शहाजी राजे हे छत्रपती नव्हते. छत्रपती होण्यासाठी आणि स्वराज्याची स्थापना करण्यासाठी त्यांनीही तितकेच प्रयत्न केले होते. परंतु शहाजी राजांच सर्व चरित्र पाहता त्यांचे प्रयत्न दुर्दैवीरित्या निष्फळ गेले. असो शहाजी राजे हे चितोडच्या सिसोदिया राजपूत वंशातील होते. मेवाडात चितोड व सिसोदे किंवा सिसोदिया अशी एकाच वंशाची दोन राज्ये होती. खिलजीमुळे मेवाड पडले त्यावेळी रत्नसिंगला मदत करण्यास आलेला सिसोद्याचा लक्ष्मणसिंगही मारला गेला. त्याचे आठ पैकी सात मुलगे मारले गेले. आठवा अजयसिंग पुढील राणा झाला. अजयसिंगचे दोन मुलगे सुजनसिंग व क्षेमसिंग हे दक्षिणेत आले (१३३४). अजयसिंगने या दोघांपैकी कोणालाच राणा न करता आपल्या पुतण्याला हमीरला राणा केले. सुजनसिंगचा पाचवा वंशज ‘उग्रसेन’ त्याला दोन मुलं कर्णसिंग व शुभकृष्ण. कर्णसिंगने घोरपड लावून युद्ध जिंकल्याने ते ‘घोरपडे’ तर शुभकृष्णचे तिसरे वंशज बाबाजी. बाबाजींचे पुत्र मालोजी, मालोजींचे पुत्र शहाजी. त्यामुळे शहाजी राजे हे सिसोदीया रजपूत होते[1]. संदर्भ: मराठा रियासत सरदेसाई
येथे रियासतकारांनी अगदी तपशिलात जाऊन माहिती दिली आहे. भोसे गावातील 'भोसाजी' यांच्यापासून पुढे भोसले नाव प्रचलित झाले असे वा सी बेंद्रे यांचे म्हणणे आहे परंतु रियासतकार गो स सरदेसाई यांनी हि गोष्ट खरी आहे असे मानलेले नाही. केवळ नावाच्या सांधर्म्यावरून बेंद्रेंनी हा निष्कर्ष काढला आहे असे दिसते. मराठी रियासतीतील नवीन संदर्भ खालीलप्रमाणे.
धन्यवाद.
तळटीपा
महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरें, इतिहासकार राजवाडे यांच्या मते भोंसले घराण्याचा सिसोदिया घराण्याशी संबंध नाही. परंतु अन्य इतिहासकार मानतात की भोंसले हे मेवाड च्या राजपूत वंशातील आहेत. काही जण असेही मानतात की भोंसला घराणे हे कर्नाटकच्या होयसला घराण्याचे वंशज आहेत.
शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकावेळी जेव्हा त्यांच्या क्षत्रिय असण्यावर प्रश्न उठवण्यात आले, तेव्हा काशीच्या गागाभट्टानी भोंसल्यांची वंशावळ काढली आणि त्यांना क्षत्रिय राजपूत सिसोदियांचे वंशज सिद्ध केले.
सिसोदिया राजपुतांची वंशावळ खालीलप्रमाणे:
१. महाराणा सज्जन सिंग (१२९०-13५५)
२. महाराणा दिलीप सिंग (१३27–१३६७)
३. महाराणा सिद्धाजी (१३३९-१३९८)
४. महाराणा भोसाजी (१३६०-१४०७) - हे दक्खनेत उतरले आणि इथेच राहिले.
५. देवराज भोंसले (१३८2-१४२२)
६. इंद्रसेन भोंसले (१४०३-१४५५)
७. करणसिंग भोंसले (१४२४-१४६९)
८. संभाजी भोंसले
९. बाबाजी भोंसले (१५४८-१५९९)
१०. मालोजी भोंसले (१५७०-१६०७)
११. शहाजी भोंसले (१५९५-१६६४)
(सदर माहितीस निश्चित असा ऐतिहासिक पुरावा नाही. विविध स्रोतांमधून हे एकत्र केले आहे, त्यामुळे विश्वासार्हतेची हमी नाही.)
👉आपल उत्तर बरोबर असण्याची जास्त शकता आहे ,परंतु आजकाल मी सांगेल किंवा भाषण करेल तोच खरा इतिहास अस सांगितले जाते त्यामुळे आपल्याकडून समर्पक उत्तर मिळाले धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा