हा ब्लॉग शोधा

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गणोजी शिर्केच पुढे काय झालं? त्याचा मृत्यू कधी व कसा झाला?

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर गणोजी शिर्केच पुढे काय झालं? त्याचा मृत्यू कधी व कसा झाला?

मुळात संभाजी महाराजांच्या मृत्यूला किंवा पकडण्याबाबत गणोजी शिर्के जबाबदार आहे असा एकही समकलींनपुरावा नाही. इंग्रज दप्तर, मुघल पत्र मध्ये हे लिहलेले नाही.

संभाजी महाराजांचा मुलगा शाहू महाराज मुघल कैदेतून सुटले. त्यांची पहिली पत्नी सकवारबई ह्या शिर्के कुटुंबातील.जर आपल्या पित्याच्या मृत्यूला गणोजी शिर्के जबाबदार असतील तर त्यांचे घरातल्या मुलीशी शाहू महाराजांनी का लग्न केले असते. ?

झुल्फिकारखान ने राजाराम महाराज जिंजी किल्ल्यावर असताना वेढा घालून बसले होते, त्या वेढ्या मध्ये गणोजी शिर्के मुघल कडून होते, बाळाजी आवाजी चिटणीस (ज्यांना संभाजी महाराजांनी हत्ती खाली दिले होते) त्यांचा धाकटा चिरंजीव खंडो बल्लाळ यांनी गणोजी शिर्के याना स्वतःचे संगमेश्वर चे वतन दिले आणि गणोजी शिर्के ला राजाराम महाराज यांना वेढ्या तुन सुटका करण्यास सांगितले. गणोजी शिर्के याचा मृत्यू नैसर्गिक झाला (झोपेत मृत्यू झाला).केंव्हा झाला हे नक्की सांगता येत नाही.

👉त्या वेळी तोंडावर ऊशी ठेवून दाबण्याचा प्रघात होता की नव्हता याची नेमकी माहिती नाही ।पण सर्रास हत्तीच्यापाई देण्याची मोकळीक असता ,ऊशी सारख्यामध्यम वर्गीय माझ्या कल्पनेची गरजच काय?

गणोजी सामान्य मृत्यु मेला नसेल ही शंभो भक्त म्हणुन अपेक्षा करु या ।बाकी ईतिहास जाणो ।

👉देव आहे. त्याने गणोजी राजे ह्यांना कौल दिला , आणि चिटणीस, चा पोपट झाला

गणोजी राजे ह्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू झाला आणि त्याचे स्वराज्याशी आणि अप्त स्वकियांशी उत्तम संबंध होते.

त्याने आणि राणी येसूबाई साहेब ह्यांनी स्वराज्य बांधणीसाठी मोलाची मदत केली. चिटणीस ने ते वैभव हडप याचा प्रयत्न केला. पण दैव नेहेमी सत्याला साथ देते, त्यानुसार गणोजी राजे सर्वाचे लाडके होते. चिटणीस सोडून ज्याची जळीत नजर , पोटात शूळ आणि डोक्यात धूळ वजा राख होती

👉माझ्या वाचनात आलेल्या

लेखक विश्वास पाटील यांच्या "संभाजी"

कादंबरीत तर गणोजी शिर्के यांचा या कटातील सहभाग असल्या बद्दल सविस्तर लिखाण आलेले आहे…

कृपया योग्य काय ते मार्गदर्शन करावे…🙏

👉Mr. Ashish, Thank you, for narrative answer. There is an another question in my mind. What was name of Sambhjimaharaj's son? In the TV serial, name was shown as Shivaji (S/o Yesubai) and both Yesubai and Shivaji were taken in custody by Aurangjeb. Sambhjimaharaj was killed at that time. Then did Shahu had original name as Shivaji?

👉No sir.. the original name of Rani yesubai and Chatrapati Sambhaji Maharaj' son was ' shahu' Maharaj … Shivaji and shahu was different names…

👉नाही मॅडम, छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईंच्या पुत्राचे खरे नाव हे 'शिवाजीराजे' हेच ठेवले होते पण पुढे महाराणी व त्यांचे पुत्र 'शिवाजीराजे' हे मुघलांच्या कैदेत गेल्यावर औरंगजेबने त्यांचे नामकरण 'शाहू' असे केले. व पुढे तेच सर्वश्रुत झाले.

👉कृपया शक्य असल्यास आधार द्यावा, जर आपली माहिती खरी असेलतर छत्रपतींची वंशावळ अभ्यासताना याचा खूप उपयोग होईल. कारण मी देखील आजवर महाराणी येसूबाई आणि त्यांचे पुत्र शाहू राजे असाच उल्लेख ऐकलेला आहे.

♨️गणोजी शिर्के यांचे पुढे काय झाले, त्यांचा अंत कसा झाला याबद्दल काही नोंद मिळत नाही.

परंतु ते शेवटपर्यंत मोगलांच्या चाकरीतच राहिले. पुढे राजाराम महाराजांचे व्याही सुद्धा झाले.

राजाराम महाराज जेव्हा जिंजीच्या वेढ्यात अडकले होते तेव्हा खंडो बल्लाळ यांनी स्वतःचे दाभोळ चे वतन गणोजी शिर्क्यांना दिले म्हणून त्यांनी राजाराम महाराजांची वेढ्यातून सुटकेस मदत केली.

खंडो बल्लाळ राजाराम महाराजांच्या सुटकेसाठी त्यांचे(स्वतःचे) दाभोळचे वतन शिर्क्यांना देताना म्हणाले होते की,

" स्वामिकार्यापेक्षा वतनच का पण जीवितदेखील आम्हाला अधिक नाही. स्वामींचे पाय हेच आमचे सर्वस्व आहे."

ईथपर्यंतच गणोजी बाबत इतिहासात नोंद मिळते.

धन्यवाद ।

👉ते वतन घेताना गणोजी शिर्के याना काहीच कसं वाटलं नाही ? शेवटी त्यानी वतनाची भूक भागवून घेतलीच.त्याना औरंगजेबानी वतन दिल्याचे दिसत नाही.

👉वतन घेतले नाही ते गणोजी राजें शिर्के ह्यांचेच होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि पिलाजी राव राजेशिर्के ह्यांच्यातील करारा नुसार.

गणोजी राजे ह्यांची भूक भागली असे नसून चिटणीस चा पोपट झाला हे खरे सत्य आहे. आणि चिटणीस साठी हे सत्य जरा जास्तच कटू आहे , तेव्हा सहन कर आता

त्रास चिटणीस ला झाला कारण त्याला दाभोळ वतन हडपता आले नाही म्हणून .. आणि त्यामुळे चीड चीड, आणि त्यामुळे सर्वत्र फाटक्या तोंडाचा चिटणीस शाब्दिक चीड चीड करत फिरत राहिला. सर्वांना आता सर्व माहीत झाले, तरी अजून खोड जात नाही. असो, त्याने कोणाला काही फरक पडत नाही

👉ओंकार, थोडा नीट अभ्यास कर, अर्धवट अभ्यास गैरसमज पसरवत असतो. अभ्यास कमी पडतो आहे.

गणोजी राजे शेवट पर्यंत स्वराज्याच्या सेवेत होते. मुघलांच्या विरोधात औरंगजेबाच्य वेढ्यातून राजाराम महाराजांना सोडवून मुघलांशी कायमचे वैर गणोजी राजे ह्यांनी घेतले होते, तेव्हा मुघल कडे चाकरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

👉थोडा नीट अभ्यास कर, अर्धवट अभ्यास गैरसमज पसरवत असतो. अभ्यास कमी पडतो आहे. गणोजी राजे शेवट पर्यंत स्वराज्याच्या चाकरीत होते. मुघलांच्या विरोधात (औरंगजेबाच्य वेढ्यातून राजाराम महाराजांना सोडवून मुघलांशी कायमचे वैर गणोजी राजे ह्यांनी घेतले होते, तेव्हा मुघल कडे चाकरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

शिवाय दाभोळ वतन चिटणीस चे होते हे हाय लाईट करून लिहिले आहे. आणि तोच खरा प्रॉब्लेम आहे. दाभोळ हा चिटणीस च विक पॉइंट .

गणोजी राजेंना वतन गेले ह्यांच्या पेक्षा चिटणीस चे स्वतः चे दाभोळ गेले हा खरा प्रॉब्लेम आहे.

या शिवाय, खंडो चिटणीस ला गणोजी राजे आणि राणी येसूबाई (राजे शिर्के) ह्यांनी कित्येक वेळा मदत केली. इतकेच नव्हे तर हट्टी निळू बा चिटणीसचा देखील हट्ट पुरवला. ह्या सगळ्याचा उल्लेख हेतुपुरस्सर दाबला जातो हे अनाकलनीय आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट