हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांचे वंशज हयात आहेत का? असल्यास, आज त्यांचा व्यवसाय काय आहे?

शिवाजी महाराजांचे वंशज हयात आहेत का? असल्यास, आज त्यांचा व्यवसाय काय आहे?

होय. छत्रपतींचे वंशज हयात आहेत.

छ. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची विभागणी दोन गाद्यांमध्ये झाली.

  1. सातारा
  2. कोल्हापूर

छ. संभाजी महाराजांचे (छ. शिवाजमहाराजांचे पुत्र क्र. 1) पुत्र छ. शाहू महाराज हे साताऱ्याच्या गादीचे संस्थापक, तर छ. राजाराममहाराजांच्या (छ. शिवाजमहाराजांचे पुत्र क्र. 2) पत्नी छ. ताराराणीयांनी आपल्या पुत्रास दुसऱ्या शिवाजीस छत्रपती घोषित करून कोल्हापूरची गादी स्थापन केली.

साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे छ. शिवाजी महाराजांचे 13 वे थेट वंशज मानले जातात. ते 2019 च्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.

तर, कोल्हापूरच्या गादीचे वंशज युवराज संभाजी राजे छत्रपती हे भारतीय जनता पक्षातर्फे 2016 साली राज्यसभेत नेमले गेलेले खासदार आहेत.

पण दोघांपैकी कोणीही शिवाजी महाराजांचे रक्ताचे वंशज नाहीत. कारण दोन्ही गाद्यांमध्ये अनेक दत्तकविधाने झाली आहेत.

आता शिवाजी महाराजांच्या मुलींकडून कोणी वंशज हयात आहेत की नाही याबद्दल कल्पना नाही.

👉आपल्यासारखंच माझंही मत आहे. पण कोणी मानायला तयार नाही. माझा एकच प्रश्न आहे . हे उदयनराजे भोसले कुठून आले आणि त्यांच्याजवळची प्रॉपर्टी शिवाजी महाराजांकडून वारसाहक्काने आली आहे असं ते कसं म्हणतात. मूळ शाहू महाराज आणि प्रतापसिंह भोसले हे शेवटचे. असेही माझ्या वाचनात आले आहे.मूळ इतिहास स्वार्थी लोकांनी लपवून ठेवून त्यांनी आपल्या सोयीचा इतिहास लिहून घेतला असावा आणि तोच लोकांच्या माथी मारला.

👉शिवाजी महाराज यांच्या वंशजाच्या दोन गाद्या होत्या एक सातारा दुसरी कोल्हापूर

सातारा गादी दत्तक विधान असले तरी दुसरे रामराजा यांनी दत्तक घेतलेले वंशज हे विठोजी भोसले यांचे पुत्र होते विठोजी भोसले हे राजाराम महाराज यांचे थेट वंशज होते राजाराम महाराज यांना दोन पुत्र होते त्यातीलच एकाचे विठोजी भोसले वंशज त्याच वंशाजाची सातारची गादी पुढे चालत आली म्हणून सातारची गादी ही थेट वंशज आहे

👉शिवाजी महाराजांचे वंशज

  1. नागपूरचे भोसले
  2. अक्कलकोटचे भोसले
  3. सावंतवाडी
  4. सातारा
  5. कोल्हापूर
  6. तंजावर

येथे आहेत.

👉अक्कलकोटचे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज नसुन साताऱ्याचे शाहु महाराजंचे मानसपुत्र होते. त्यांचे मुळ आडनाव हे लोखंडे असुन ते पारध येथील पाटील होते . शाहु महाराज जेव्हा मोगलांच्या कैदेतून सुटले त्यावेळी पारध मध्ये त्यांचे व तेथील पाटलाचे छोटी लढाई झाली होती , त्या लढाईत त्यांना जय मिळाला . लोखंडेच्या सुनेने तीचे लहान बाळ शाहु महाराज यांच्या पायावर ठेवून आशीर्वाद मागितला होता, शुभ शकुन झाल्यामुळे त्यांनी त्या बाळाचे नाव फत्तेसिंह ठेवून साताऱ्यास घेवून आले. व पुढे त्यांना अक्कलकोटची जहागिरी दिली.

संदर्भ —मराठी दफ्तर रुमाल (१)

श्रीमंत महाराज भोसले यांची बखर

👉सावंतवाडीचे भोसले हे सावंत भोसले.आदिलशाहीचे मांडलिक. त्यांचा शिवछत्रपतीशी शत्रुत्वाचाच संबंध होता

👉उदयन राजे हे कोणत्या घरण्यातील आहेत

त्याबद्दल सांगा

👉त्यांचा मुलगा संभाजी राजे त्यांची मुले असतील ना

👉मुलींकडून आहेत

👉छ. उदयनराजे भोसले हे रक्ताने वंशज आहेत.

👉दोन्ही पण गादया रक्ताच्याच आहे

👉नाही

👉सातारा गादी शाहू महाराज यांनी कोल्हपुर गादीचे रामराजे यांना दत्तक घेतले आणि कोल्हपुर गादिने त्यांच्याच मुलीच्या मुलाला म्हणजे शाहू महाराजांना दत्तक घेतले

👉काही सांगता येत नााही

👉कोल्हापूर गादीवर यशवंतराव घाटगे दत्तक आहेत

पण सातारा गादीवर दत्तक कोण आहे??

👉राजकारण…

छायाचित्र: गुगल वरून.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट