👉हो,शिवाजी महाराजांचे भोसले घराणे हे 'सिसोदिया' रजपुतांपासून उगम पावले आहे.
👉हे सिसोदिया वंशीय उच्चवर्गीय क्षत्रिय होते.
👉खुद्द शिवाजी महाराजांना उदयपूर-चित्तोडच्या 'सिसोदिया' वंशाचा अभिमान होता.
👉त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी पंडितांनी त्यांच्या 'राजा' असण्याबद्दल शंका उपस्थित केल्या तेव्हा त्यांनी उदयपुरास आपली माणसे पाठविली आणि आपल्या कुळाबद्दल आणि वंशावळीबद्दल तपशीलवार माहिती आणली होती.
👉आता थोडेसे अधिक तपशिलात जाऊ.
👉अल्लाउद्दीन खिलजीने चितोडवर स्वारी केली तेव्हा त्या घराण्यातले सगळे पुरुष लढाईत मारले गेले.
👉फक्त अजयसिंह तेवढा जिवंत राहिला.तो राजा झाला,त्याला दोन मुले झाली सजनसिंह आणि दुसरा क्षेमसिंह.
👉अजयसिंहाने त्याच्या पश्चात आपल्या वडील भावाचा मुलगा 'हमीर' यास वारस ठरविल्यामुळे त्याची मुले सजनसिंह आणि क्षेमसिंह नाराज झाले आणि नशिबावर हवाला ठेऊन त्यांनी चितोड सोडले आणि दक्षिणेत महाराष्ट्रातील मराठवाड्यात आले.
👉त्यांचेच एक उत्तरकालीन वंशज म्हणजे बाबाजी भोसले.
👉बाबाजींचे पुत्र मालोजी आणि विठोजी.
👉मालोजींचे पुत्र शहाजी आणि शरीफजी.
👉शहाजींचे पुत्र संभाजी आणि शिवाजी ही अशी वंशावळ आहे.
धन्यवाद!
🤔मी कित्येक माझ्या मराठा समाजातील मित्रांना हेच निदर्शनास आणून देतो पण दुर्दैवाने अजूनही ते हे मानायलाच तयार नाहीत व त्यांना खरा इतिहास जाणून घेण्याची सुद्धा गरज वाटत नाही.
🤫कोल्हापूरच्या राजमहालाच्या संग्रहालयात शिवाजी महाराजांची वंशावळ पहावयास मिळते. मी पहिल्यांदा हे पाहिले तेव्हा मलाही आश्चर्य वाटले होते. मग मराठे नेमके कोण हाही प्रश्न पडला.
दुरुस्ती सुचवत आहे.शहाजीराजे व शरीफजी हे मालोजीराजे भोसले यांचे पुत्र होते.विठोजींचे नव्हे.
दुरुस्ती सुचविल्याबद्दल धन्यवाद!:)
👉याला सक्षम पुरावे आहेत काय?
👉राजस्थानातील भाट समाज वंशावळी लिहून ठेवण्याचे काम करतो.
👉त्यांचे मुख्य कामच वंशावळ्या तयार करण्याचे आहे.
👉दर तीन वर्षांनी ते यजमानांच्या घराला भेट देतात आणि नवीन माहिती त्यांच्या वहीत भरतात.
👉त्यांचा लेखाजोखा इतिहासातील महत्वाचा दस्तऐवज आहे.
👉आजही भाट समाजातील काही व्यक्ती हे काम इमानेइतबारे करतांना दिसतात.
♨️Shivaji Maharajancha aani Shisodiyancha kahihi sambandh nahi, ti Maharajanchi ek kheli asu shakte tyavelchya Bramhananna chup basavnyasathi, je Maharajanchya Rajyabhishekavar tyanchya Kshatriya naslyamude aakshep ghet hote,
👉Maharajanni ya bhamtyanna changlyach shitafine hool dili, aani mhanunach Swarajyatle va aas paas che sodun door Kashi chya Gaga bhatt kadun Rajyabhishek karavun ghetla.
👉म्हनजे सर्व मराठा क्षत्तिय आहेत तर
👉हो मी ९१ कलमी बखरीत वाचले आहे जी स्वतः शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्र्यंबक यांनी लिहिली होती.
👉असा प्रश्न दोनतीन प्रकारे विचारलेला समोर आला म्हणून हे लिहीतो. शिवाजी महाराजांचे महत्व हे त्यांच्या रजपूत असण्याने किंवा मराठी असण्याने कमी जास्त होणार आहे का?
एक मराठी म्हणून ते जर का रजपूत असतील तर मला जास्त अभिमान वाटला पाहिजे का? का ही मंडळी वाढीव लेबले लावायचा प्रयत्न करतात? रजपुतांच्या राणा कुंभ, राणा प्रताप आदि मंडळींनी त्याच्या परीने क्षत्रियांचे काम केले, जे दक्षिणेत विजयानगरचे राज्यकर्ते, शिवाजी महाराज यांनी केले. या सर्वांचेच आपण ऋणी आहोत.
♨️नक्कीच पण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊन समोरच्यांचे समाधान करायला हे उत्तर लिहिले कदाचित त्याने फक्त जिज्ञासा म्हणून विचारले असेल हे जाणून घ्यायला की त्यांचे पूर्वज कुठले होते?
👉हो. कारण कर्नाटकातील काही इतिहासकारांच्या मते महाराज हे होयसळ राजघराण्याचे वंशज आहेत.
👉भोसले हे आडनाव होयसळ ह्या शब्दातून आले आहे असे त्यांचे म्हणणे आहे.
महाराजांचे चरित्र थोडक्यात वाचण्यासाठी आपण खालील पोस्ट वाचा:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा