शिवरायांनी केलेले 8 विवाह हे काही गैर नाहीत.त्या काळी बहुपत्निकात्वाची सर्वत्र रुढी/परंपरा होती.
शिवरायांनी केलेली सर्व विवाह हे त्या समयीच्या नामवंत व वतनदार घराण्यात केले. हेतू एवढाच होता की ही नामवंत मराठे घराणे आपले नातेवाईक/ सोयरिक होतील मग साहजिकच त्यांचे व त्यांच्याही जवळच्या माणसांचे आपल्याला स्वराज्यस्थापनेच्या कार्यात मोलाचे सहाय्य लाभेल .
महाराष्ट्रातील विखुरलेला मराठा एकतेच्या सूत्रात गुंफावा आणि भूमिपुत्रांचे स्वराज्य निर्माण करावे या उदात्त हेतूने शहाजीराजे व जिजामाता यांनी शिवरायांचे 8 विवाह केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा