितले. राजांनी कृष्णाजी बाजीच्या चंद्रराव पदाला आपला पाठिंबा दिला. शिवाजीराजे व कृष्णाजी बाजी यांच्याविरुद्ध विजापूर दरबारात तक्रारी गुदरल्या गेल्या. परंतु फत्तेखानाचा पराभव, दिल्ल्लीचे समकालीन राजकारण, शहाजीराजेंची अटक व सुटका या सर्वांमुळे जावळी प्रकरणात आदिलशहाने लक्ष घातले नाही.

सन १६४९ साली अफजलखानाची वाईचा सुभेदार म्हणून नेमणूक झाली. जावळी भाग हा वाई प्रांतात येतो. अफजलखानाने नव्या चंद्ररावाची नेमणूक गैर ठरवली. आणि कान्होजी जेधे यांना जावळीवर हल्ला करण्याचा हुकूम दिला. परंतु जावळीवर चालून जावे तर शिवाजीमहाराजांनी जमविलेले राजकारण विस्कटले जाईल आणि हल्ला नाही करावा तर विजापूर दरबारी आपली निष्ठा नाही हे अफजलखानाला समजेल अशा दुहेरी कात्रीत सापडले. कान्होजींनी शिवाजीमहाराजांना सल्ला विचारला. महाराजांनी कान्होजींना खानाशी बोलणे करण्याचा सल्ला दिला. कान्हाजींनी आपले हेजीब आबाजीपंतांना खानाकडे पाठविले व आपल्या अटी कळविल्या. या वाटाघाटी बराच काळ चालू राहिल्या. त्याकाळात दक्षिणेत छोट्या छोट्या राजांनी पुन्हा उठाव चालू केले. परिणामी आदिलशहाने अफजलखानाला वाईहून परत बोलविले आणि कर्नाटकात मोहिमेवर पाठविले.

१६५६ नंतर जावळीचे प्रकरण पुन्हा रंगले. राजांनीच कृष्णाजी मोरेची चंद्रराव पदावर स्थापना केली व अफजलखान जेव्हा हि व्यवस्था मोडू लागला तेव्हा राजकारण करून त्यांनी या चंद्ररावाला वाचविले होते. परंतु काही काळाने तो हे सर्व विसरला आणि उन्मत्त झाला. राजांच्या मुलखात ढवळाढवळ करू लागला.

बिरवाडी टप्पाखालील काही गावांचा अधिकार बाजी पाटील व मालोजी पाटील यांच्याकडे होता परंतु चंद्ररावाने त्यांना हुसकून लावले.ती गावे स्वतः बळकावली. इ.स. १६५१-५२ मध्ये हे पाटील महाराजांकडे मदत मागण्यासाठी आले, महाराजांनी त्यांची वतनावर पूर्णस्थापना केली.चंद्रराव स्वाभावीकच चिडला असल्यास नवल नाही.

पुढे लवकरच स्वराज्यातील मुसेखोऱ्याचा गावकुळकर्णी 'रंगो त्रिमल वाकडे' याने एका विधवेशी सिंदळकीचा गुन्हा केला आणि शिवाजीराजे शासन करतील या भीतीने तो जावळीस आश्रयास आला.चंद्ररावणे त्यास आश्रय दिला आणि महाराजांची नाराजी स्वतःवर ओढावून घेतली.

चिखलीचा रामाजी वाडकर व चंद्रराव यांचे पूर्वीपासून वैर होते त्यामुळे चंद्ररावाने त्यास जीवे मारले. या रामाजीचा पुत्र लुमाजी प्राणभयाने रोहीडेखोऱ्यात आला.चंद्ररावाने सुद्धा त्याचा पाठलाग सोडला नाही. स्वराज्य कक्षेत असणार्या रोहीडेखोऱ्यात घुसून त्याने लुमाजीला ठार केले.

या सर्व प्रकारामुळे क्रोधीत होऊन महाराजांनी मस्तवाल मोऱ्यांना जरबेचं पत्र पाठविले. त्या पत्रात महाराज लिहितात.

"तुम्ही मुस्तफद राजे म्हणवितां. राजे आम्ही. आम्हास श्रीशंभूनें राज्य दिधलें आहे तर तुम्ही राजे न म्हणावें. आमचे नोकर होऊन आपला मुलुख खाऊन हामराहा चाकरी करावी. नाहीतर बदफैल करून बंद कराल, तर जावळी मारून तुम्हांस कैद करून ठेवुं."

उत्तरादाखल चंद्ररावाने महाराजांस लिहिले कि, "तुम्ही काळ राजे जाहला. तुम्हांस राज्य कोणें दिधलें? मुस्तफद राजा आपले घरी म्हटलीयावरी कोण मानितो? येता जावली जाता गोवली. पुढे एक मनुष्य जिवंत जाणार नाही. तुम्हांमध्ये पुरुषार्थ असला तर, उदईक याल तर आजच यावे - आम्ही कोकणचे राजे असून आमचा राजा श्रीमहाबळेश्वर. त्याचे कृपेने राज्य करितों. येथे उपाय कराल तर अपाय होईल. यश न घेता अपयशास पात्र होऊन जाल."

चंद्रराव मोऱ्याचे हे उर्मट उत्तर ऐकून महाराज परम संतप्त झाले. त्यांनी मोऱ्याला अखेरचे एक पत्र पाठविले. त्यात ते म्हणतात,

"जावली खाली करोन, राजे न म्हणोन, मोरचेल दूर करून, हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची काही चाकरी करणे. इतकीयावर बदफैली केलीया मारले जाल."

या पत्रानेही चंद्ररावाचे डोळे उघडले नाहीत. स्वतःच्या बळाचा अतिरेकी अभिमान चंद्ररावाने महाराजांना पुन्हा डिवचून लिहिले, "दारुगोळी महझूद आहे. काही बेजबाबास खुते घालून लिहिले ते कासियास ल्याहाविले? थोर समर्थ असो."

जावळीवर हल्ला

सामोपचाराने जावळी प्रकरण मिटत नाही हे स्पष्ट झाले. त्यामुळे बळाचा वापर केल्याशिवाय गत्यंतर नव्हते. रघुनाथ बल्लाळ सबनीस, संभाजी कावजी कोंढाळकर, सूर्यराव काकडे, कान्होजी नाईक जेधे, बांदल देशमुख व स्वतः महाराज एवढे सर्व या मोहिमेवर जाण्याचे ठरले. चंद्ररावाचे प्रमुख कारभारी व सैन्य जावळीच्या जोहोरबेट, चतुर्बेट, शिवथर खोरे, व खुद्द जावळी या ठिकानी विखुरलेले होते. या सर्व ठिकाणी अकस्मात हल्ला करून चंद्ररावाची जावळी काबीज करण्याचे ठरले. व त्यानुसार संभाजी कावजी चतुर्बेटावर, रघुनाथ बल्लाळांनी जोहोरखोऱ्यावर तर काकडे, जेधे, बांदल व खुद्द महाराजांनी जावळीवर हल्ला केला.

मुरारबाजी देशपांडे

चंद्रराव मोऱ्याकडून प्रतापराव मोरे, हणमंतराव मोरे, मुरारबाजी देशपांडे हे सर्व महाराजांच्या सैन्याशी ठिकठिकाणी झुंजू लागले. परंतु महाराजांच्या बळापुढे चंद्ररावाचे बळ तोडके पडू लागले. खासा चंद्रराव व मुरारबाजी यांनी जावळी बराच वेळ लढविली. पण अखेर त्याला माघार घ्यावी लागली. तो आपल्या बायकामुलांसह रायरी किल्ल्यावर लपून बसला. जावळी महाराजांनी सर केली. तो दिवस होता मन्मथ नाम संवत्सर शके १५७७ पौष वद्य चतुर्दशी म्हणजे मंगळवार १५ जानेवारी १६५६.

जावळीचे व्यवस्था नीट लावल्यानंतर महाराज रायरीकडे निघाले. चंद्ररावाने सुमारे १ महिना किल्ला झुंजविला, पण त्याचे बळ अपुरे होते. अखेर शिलिमकरांनी मध्यस्थी केली व चंद्ररावास रायरीच्या खाली उतरविले. आता रायरीचा किल्ला महाराजांच्या ताब्यात आला. महाराजांनी मोऱ्यांचा बहोत मान केला. त्यांना घोडा, शिरपावं, रुमाल दिला. महाराजांनी मोऱ्यांशी वाटाघाटी आरंभिल्या. मोऱ्यांच्या पदरी असणाऱ्या मुरारबाजी व त्यांच्या चार बंधुंना आपल्या पदरी घेतले.

महाराजांची इच्छा होती कि मोऱ्यांजवळ जुजबी शिबंदी ठेऊन त्याची जावळी परत करावी. आपले नोकर म्हणून त्यास स्थापावे. वरकरणी चंद्ररावाने महाराजांचा सल्ला मानतो असे दाखिवले पण त्याचवेळी गुप्तपणे मुधोळकर घोरपड्यांना सुटकेसाठी चोरून पत्रे लिहिली. त्याच्या दुर्दैवाने हि पत्रे महाराजांच्या हेरांच्या हाती लागली.

चंद्ररावाची हरामखोरी कळताच महाराज विलक्षण संतापले. बहुदा त्याचवेळी चंद्रराव कैदेतून निसटला पण पुन्हा पकडले जाऊन त्याला महाराजांसमोर सादर केले गेले. महाराज विलक्षण चिडलेले होते. बेईमानी केल्याबद्दल चंद्ररावाची गर्दन मारण्याचा हुकूम महाराजांनी दिला. चंद्ररावाचा मुलगा बाजी पळून गेल्यामुळे हाती सापडला नाही. पुढे हा मिर्झाराजे जयसिंगांना सामील झाल्याचे कळते. चंद्ररावाचा शिरच्छेद झाला व जावळीवरील त्यांचे आठ पिढ्यांचे राज्य संपले.

एकंदरीत मोऱ्यांची वारंवार होणारी हरामखोरी आणि बेईमानी यामुळे महाराजांनी त्यांना दंडित केले.

संदर्भ: शककर्ते शिवराय - विजय देशमुख, वेध महामानवाचा - डॉ. श्रीनिवास सामंत, राजा शिवछत्रपती - बाबासाहेब पुरंदरे.

छायाचित्र साभार: गूगल

___________________________________________________

जावळीच्या पाडावाबाबत आणि चंद्रराव मोरे व त्याची मुले यांच्या वधाबाबत शिवाजी महाराजांवर फितुरीचा आणि विश्र्वासघातकी पणाचा आरोप करण्यात येतो.

"जावळीचा प्रांत जिंकून घेताना शिवाजीने जाणीवपूर्वक कट केला आणि विश्वासघाताने जावळीच्या मोऱ्यांचे पारिपत्य केले"अशा प्रकारचा आरोप प्रख्यात इतिहासकार जदुनाथ सरकार व तसेच अन्य काही इतिहासकारांनी केला आहे. शिवाजीने रघुनाथ बल्लाळ कोरडे आणि प्रभू या दोघांना वाटाघाटी च्या निमित्ताने चंद्रराव मोरे यांच्याकडे पाठवले आणि संधी साधता च रघुनाथ बल्लाळ ने चंद्रराव ला जखमी केले असा वृत्त्तात जदुनाथ सरकार यांनी दिलेला आढळतो.

सभासद बखर व ९१ कलमी बखर यांतील मजकुराचा आधार घेऊन जदूनाथ सरकारांनी हा आरोप केलेला आहे.

- सभासद बखरतील मजकूर

परंतु त्याचवेळेस त्यांनी जेधे शकावली आणि परमानंद यांच्या शिवभारतातील मजकूर अग्राह्य ठरविला आहे.

- शिवभारतातील मजकूर

वास्तविक पाहता सदरील बखरी आणि इतर साधन साहित्यातील जावळी प्रकरण संबंधीचा मजकूर एकमेकांविरुद्ध स्वरूपाचा असल्यामुळे एकूण प्रकरणाचे स्वरूप कार्य हे निशचितपणे सांगणे कठीण आहे.

खरे पाहता परमानंद हा समकालीन लेखक आहे. स्वतः शिवरायांच्या आज्ञेनुसार त्याने शिवभारत हे काव्य लिहिले आहे. त्याने स्पष्ट केले आहे की, जावळी ला जावून महाराजांनी चंद्रराव याचा पाडाव केला, विश्वासघात नव्हे.

चंद्रराव मोर्यांचा पाडाव :-

शहाजीराजांचा सुटकेनंतर शिवाजी महाराजांनी पहिला मुलुख कोणता जिंकला असेल तर तो म्हणजे जावळीचा होय. जावळी हा सातारा जिल्ह्यातील अगदी वायव्य दिशेस असलेला प्रदेश. शिवरायांनी जेव्हा मावळ प्रांत काबीज केला तेव्हा स्वराज्याची सीमा जावळीच्या जहागिरी ला जावून भिडली.आदिलशहाने या प्रदेशाच्या संरक्षणाची जबाबदारी चंद्रराव मोरे यांच्याकडे सोपवली. मोरे आपल्याजवळ १२ हजार घोडेस्वार बाळगून असतं. मोरे घराण्यातील प्रमुखाला चंद्रराव हा किताब मिळत असे. मोरे घराण्यातील शासक विजापूरच्या दरबाराला एकनिष्ठ राहत असतं. त्यामुळे साहजिकच शिवाजी आणि तत्कालीन राज्य करणारा चंद्रराव यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

चंद्रराव मोर्यांशी झालेल्या संघर्षाची कारणे :-

१) स्वराज्याच्या प्रयत्नात सर्वांचेच सहकार्य आवश्यक होते आणि त्याकरिता जहागीरदार मध्ये युती निर्माण करण्याचे प्रयत्न शिवरायांनी चालविले होते.त्यानुसार मावळ प्रांतत युती घडून आलेली होती. परंतु निरा आणि कृष्णा या प्रदेशातील जहागिरदार यांत एकजूट होऊ नये असेच प्रयत्न चंद्रराव मोरे याने चालविले होते. यांतून शिवाजी व मोरे यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

२) शिवाजीच्या जहागिरीतून पळून आलेल्या अनेक गुन्हेगारांना चंद्रराव मोरे याने आपल्या जहागिरीत उघडपणे आश्रय दिला. चंद्रराव ची ही आगळीक शिवाजीने सहन करणे शक्य नव्हते.

३) शिवरायांना ताबडतोब मोगलांवर किंवा आदिलशहावर हल्ला चढवायचे नव्हता,तरी पुढेमागे असा संघर्ष होणारच याबत त्यांना खात्री होती. तसे झाल्यास जावळीच्या प्रदेशाचा उत्तम उपयोग करून घेण्यासारखा होता. त्याठिकाणी लष्करी तळ स्थापन करणे अत्यंत सोपे होते.

४) जावळी जिंकून घेण्याकरिता दक्षिणेतील राजकीय स्थिती सुद्धा अनुकूल होती.मोहम्मद अदिलंशहा हा मृत्यूशय्येवर पडला होता आणि त्याच्या दरबारात विविध कारस्थानांना नुसता ऊत आलेला होता वाई प्रांताचा सामर्थ्यशाली सुभेदार अफजलखान हाई नुकताच कर्नाटकाच्या स्वारीवर गेलेला होता. दक्षिणेतील सुभ्यावार राजपुत्र औरंगजेब यांची सुभेदार म्हणून नुकतीच नेमणूक झालेली होती. जावळीच्या स्वारी विषयी उदासीन होता शिवाजींनी या सर्व राजकीय परिस्थितीचा जावळी येथील स्वरीकरिता उपयोग करून घेतला.

४) चंद्रराव मोरे यांचा पाडाव करण्याची सर्वांत प्रमुख कारण म्हणजे तो शिवाजीच्या हिंदवी स्वराज्याच्या ध्येयाच्या आड येत होता हे होय. जे जे मराठी जागीरदार स्वराज्यस्थापनेच्या आड येतील त्यांना वठणीवर आणायचे हे शिवाजीने ठरवून ठेवले होते. या पार्श्वभूमीवर सभासद बखरीमध्ये "चंद्रराव मोरे यास मारल्याविरहित राज्य साधत नाही" हे शिवाजीराजांच्या तोंडचे वाक्य अतिशय अर्थपूर्ण आहे, असे समजले पाहिजे. स्वराज्य स्थापन करण्याकरिता जावळी घेणे अत्यंत आवश्यक होते हेच यावरून दिसून येते.

५) दौलतराव मोरे यांच्या मृत्यू झाल्यानंतर चंद्रराव किताब आपल्याला मिळावा म्हणून मोरे घराण्यातील अनेकांनी प्रयत्न चालविले होते. परंतु दौलतरावाच्या पत्नीला मोरे घराण्यातील खरा वारस यशवंतराव यालाच वारस म्हणून निवडायची होते. तिने शिवाजी ना मदतीची विनंती केली आणि त्यामुळे यशवंतरावांना वारसाहक्क मिळू शकला. शिवाजीचा हा उपकार न जाणता यशवंतराव आणि त्याचा कारभारी हनुमंतराव हे दोघेही अफजल खानाला जाऊन मिळाली आणि शिवाजीविरुद्ध नाना प्रकारची कारस्थाने करू लागली. या विश्वासघाताचा सूड म्हणून शिवाजीने जावळीवर स्वारी करण्याचा निश्चय केला.

६) शिवाजीचा बंदोबस्त करण्याकरता म्हणून आदिलशाही दरबाराने शामराज या सरदारास प्रचंड फौज घेऊन पाठविले. त्यावेळी त्याला चंद्रराव मोरे याने सर्व प्रकारे सहाय्य केले. पलीकडे अचानक हल्ला चढवून शिवाजीने दरी श्यामराजचा पराभव केला तरी चंद्रराव मोरे यांच्या विश्वासघाती पणा शिवाजी कधीच विसरला नाही आणि म्हणूनच शिवाजीने जावळी जिंकण्याचा दृढनिश्चय केला.

जावळीवरील हल्ला :-

वरील कारणांवरून चंद्रराव मोरे आणि शिवाजी यांच्यात वैमनस्य निर्माण झाले ही गोष्ट आपण पाहिले. स्वराज्य स्थापन करण्यात चंद्रराव मोरे हा मोठाच अडथळा आहे हे शिवाजीने ओळखले होते आणि म्हणूनच चंद्र रावाचा पक्का बंदोबस्त करण्याचे शिवाजीने ठरविले. परंतु युद्ध करण्यापूर्वी समूहचाराने चंद्रराव वळत असेल तर पहावे म्हणून शिवाजीने चंद्ररावाला एक निरोप पाठविला. त्या निरोपात "आम्ही या प्रदेशातले खरे राजे आम्हास हे राज्यश्री शंभुने दिले आहे तेव्हा विनाकारण अभिमान न दाखविता आम्हाला अंकित व्हावे. अंकित न झाल्यास तुमची जावळी ताब्यात घेऊन तुम्हास आम्ही कैदेत टाकू" असे म्हटले होते. सत्तेने चंद्रराव मोरे उन्मत झाला होता. त्याने "तुम्ही काल राजे जाहला. तुम्हास राज्य कोणी दिले? आपल्या घरी आपणास फुकटचे राजे म्हणून घेतले तर कोण मानेल? असे अपमानकारक उत्तर पाठविले. या निरोपा मूळे शिवाजीने चंद्रराव मोरे याचा नाश करण्याचा आपला निश्चय पक्का केला.

शिवाजी महाराजांनी जावळीवर सरळ सरळ लष्करी मोहीम काढली आणि 15 जानेवारी 1656 रोजी त्यांनी जावळीवर हल्ला चढविला, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या हल्ल्यात केवळ सहा तासांत जावळी शिवाजीच्या ताब्यात आली. यावेळी चंद्रराव पळून गेला आणि त्याच्या दोन मुलांनी रायरी या ठिकाणी आश्रय घेतला. चंद्रराव मोरे चा सहाय्यक हनुमंतराव याने काही सैनिक एकत्रित करून शिवाजीविरुद्ध उपद्रव चालविला. तेव्हा शिवाजीने संभाजी कावजी याला पाठवून त्याचाही बंदोबस्त केला.

जावळी ताब्यात आल्यानंतर शिवाजीने चंद्ररावाचा लगेच पडला केला नाही. जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याकरिता शिवाजीने जावळी या ठिकाणी अडीच महिने मुक्काम केला. त्यानुसार शिवाजी महाराजांनी रायरी किल्ल्याला वेढा दिला. हा वेढा सतत तीन महिने चालू होता. शेवटी चंद्रराव मोरे यांना शरणागती घ्यावी लागली. 1656 च्या मे महिन्यात रायरी किल्ला शिवाजी च्या ताब्यात आला. या सर्व प्रकरणात चंद्ररावाचे वर्तन अत्यंत निंध्य होते म्हणून शिवाजीने त्यास ठार मारले. तथापि त्यांच्या दोन मुलांना मात्र जीवनदान देऊन पुण्यात कैदेस ठेवले. परंतु लवकर या दोन्ही मुलांनी आदिलशाही सरदार मुधोळकर, बाजी घोरपडे यांच्याशी संधान बांधले म्हणून, या बंधूंना ताबडतोब ठार मारले. अशा रीतीने शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे आणि त्याच्या घराण्याचा अत्यंत कठोरपणे बंदोबस्त केला.

✍️संकलन : सुमित रवि सरवदे.


पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट