हा ब्लॉग शोधा

शिवाजी महाराजांची वंशावळ सांगू शकाल का?

शिवाजी महाराजांची वंशावळ सांगू शकाल का?

पुढील माहिती ही काही पुराणे , लोककथा तर काही ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारित असेल जी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशवेलीची माहिती देते

  1. ब्रह्मदेव
  2. मरीची ऋषी
  3. कश्यप ऋषी
  4. विवस्वान / सूर्य
  5. श्राद्धदेव / वैवस्वत मनु
  6. ईक्श्वाकु ( अयोध्येचा राजा )
  7. विकुक्षी / शशाद
  8. पुरंजय / ककुत्स्थ
  9. अनेता / आयोधन / सुयोधन
  10. पृथु
  11. दृषदश्व / विश्वगाश्व
  12. आर्द / आद्र / चांद्र
  13. युवणाश्व
  14. श्रावस्त
  15. वत्सक
  16. बृहदश्व
  17. कुवलाश्व
  18. दृढाश्व
  19. हर्यश्व
  20. निकुंभ
  21. संहताश्व
  22. कृशाश्व
  23. प्रसेनजित
  24. युवणाश्व
  25. मांधाता
  26. पुरुकुत्स
  27. त्रसदस्यु
  28. संभूत
  29. अनरज्य
  30. त्रसदश्व
  31. हर्यश्व
  32. वसुमान
  33. त्रिधन्वा
  34. त्रय्यरूण
  35. त्रिशंकू
  36. हरिश्चंद्र
  37. रोहिताश्व
  38. हरित
  39. चंचू
  40. विजय
  41. भिरुक / करूक / रुरुक
  42. वृक
  43. बाहू
  44. सगर
  45. असमंजा
  46. अंशुमान
  47. दिलीप
  48. भगीरथ
  49. श्रुत
  50. नाभाग
  51. अंबरिष
  52. सिंधुद्वीप
  53. आयुताजित
  54. ऋतुपर्व
  55. सर्वेकाम
  56. सुदास
  57. सौदास / कलमाषपाद
  58. सर्वकर्मा
  59. अश्मक
  60. उरकाम
  61. मूलक
  62. शतरथ
  63. इडविड
  64. वृद्धशर्मा
  65. विश्वसह
  66. दिलीप
  67. रघु
  68. अज
  69. दशरथ
  70. प्रभू श्रीराम चंद्र
  71. लव ( लव ने लवकोट अर्थात आजचे लाहोर स्थापन केले व तेथे राजधानी नेली , त्याच्या वंशजांची नावे अजून माझ्या वाचनात आली नाही परंतु यवन आक्रमणानंतर ते गुजरात मध्ये आले व तेथे आदित्य राजवंश नावाने राज्य करू लागले नंतर त्यांच्या वंशातील ग्रहादित्य / गुहिल ने चित्तोडला गुहिलोत राजवंश स्थापला व रावल म्हणजे राजा ही वंशपरंपरागत पदवी लावली )
  72. ग्रहादित्य
  73. भोज
  74. महेंद्र
  75. नाग
  76. शील
  77. अपराजित
  78. महेंद्र
  79. कालभोज ( इतिहास प्रसिद्ध बाप्पा रावल )
  80. खुम्माण
  81. मत्तक
  82. भर्तृपट्ट
  83. सिंह
  84. खुम्माण
  85. महायक
  86. खुम्माण
  87. भर्तृपट्ट
  88. अल्लत
  89. नरवाहन
  90. शालिवाहन
  91. शक्तीकुमार
  92. अंबाप्रसाद
  93. शुचिवर्मा
  94. नरवर्मा
  95. किर्तीवर्मा
  96. योगराज
  97. वैराट
  98. वंशपाल
  99. वैरीसिंह
  100. विजयसिंह
  101. वैरीसिंह
  102. अरिसिंह
  103. चोड
  104. विक्रमसिंह
  105. रणसिंह ( रणसिंह ला दोन मूले होती ती राहप् व माहप् अश्या नावाची होती पैकी माहप् रावल अर्थात चित्तोड चे तर राहप् शिसोदा चे शासक झाले व त्यांनी राणा ही पदवी लावली व शिसोदिया वंश स्थापला )
  106. राहप्
  107. नरपती
  108. दिनकर
  109. जसकर्ण
  110. नागपाल
  111. कर्णपाल
  112. भुवनसिंह
  113. भीमसिंह
  114. जयसिंह
  115. लक्ष्मणसिंह ( राणा लक्ष्मणसिंह व त्यांचे ७ पुत्र अल्लाउद्दीन खिळजीशी लढत मारले गेले , तसेच चित्तोडचा रावल रत्नसिंह देखील मारला जाऊन त्याचा निर्वंश झाल्याने लक्ष्मणसिंहच्या जिवंत असलेल्या २ पुत्र अजयसिंह व अरिसिंह यांपैकीच एक चित्तोडचा वारस होता , पण अजयसिंहने अरिसिंह चा शूर मुलगा हंमीरसिंह यास राणा केल्याने अजयसिंहचे पुत्र सज्जनसिंह व क्षेमसिंह दक्षिणेत आले )
  116. अजयसिंह
  117. सज्जनसिंह
  118. दिलीपसिंह
  119. सिद्धजी / सिंहजी
  120. भैरवजी / भोसाजी ( यांच्या नावाने भोसले आडनाव पडले )
  121. देवराज
  122. उग्रसेन
  123. शुभकृष्ण ( वेरूळची जहागिरी मिळविली , यांच्या भावाचे करणसिंहचे वंशज स्वतः ला घोरपडे म्हणवतात )
  124. रुपसिंह
  125. भुमिंदजी
  126. धापजी
  127. बरहाटजी
  128. खेलोजी
  129. कर्णसिंह
  130. शंभुजी
  131. बाबाजीराजे
  132. मालोजीराजे ( पुणे , सुपे , चाकण , इंदापुरची जहागिरी मिळविली )
  133. शहाजीराजे
  134. छत्रपती श्री शिवाजी महाराज

। श्री भारत मातार्पणमस्तु ।

👉मला माफ करा, पण मला थोडीशी शंका आहे.

दोन पिढ्यांमधील अंतर ३०वर्षांचं आहे. आपण इथे ४०वर्ष समजू.

ह्याचा अर्थ शिवछत्रपती हे ब्रम्हदेवचे १३४वे वंशज आहेत.

१३४*४०= ५३६० वर्ष

ह्याचा अर्थ ब्रम्हदेव ५३६० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते.

महाभारत द्वापारयुगात घडले (अंदाजे ५०००वर्षांपूर्वी) असे म्हणतात; रामायण त्रैतायुगात (त्याच्याही १०००-२००० वर्षांपूर्वी) घडला. म्हणजे ब्रम्हदेवाच्या अस्तित्वाच्या आधी रामायण घडले.

👉शंका अगदी योग्य आहे पण लव नंतरच्या गृहादित्यापर्यंतच्या पिढ्या मला सापडल्या नाही त्याबद्दल क्षमा असावी .

👉काही पिढ्या महाभारतात भेटतील कर्णाच्या दविग्विजाच्या वर्णन शिवाजी सावंत त्यांच्या मृत्यूंजय मध्ये काही आहेत.

👉भारतीय कालगणणा समजण्यासाठी भगवदगीता जरूर वाचावी, माणसाचे आयुष्य प्रत्येक युगात वेगवेगळे होते, रामांनी 11,000 वर्षे राज्य केले. महाभारत द्वापार युगाच्या शेवटी झाले म्हणजे 5,000 वर्षांपूर्वी, व रामायण त्रेता युगाच्या शेवटी झाले म्हणजे 8,69,000 वर्षांपूर्वी झाले. त्या काळाचे साधूसंत लाख लाख वर्षे जगतं. सध्याचा कलियुगाचा शेवट 4,27,000 वर्षांनी होणार आहे. या कालगणनेला इंग्रजी मध्ये निओकाॅर्टेक्स टाईम म्हणतात.

👉आता तरी देशातील लोकांना खोटा इतिहास आणि भाकड कथा सांगणं बंद करा,

👉रामायण, महाभारत या घटना खर्या असून भारताने तसेच इतर अनेक देशांनी याला पुराव्यानिशी मान्यता दिली आहे, न्यायालयात सुध्दा शपथ घेताना हातात भगवतगीता दिली जाते, झोपलेल्याला उठवता येते, पण तुमच्या सारख्याला उठवणे म्हणजे गाढवासमोर गीता वाचण्यासारखे झाले. विष्णूचे सर्व आठ अवतार व नऊवा अवतार तथागत गौतम बुद्ध यांनाही आम्ही मानतो व पूजन करतो. आम्हाला त्यांच्या गोष्टी खोटा इतिहास व भाकड कथा वाटत नाही.

👉हजारो वर्षांपासून वेदांची आणि पुराणांची भीती दाखवू दाखवू तुम्ही समस्त हिंदू लोकांना गुलामीच्या बेडीत अडकून ठेवले आहे, विज्ञानाने कितीही क्रांती केली तरी शेवटपर्यंत तुम्ही लोकांना वेद आणि पुराणांचे प्रमाण देणार कारण तुम्हाला माहित आहे असे जर तुम्ही केले नाही तर येथील लोकं देवात आणि देवळात जाणे बंद करतील आणि तुम्ही लोकं बेकार व्हाल.

देवांची निर्मिती सुद्धा तुम्ही तुमच्या फायद्यासाठी केली आहे, तुम्ही स्वतः ला तर हिंदू मानणार नाही पण सगळ्या लोकांपुढे हिंदुत्ववाचे गोडवे गाल. तुम्ही स्वतः कोणताही देव मानणार नाही पण देव आहे हे समस्त हिंदूंना पटवून देणार. रामायण आणि महाभारता विषयी तर तुम्ही बोलायलाच नाही पाहिजे मनुस्मृती नंतर आता हेच तर तुमचे हत्यार आहे. महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, पेरियार रामस्वामी, संत तुकाराम, असंख्य समाजसुधारकांनी रामायण महाभारताविषयी किंवा देवांविषयी काय लिहले हे वेगळं सांगण्याची गरज नाही, महापुरुष्यांच्या विचारधारेला किंवा लेखणीला तुम्ही आव्हान तर नाही देऊ शकत ना..

👉कोणत्याही देशाची संस्कृती ही देव, देश(स्थान), धर्म यावर अवलंबून असते, फक्त पुरोगामी विचारांपेक्षा चाणक्य नितीचा अभ्यास करा, वरील तीन गोष्टी नाहीशा झाल्यास माणसे ख्रिश्चन अथवा मुस्लिम होण्यास प्रवृत्त होतात. बाटणारे लोकं कोणत्या समाजाचे असतात हे सर्वांना माहीत आहे, आज भारतात हिंदुत्व जपणारे लोकं आहेत म्हणूनच हिंदुस्थान आहे नाही तर तुमच्यासारखे लोकं वाढल्यावर पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. जगात प्रत्येक देश धर्मावर आधारित आहे, महाराष्ट्रात सुध्दा शिवाजी महाराजांनी हिंदु राजा म्हणून सिंहासन स्विकारले तुम्ही त्यांच्यापेक्षाही हुशार आहात, असे वाटते का तुम्हाला?

👉अरे तुम्ही काय सांगणार आम्हाला शिवाजी महाराजांविषयी? शिवाजी महाराजांचे मावळे बारा पगडजातीतील होते तरी पण महाराजांसाठी आणि स्वराज्य रक्षणासाठी जीव द्यायला आणि घ्यायला मागे पुढे पाहत नसायचे. ते मावळे आमच्या पूर्वजांपैकीच एक होते. पण त्याच शिवाजी महाराजांचे तुम्ही कुटील ब्राम्हणांनी राज्याभिषेकाच्या वेळी गागा भट्टाने कसा अपमान केला माहित असेलच, महाराजांची मराठा सत्ता संपवून स्वतःची छिनाल पेशवाई उभी केली आणि महाराजांच्या वंशजांना कूटनीतीने बाजूला केले विसरले ka भटांनो.

👉आता मला कळाले तुमची लायकी काय आहे, मी कोराच्या प्लॅटफॉर्म वर होतो म्हणून तुम्हाला सुधारण्याचा प्रयत्न केला पण…फक्त माणसेच सुधारतात इतर नाही

👉शेवटी तुम्ही आले की नाही जातीवर, मी तुम्हाला तुमची जात विचारली का? मी तुमच्या जातीबद्दल द्वेष भावनेने बोललो का? मी हिंदु संस्कृती बद्दल बोलत आहे. आम्ही जातीपाती मानत नाही, एक काळ होता जो इंग्रजांनी 200 वर्षे फोडा-झोडा राज्य करा हे तत्व अवलंबून हिंदुंमधील जातीमध्ये भांडणे लावून ब्रिटिश राज्य स्थापन केले. या अगोदर शिवाजी महाराज व पेशवे यांनी जाती द्वेष कधीच केला नाही. तुम्हाला ब्रिगेडींची पुस्तके वाचून खरा इतिहास कळणारच नाही, ब्रिगेडींना एखादा पुरावा मागितल्यास त्यांची तोंडे बघण्यासारखी होतात. ब्राम्हण लोकं आता जातपात विसरून एकत्र जेवतात. इंग्रजांच्या काळातील आमच्या चूका आम्ही सुधरल्यात, तसा कायदा ही केला आहे, आता पुन्हा जाती द्वेष पसरून तुम्हाला भारतात मुस्लिम-इंग्रज राज्य आणायचय का? तुम्ही पुन्हा जातीला खतं-पाणी घालत आहात. जी जात नाही, ती जात असते, पण ती आपल्या घरातच ठेऊया, समाजात मोकळ्या मनाने सहभागी होऊ, माझ्या मनात तुमच्याबद्दल जराही राग नाही. आपल्याला भारतातील जाती मिटवायच्यात की वाढवायच्यात हे आधी ठरवा. ब्रिगेडी लोकांच्या नादी लागून तुम्ही समाजात फक्त फुट पाडताल, याने भारताचे भले होणार नाही. मागील 200 वर्षांच्या चुकांबद्दल आम्ही तुमची माफी मागतो, एवढा मोठेपणा करायलाच पाहिजे आपल्या देशासाठी.

👉बरोबर आहे इथं आपल्या दहा पिढ्या सांगता येणार नाही नीट

👉या उत्तराचे स्रोत सांगू शकाल का?

उत्तरात तसे पहिल्या भागातच नमूद केले आहे तरी पुन्हा एकदा खालील प्रमाणे पहा

१) ब्रह्मदेव ते प्रभू श्रीरामचंद्र पुराणं , रघुवंशम ( कालिदास लिखित )

२) ग्रहादित्य ते राणा लक्ष्मणसिंह , गुहिलोत राजवंश ( आंतरजालावर ( नेटवर ) शोधल्यास सापडेल )

३)राणा लक्ष्मणसिंह ते छत्रपती शिवाजी महाराज , Bhosale clan genealogy .

👉ह्यातील बाप्पा रावळ पासूनची वंशावळी मी स्वता: किशनगड (राजस्थान ) येथे भाटा कडे पाहीली आहे.

त्या आधीचीपण वंशावळ वर लिहील्याशी मॅच होणारी आहे पण पुसट व अस्पष्ट आहे.

👉चुकीची माहिती दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये सुरूवातीलाच ब्रम्हदेवांचा उल्लेख दिलेला आहे ब्रम्हदेव तर ब्राम्हण आहेत मग शिवाजी महाराज तर क्षत्रिय मराठा आहेत ब्राम्हण कसे असु शकतील ? साफ साफ चुकीचा संदर्भ दिलेला आहे इतिहासाची संपुर्ण माहिती असल्याशिवाय माहिती प्रसारित करू नये….

👉पुराणांना ठोस ऐतिहासिक पुरावा मानता येत नाही तरीही सम्पूर्ण सृष्टी व चारही वर्ण हे ब्राह्मदेवांपासूनच आले मानतात व त्यासाठी स्वतः थोडी पुराण वाचा.

ही वंशवेल स्वतः शिवछत्रपतींनी राज्याभिषेकाच्या वेळी मेवाडहुन मागविली होती तेव्हा ती मानायची की नाही हे आपण स्वतः ठरवावे.

सुरुवातीला वर्ण व्यवस्था होती ज्यात वर्ण कर्माने ठरत व म्हणून ऋषीपौत्र वैवस्वत मनु क्षत्रिय झाले व त्यांचे वंशज सूर्यवंशी क्षत्रिय.

👉मी या प्रश्नांची सर्व उत्तरे पाहिली पण मला सर्व उत्तरांमध्ये खूप सारी तफावत आढली आणि कोठलाही संदर्भ सापडला नाही ,प्रथम प्रश्न काय आहे समजून घेतले पाहिजे , छत्रपतींची भूतकाळातील वंशावळ का भविष्यकाळातील वंशावळ विचारली हे समजून घेतले पाहिजे तसेच छत्रपती हे ब्रह्मदेवांचे वंश आहे काही शक्य नाही आणि या यादीत काही नावे तर नुसतीच अतिशयोक्ती आहे .

👉नक्कीच हा आपल्या मान्य करण्याचा प्रश्न आहे, जेव्हा राज्याभिषेक करायचे ठरले तेव्हा ही वंशावळ खुद्द शिवरायांनी मेवाडच्या राजघराण्याकडून मिळवली व त्यांना ती मान्य होती, आता आजच्या युगात लोकांची देवाबद्दल धारणा बदलली असेल तरीही त्याकाळात लोकांना ते स्वीकार्य होते. त्यामुळे प्रत्यक्षात ते कुणाचे वंशज होते हे जरी माहिती नसले तरीही ते ज्यांना मानत होते त्यांचीच नावे मी सादर केली आहेत.

आणि वंशावळ विचारल्यावर कधीही कुणीही आपल्या पूर्वजांचीच नावे देतो कारण वंशजांची नावे द्यायला आपल्याकडे फार कमी लोकं असतात जी जास्तीत जास्त ४ पिढ्या बघतील. दुर्दैवाने शिवरायांनी तर तिसरी पिढीही नाही बघितली (फक्त नातू, नात नाही).

👉महाराजा !!! ह्या वंशावली मध्ये १००/१०५ नंतर कोणाचेही नाव सामाविस्त केले तर काय फरक पडतो ?मी हि ब्रम्हदेवाचा १४५ व वंशज आहे असे समजा .वंशावली साठी पुरावा पाहिजे . पुरण हि कोणताच पुरावा होऊ शकत नाहीत म्हणून १३२/१३४ पर्यंतच ग्राह्य धरावे. बाकी गंगा अर्पण !!!

👉ही उपलब्ध असलेली सर्वोत्तम वंशावळी आहे. इथे उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. एकच विनंती आहे की श्रीसंभाजी महाराजांपासुन उदयनमहाराजां पर्यंत पण वंशावळी जोडा.

👉छत्रपती शिवाजी महाराज

1छत्रपती संभाजी महाराज

पुत्र शाहू महाराज हे निपुत्रिक वारले

छत्रपती राजाराम महाराज

पुत्र 1 लहानवयात वारले

पुत्र 2 छत्रपती शिवाजी महाराज

पुत्र व राजाराम महाराजांचा नातू रामराजा सातारचे छत्रपती हे निपुत्रिक होते दत्तक परम्परा सुरु

पुत्र कोल्हापुर गादी छत्रपती संभाजी निपुत्रिक दत्तक परम्परा

👉छत्रपती शिवाजी महाराज राजपूत सिसोदिया कुळाचे होते. काही इतिहासकारांच्या मते चितोडच्या भोसाजीराणा या राजाच्या नावावरून या कुळाला भोसवंत अर्थात भोसले हे नाव मिळाले, तर काही इतिहासकारांच्या मते हजार वर्षांपूर्वी दक्षिणेकडील राजांना भोज ही संज्ञा होती, या भोजसंज्ञक राजाचे वंशज ते भोसले होय.

वंशावळ :-

वाचकांना काही अधिक माहिती असल्यास अगर काही दुरुस्त्या सुचवायच्या असल्यास जरूर टिप्पणीद्वारे सांगावे.

धन्यवाद!

स्रोत -

आम्हीच ते वेडे ज्यांना आस इतिहासाची

मराठा समाजाचा इतिहास माहीत नसेल किंवा मान्य नसेल असेच समूह बाकीच्या भाकडकथांचा निरर्थक कल्पनाविस्तार करून अप्रत्यक्षरित्या मराठा समाजाच्या अस्तित्वालाच आव्हान देत आहेत.

👉शिवाजी महाराजांचे पुर्वज हे चितोडचे भवसार घराणे होय. पुढे युद्धाच्या धामधुमीत त्यांचे काही पुर्वज महाराष्ट्रात आले आणि इकडेच स्थायिक झाले आणि कालांतराने भवसार हे आडनाव भोसले यात आडनावात रूढ झाले.

👉माहितीसाठी धन्यवाद!

आपण याचा स्रोत सांगू शकता का?

👉अगदी बरोबर.वरती कोणीतरी भवसार सांगत आहे हे मी पहिल्यांदा ऐकलं आहे.भवसार वगैरे आजीबात नाही

👉माझ्या संग्रही असलेली माहिती देत आहे. ह्यात छ. शिवाजी महाराज २०५ वे वंशज दिसत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट