हा ब्लॉग शोधा

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर तंत्र कसे होते?

बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर तंत्र कसे होते?

४०० वर्षांनंतरही शिवरायांच्या कार्यकर्र्तृत्वाचा अंदाज बांधणे कठीण आहे. साहस आणि चातुर्याच्या जोरावर त्यांनी अनेक युद्धमोहिमांमध्ये विजय संपादन केला. यामागे शिवरायांची सक्षम गुप्तहेर यंत्रणा कारणीभूत ठरली. दुर्दैवाने शत्रूंनी रायगड किल्ला उद्ध्वस्त केल्याने शिवरायांच्या कालखंडावर प्रकाश टाकणारे अनेक पुरावे नष्ट झाले. त्यातच त्यांची गुप्तहेर यंत्रणा एवढी वेशांतर करून फिरत होती की काहीवेळेला महाराजांशिवाय इतरांना समजतही नव्हते की आपल्यासोबत फिरणारा आपला एक सहकारी गुप्तहेर म्हणून बातम्या पोहोचवितो आहे.

कुठल्याही लष्करात गुप्तहेरयंत्रणा जेवढी सक्षम असेल तेवढे विजयाचे गणित आणखी सोपे होत जाते. शिवकालखंडात गुप्तहेर हा तर लष्कराचा कणाच होता. लष्करातील प्रत्येक सरदाराबरोबर १० जासूद असून त्यांना वेगवेगळ्या प्रकारची नावे वापरण्यात आली होती. त्या एकप्रकारे गुप्तहेराच्या सांकेतिक संज्ञा म्हणता येतील.

त्यानुसार त्यांना कासीर, जासूद, हरकारा, राऊत, सांडणीस्वार, प्यादा, जिलीब, ढालाईत, फडवाईक, कागदी दूत, खिदमतगार असे सूचक शब्द वापरत असत. मध्ययुगीन कालखंडात गुप्तहेराचे जाळे प्रत्येक राजाबरोबर असायचे. त्यानुसार *मोगल दरबारात वाकनविस, सवाहनिगार, खुफियानिवास, हरकारा*

याप्रमाणे गुप्त वार्ताहर होते. परंतु स्वराज्याच्या गुप्तहेरांची सर त्यांना कधी आली नाही. जगातील जातीव्यवस्था ही

लष्करामुळेच कमी होण्यास मदत झाली. महाराजांनी तर समाजातील सर्वच उपेक्षितांना आपल्या लष्करात सामावून घेतले होते. त्यामुळे आजचे गोंधळी, पिंगळी, कुडबुडे जोशी, जरीमरी, कडक लक्ष्मीवाले, बहुरूपी यांच्यासारख्यांना यात सामिल करून घेतले. विविध रूपे घेऊन ही मंडळी शत्रूच्या गोटात घुसून माहिती बाहेर काढत असत. यातूनच करपल्लवी भाषेचा उगम झाला. तानाजी मालुसरे सिंहगड घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने गोंधळ्याचे रूप घेतलेले होते. तर अफझलखानाची माहिती काढण्याकरिता नानाजी प्रभू मुसेखुरेकर हे कडक लक्ष्मीच्या वेशात वाईत फिरत होते. तर शाहिस्तेखानाच्या वेळी केवळ गुप्तहेरांमुळेच एवढी धाडसी कामगिरी पार पाडता आली.

अलीकडील काळात झालेल्या संशोधनानुसार बहिर्जी नाईक हा शिवरायांच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख असून तो बहुधा रामोशी समाजाचा असावा. एकेदिवशी आपली कलाकारी दाखवत असता रत्नपारखी शिवरायांनी त्याच्यातील गुण हेरून त्याला गुप्तहेरांचे प्रमुख बनविले. नावाप्रमाणे हे

खातेही अतिशय गुप्तच असल्याने स्वराज्याच्या या यंत्रणेविषयी विशेष माहिती मिळू शकत नाही. बहिर्जीचा पूर्वेतिहास उपलब्ध होत नाही. परंतु तो सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत महाराजांच्या सेवेत कार्यरत असावा असे दिसते. कुठलीही मोहीम आखण्यापूर्वी बहिर्जीची पथकं संबंधित ठिकाणाची माहिती घेत असत आणि मगच पुढील बेत आखण्यात येई. फकिर, बैरागी, दरवेशी, भिकारी अशा नानाविध वेशात बहिर्जीची पथकं काम करत होती. फक्त मराठ्यांचे गुप्तहेर काम करत होते असे नाही तर शत्रूची पथकेही सर्वत्र फिरत असत. शाहिस्तेखानाचे २०० गुप्तहेर स्वराज्याच्या विविध भागात फिरत असताना बहिर्जीच्या गुप्तहेरांनी त्यांचा कधी काटा काढला हे खानाला समजलेसुद्धा नाही. त्यांच्या भरवशावर तो गाफील राहिला.

महाराजांची खरी कसोटी तर आग्राभेटीत दिसून येते. एखाद्या मगरीच्या जबड्यातून स्वत:ची सुटका करून घ्यावी अशी अवस्था राजांची होती. परंतु याही ठिकाणी बहिर्जीने आपल्या कलेची बाजी लावून फकिराच्या वेशात थेट बादशहा औरंगजेबाच्या दरबारात जाऊन बातम्या काढण्याची कामगिरी पार पाडली. बहिर्जीने काढलेल्या

मार्गावरूनच राजे स्वराज्यात परत आले. बहिर्जी एवढ्यावरच थांबला नाही तर शिवाजी महाराज हे आग््रयाच्या कैदेतून निसटले हे धाडसच होते. परंतु या वेळी उत्तर भारतात अशा अफवा पसरल्या की, शिवाजीला काळी जादू येते त्यामुळे ते अदृश्य होतात. किल्ल्याच्या तटावरून उडी मारू शकतात, हवेत उडू शकतात, कुठलेही रूप घेऊ शकतात. आश्चर्य म्हणजे इंग्रजांचा एक डॉक्टर थेवेनो हा या वेळी आग््रयातच असून त्याने आपल्या डायरीत हे सर्व लिहून ठेवलेले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या सर्व अफवा पसरविण्याचे काम स्वत: बहिर्जीने पार पाडले होते.

सुरतेवर महाराजांनी दोन वेळा स्वा-या केल्या. स्वारीच्या अगोदर बहिर्जीने २०० गुप्तहेर सुरतेमध्ये पेरून ठेवलेले होते. फकीर, बैरागी, व्यापा-याच्या वेशात जागोजागी जाऊन बहिर्जीने मालदार व्यापा-यांच्या घरांची खडान् खडा माहिती घेतली होती. इंग्रजांच्या वखारीबाहेर तर महिनोन्महिने बहिर्जी भिका-याच्या वेशात बसून भीक मागत माहिती काढत होता. त्यामुळेच जेव्हा महाराजांनी सुरतेवर आक्रमण केले तेव्हा मराठ्यांनी व्यापा-याच्या घरातून अगणित संपत्ती हस्तगत केली. जमिनीत पुरलेले हे धन मराठी फौजेला कसे काय माहीत झाले? म्हणत पुन्हा एकदा महाराजांच्या दैवीयोगाच्या चर्चा सुरू झाल्या. परंतु ही सर्व करामत बहिर्जीच्या कामगिरीचीच होती. हाजी बेग, बहिर्जी बोहरा यांच्या घरातून बहिर्जीने अगणित संपत्ती बाहेर काढली हे पाहून ते पण चकित झाले की आपल्या बापजाद्यांनी ठेवलेल्या संपत्तीचा आपल्यालाही पत्ता कसा लागला नाही.

महाराजांच्या आयुष्यातील शेवटची मोहीम म्हणजे जालना स्वारी असून १६७९ साली काढलेल्या या स्वारीत महाराजांना फार मोठी हानी पोहोचली. औरंगाबादहून आलेली मोगलांची फौज त्यांच्या पाठलागावर असल्याने जीवन-मरणाच्या प्रसंग उद्भवला. तीन-चार हजार सैन्य मारले गेले. तेव्हा प्रसंग ओळखून बहिर्जीने वेगळ्याच वाटेने महाराजांना सुखरूपपणे रायगडावर पोहोचते केले. इतर कामगिरीच्या मानाने ही कामगिरी स्वराज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. शिवरायांच्या ३५ वर्षांच्या कारकीर्दीत किती तरी लढाया झाल्या. अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावली; परंतु तानाजी मालुसरे किंवा बाजीप्रभू देशपांडे प्रमाणे इतरांना प्रसिद्धी मिळाली नाही. त्याप्रमाणे शिवरायांच्या गुप्तहेर खात्यामध्ये ३ ते ४ हजार गुप्तहेर असून त्यांच्याविषयी माहिती उपलब्ध होताना दिसत नाही. नशीब म्हणजे या खात्याचा प्रमुख बहिर्जीविषयी काही प्रमाणात माहिती उपलब्ध झालेली आहे. स्वातंत्र्यानंतरही त्यांच्या कामगिरीवर कुणी प्रकाश टाकलेला नाही. नाही म्हटले तरी भालजी पेंढारकरांनी १९४३ साली ‘बहिर्जी नाईक’ नावाचा सिनेमा काढून त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सरकारने कुंभारकिन्ही धरणाला बहिर्जी नाईक धरण नाव देऊन काही प्रमाणात न्याय दिला आहे. माणूस मोठा झाला की त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याप्रमाणे बहिर्जीला आपल्या बिरादरीत ओढण्याचा प्रयत्न झाला. ब-याच इतिहासकारांनी बहिर्जीला रामोशी, बेरड जातीत घातले तर मराठ्यांचा इतिहासकार ग्रँट डस्ट त्यांना रामोशी मांग म्हणतो. आपल्या दृष्टीने त्याची जात नाही तर कामगिरी महत्त्वाची वाटते. भर दरबारात प्रवेश केल्यानंतर शिवरायांशिवाय इतरांना बहिर्जी कधी ओळखायलासुद्धा यायचा नाही. असे म्हटले जाते की बहिर्जीच्या कमरेला असणा-या सोन्याच्या बेलपत्राच्या खुणेवरून महाराजही त्याला ओळखत. ही खूण मात्र फक्त दोघांनाच माहीत असावी. त्यामुळे बहिर्जी कसा होता हे शेवटपर्यंत कुणालाच समजले नसले तरी एकदा इंग्रजांना मात्र ते उमजले. महाराजांनी सुरतेवर स्वारी केल्यानंतर त्यांच्यावर एका दूताने भेटण्याच्या बहाण्याने हल्ला केल्यामुळे मराठ्यांनी अवघ्या चार तासांत सुरतेची बेसूरत करून टाकली. तेव्हा आपणाला अभयदान मिळावे म्हणून इंग्रजांचा वकील हेन्री ऑस्किडेन हा राजांना भेटण्यासाठी आला तेव्हा त्याची नजर महाराजांशेजारी उभा असणा-या माणसावर स्थिर व्हायला लागली. मनात विचारांचे काहूर माजले. हा माणूस कोण?

त्याने एका मराठा सरदाराला जवळ बोलावून हळूच विचारले, बाबा रे, हा माणूस कोण आणि इथे काय करतो आहे? त्याला सांगण्यात आले की ‘हा महाराजांच्या गुप्तहेर यंत्रणेचा प्रमुख बहिर्जी नाईक आहे.’ त्याच्या डोळ्यासमोर दिवसा काजवे चमकायला सुरुवात झाली. त्याच गोंधळलेल्या मनःस्थितीत तो उच्चारला, मागच्या महिन्यापासून हा माणूस आमच्या वखारीपुढे भिकारी म्हणून भीक मागत होता. स्वत:चे डोके बडवत त्याने स्वत:लाच सावरले आणि म्हटले, हा भिकारी नाही.. बहिर्जी आहे. एवढ्यावरच हे थांबले नाही तर इंग्लंडला पाठविलेल्या पत्रातही त्याने बहिर्जीचा उल्लेख केला आहे. बहिर्जीच्या कामगिरीची ती पावती आहे.

मुक्काम पोस्ट बाणूरगड (ता. खानापूर, जि. सांगली) या ठिकाणी या जिगरबाज मावळ्याची समाधी आहे. समाधीकडे पाहिले की वाटते, बहिर्जी इथं कसं आलात? कारण हे पण इतिहासाला अजून माहीत नाही.

साभार :- श्री. भास्कर चव्हाण

👉बहिर्जी नाईक आणि त्यांचे हेरखाते याबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. आणि हाच स्वराज्याच्या हेरखात्याचा विजय आहे.

कोणत्याही राज्याच्या सैन्याची मुख्य फळी म्हणजे त्यांचे गुप्तहेर खाते असते. शिवाजी महाराजांचे हेरखाते इतके गुप्त होते की त्यात नेमकी किती माणसे कामाला होती, त्यांचे दैनंदिन काम काय होते हे आजही न उकललेले गूढ आहे. आज समकालीन कागदपत्रांद्वारे काही मोजक्याचं नावांचा उल्लेख येतो. त्यात विश्वासराव मोसेखोरे,बहिर्जी नाईक-जाधव, सुंदरजी प्रभुजी, वल्लभदास गुजराथी, महादेव माळी इत्यादी नावे आढळतात.

अफजलखान वध, शाहिस्तेखान छापा या महत्त्वाच्या घटनांवेळी विश्वासराव मोसेखोरे हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते आणि मग महाराजांनी बहिर्जी नाईकांना प्रमुख केले.

महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे २ विभाग होते.

१. अधिकृत गुप्तहेर खात्यातील हेर

उदा. - विश्वासराव मोसेखोरे,बहिर्जी नाईक-जाधव,

सुंदरजी प्रभुजी, वल्लभदास गुजराथी, महादेव माळी इत्यादी.

२. परराज्यात जाणारी वकील मंडळी

उदा. सोनोपंत डबीर, त्रंबक सोनोपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे, रघुनाथ बल्लाळ अत्रे, पंताजी गोपीनाथ बोकील, मुल्ला हैदर उर्फ काझी हैदर इत्यादी. परराज्यात बोलणी करायला जाणारी ही मंडळी अगदी उत्तमप्रकारे अतिशय अचूक बातम्या आणत असत.

हेर अत्यंत चाणाक्ष, बुद्धिमान ,हरहुन्नरी असत. महाराजांची लाशजरी व्यवस्था आणि हेर खाते इतके अचूक होते की मोगलांना 'या शिवाजी ला चेटूकच अवगत असले पाहिजे, त्याशिवाय तो असा अचानक, अचूक हल्ले करणार नाही..' असे वाटे. यावरूनच आपल्याला कळून येईल की महाराजांचे हेरखाते किती जबरदस्त होते.

स्वराज्यासाठी जीवाची बाजी लावून आपले काम चोख बजावणाऱ्या या निधड्या छातीच्या गुप्तहेरांना मानाचा मुजरा!!

धन्यवाद।

♨️सुरत लुटीच्या वेळी एका इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवले आहे, 'वखारी समोर भीक मागत बसलेला भिकारी शिवरायांच्या तळावर सुद्धा दिसला.' हा भिकारी दुसरा कोणी नसून आपले बहिर्जी होते.

♨️होय.. दोन्ही सुरत लुटींच्या वेळची बहिर्जी यांची कामगिरी जबरदस्त आहे..

♨️वकिलांमध्ये प्रल्हाद निराजी नाशिककर यांचे ही नाव हवे कारण ते बराच काळ कुतुबशाही मध्ये वकील म्हणून होते .

♨️कदाचित याबद्दल काही लिखित नाही हे मुद्दाम असावे. (no documentation on purpose)

♨️बहिर्जी नाईक आणि त्यांची माणसं हि मुळात सह्याद्रीच्या जंगलात, दय्राखोय्रात राहाणारी रामोशी म्हणून ओळखली जाणारी भटकी जमात.

चोर्यामार्या, दरोडे, जंगलातून जाणार्या प्रवाशांची लूटमार हा त्यांंचा धंदा. परंतु त्याच बरोबर सह्याद्रीच्या कानाकोपर्याची ह्या लोकांना माहिती होती. बेमालून वेशांतर करुन लोकांत मिसळून जाणे, खबरी गोळा करणे हि कला त्यांंना उपजतच होती.

शिवाजी महाराज काही मावळ्यांसोबत जंगलातून मार्गक्रमण करत असताना बहिर्जीच्या टोळीने त्यांना अचानक गाठले. आपण ज्यांना पकडले आहे ते कोण आहेत हे समजल्यावर मात्र ते महाराजांना शरण गेले.

महाराजांना ह्या टोळी बद्दल माहिती होतीच. माणसांची उत्तम पारख असलेल्या महाराजांनी बहिर्जीला गुप्तहेर म्हणून सैन्यात सामिल होण्याचे आमंत्रण दिले.

बहिर्जीला 'नाईक' हि पदवी बहाल केली.


बहिर्जी व त्याची माणसं साधू संन्याशाच्या वेशांत, डोंबारी, दरवेशाच्या वेशांत स्वराज्यात विखुरलेली असत. न्हावी, परीट, घोड्यांचा खरारा काढणारे, चाकर म्हणूनही शत्रूच्या गोटांत सामिल होत. विविध भाषा, कला त्यांना अवगत होत्या.

पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज काढून ते एकमेकांना संकेत देत असत.

बहिर्जीचे स्वतः चे असे एक नेटवर्क होते.

अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी तंबू ठोकून बसला होता तेव्हा, सिद्दी जोहर पन्हाळ गडाला वेढा घालून बसला होता तेव्हा, आग्र्याहून सुटका झाली तेव्हा, शाहिस्ते खानाचा पराभव, जावळीतल्या मोय्रांचा पराभव यांसारख्या अनेक निकराच्या प्रसंगी बहिर्जीच्या ह्या नेटवर्कची, वाटाड्यांची व त्यांनी पुरवलेल्या बातम्यांची महाराजांना मोलाची मदत झाली.

बहिर्जी नाईक एक पिशाच्च होतं.

बहिर्जी खरा कसा दिसतो, कुठून येतो, कधी येतो, कधी जातो हे महाराजांच्या जवळच्या लोकांनाही माहीत नसे.

सूचना :- जो सर्वश्रुत इतिहास आहे तोच सांगण्याचा प्रयत्न वरिल उत्तरात केला आहे. तो अचूक आहे असा लेखकाचा मुळीच अट्टाहास नाही. कुणाच्याही भावना दुखावण्याचाही मुळीच हेतू नाही, हे क्रुपया सुजाण वाचकांनी लक्षात घ्यावे. धन्यवाद !!

♨️बहिर्जी नाईकांनी महाराजाना जंगलात अडवल्या बद्दल काही पुरावे आहेत का?

♨️वरील उत्तरात रामोशी समाजबद्दल जो चोर होते लूटमार करायचे असा उल्लेख आला आहे तो जर काळजीपूर्वक करायला हवा होता,

रामोशी समाजाची उल्लेखनीय कामगिरी कुणालाच माहीत नाही. कृष्णदेवरायच्या सैन्यातील रामोशी नाईक ही मुख्य लढाऊ फळी होती. तालिकोटच्या लढाई मध्ये झालेल्या पराभवानंतर या समाजाचा राजाश्रय सुटला. शत्रू राजगदिवर आल्यामुळे आपला छळ होईल या भयाने समाज सगळीकडे विखुरला गेला.मूळ वसतिस्थानापासून

स्थलांतर करावे लागल्याने उपजीविकेचा आधार जी शेतजमीन होती ती दुरावली त्यामुळे जिथे नवीन ठिकाणी जाऊन उपजीविका करावी त्याठिकाणी त्यांनी गावचे संरक्षण करणे किंवा तेही काम नाही मिळाल्यास त्यांनाचोरी किंवा इतर गोष्टी कराव्या लागल्या असतील तर त्यांचा हा जिवंनसंघर्ष आपण समजून घेतला पाहिजे

ररामोशी समाजाच्या उद्धरासाठी कर्नाटकात भीमराव गस्ती यांनी खुप चांगले काम केले आहे त्यांची पुस्तके वाचा कोणत्याही जातीवर आरोप करण्यापूर्वी त्यांची परिस्थिती समजून घ्या

♨️तुमचे खरे आहे. कुठल्याही समाजाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. रामोशी हि अतिप्राचीन जमात आहे. श्री राम जेव्हा दंडकारण्यात आले होते, तेव्हा ह्या लोकांनी त्यांना भरपूर मदत केली. श्री रामाने प्रसन्न होऊन आपले नाव त्यांना दिले, अशी आख्यायिका आहे.

आणि हो, मी कोणत्याही समाजावर कोणताही आरोप केलेला नाही.

तुम्ही उगीच माझ्यावर आरोप करु नका.

♨️बहिर्जी नाईक हे बहुरूपी होते. या जमातीला वेषांतर करण, लोकांमध्ये मिसळणे, वेगवेगळ्या भाषा बोलणे या कला अवगत होत्या.

♨️वरील लेखाला एखादा तरी पुरावा आहे का?

नगदी एखादा?

बहिर्जी हे रामोशी होते- आणि रामोशी लोकांचा व्यवसाय चोरी करणे हा होता. याचा पुरावा?

बहिरजींनी महाराजांना पकडले होते? पुरावा?बहिर्जी हे पात्र आजही इतिहासाला कोड आहे- ते इतक्या सहजी उलगडणार नाही.

♨️शंभुराजे यांना कैद करण्यात आले तेव्हा स्वराज्याचे हेर खाते कोठे होते? आणि मुख्य म्हणजे बहिर्जी नाईक हे त्यावेळी जीवंत होते की नाही?

बहिर्जी नाईक यांचा मृत्यू झाला (बहुतेक १६८६)आणि शञुच्या काटेकोर खबरा यायच्या कमी झाल्या. येथेच संभाजी महाराजांचा घात झाला. त्यावेळी बहिर्जी नाईक असते तर मुकर्रब खानाच्या सर्व हालचालीची तंतोतंत माहिती महाराजांना अगोदरच भेटली असती. त्यामुळे महाराज पकडले गेले नसते, तर मुकर्रब खानालाच महाराजांनी पकडले असते. पण हेच आपले दुर्दैव.

हेरखात्याचा उपयोग मराठांच्यात शिवाजी महाराज आणि नाना फडणवीस यांनी नि खूप उपयोग केला आहे.शिवाजी महाराजांचा सर्व विजय मध्ये तर हेरखात्याची मोलाची भूमिका होती.संभाजी महाराजांच्याया काळात त्यांनी नऊ वर्ष औरंगझेबला झुंजवले, रामशेज सारखा किल्ला तुफान लढवत होता.संभाजी महाराजांनी बुरहनपूर गोवा म्हैसूर जंजिरा अगदी गुजरात लागून असलेली किनारपट्टी पर्यंत अवघ्या नऊ इर्षात धडक मारली त्यात हेरखात्याचा हात असेल पण आता यात पुरावे नाही हेच यश आहे.

बहिर्जी नाईक यांच्या मृत्यू चा संभाजी महाराजांना पाकडणाच्या अगोदर झाला. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा अनेक गोष्टी मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.संभाजी महाराजांना संगमेश्वर ला पकडणाच्या अगोदर त्यांची हत्या झाली .त्यामुळे त्यांना वाचवता असले नाही.

बहिर्जी यांना त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणार्‍या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणार्‍या भिकार्‍यात त्याला कमालीचा साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.

संगमेश्वर ला मुकर्रबखान येत आहे याची हेरखात्याने माहिती दिली पण किती आधी यावर मतभिन्नता आहे.अजून सुद्धा प्राचितगड मार्गे संगमेश्वर जायला पक्की वाट नाही (अजुन नाही) त्याचमुळे 350 वरषपूर्वी सुद्धा शंभू राजानी हेरावर लगेच विश्वास ठेवला नसावा किंवा बातमी थोडी उशिरा आली असावी तोच घात झाला.

♨️बहिर्जी नाईक यांचे गुप्तहेर खात्यातील काम अमूल्य होते यात वादच नाही. आग्र्याहून महाराजांची सुटका यातील त्यांचा सहभागाच त्यांच्या कार्याचा विस्तार दाखवतो. परंतु एक गोष्ट समजून घ्यायला हवी, कोणतीही संस्था, राज्य हे एका माणसामुळेच चालते असे नाही. स्वराज्याच्या सुरुवातीच्या काळापासून ते लाल महालावरील शास्ताखानाच्या हल्ल्यापर्यंत स्वराज्याचे प्रमुख गुप्तहेर विश्वासराव नानाजी दिघे [1]हे होते. अफझल खान वध, लाल महालावरील हल्ला या आणि अश्या सर्व घटनांसाठी गुप्त माहिती विश्वासरावांनीच पुरवली होती. त्यांच्या नंतर बहिर्जी आणि बहिर्जींनंतर जरी गुप्तहेर खात्यातील माणसांची नावे उपलब्ध नसली तरी यापुढेही मराठा साम्राज्याने गुप्तहेर खाते सुरूच ठेवले. नारायणराव पेशवे यांना आज म्हणजे अनंत चतुर्दशी पूर्वी एक दिवस तुम्हाला शनिवार वाड्यात मारणार आहेत हे त्यांच्या हेरांनीच सांगितले होते पण त्रयोदशी असल्याने आणि गणपतीचा उत्सव शनिवारवाड्यात सुरु असल्याने नारायणरावांनी याकडे दुर्लक्ष केले. तसेच नाना फडणवीसांचे गुप्तहेर तर दिल्लीपर्यंत होते. असो सांगण्याचा मुद्दा असा कि संभाजी महाराजांचीही गुप्तहेर खाते आपले काम चोख करीतच होते.[2]

सर्वप्रथम संभाजी महाराजांचं चरित्र त्यांच्या खोट्या बदनामीला बाजूला ठेवून जगासमोर आणण्याचं महान कार्य करण्याचं श्रेय हे वा. सी. बेंद्रे यांना जात. त्यांनी संभाजी महाराज यांची कैद आणि त्याअगोदरची व नंतरची परिस्थिती अतिशय अभ्यास करून मांडली आहे. त्यांनी पुढील काही संदर्भ दिले आहेत आणि मग स्वतःचा निष्कर्ष काढला आहे.

संगमेश्वरला जायच्या पूर्वी संभाजी महाराजांनी शिर्क्यांचा मुलुख बेचिराख केला होता. शकवलीत असा उल्लेख आहे 'संभाजीराजे रायगडाहून कलशाचे मदतीस आले. खासा स्वारी सिरकियासी युद्ध करून त्यास पळवून खेळणीयास (विशाळगडास) आले'. अजून पुढील एका उताऱ्यावरून कळते कि महाराज खेळण्यावरून पुढे संगमेश्वरास आले.

'मौजे कोतळूक व मौजे ता वेलब ... ते वर्तमान देसाई यास कळल्यावर कोतुळास जाऊन शिर्के यांची पागा होती ती मारून टाकली आणि तैसेच संगमेश्वरास राजश्री संगमेश्वरासी जाऊन वर्तमान निवेदन करून...'

यावरून शिर्क्यांची पागा मारल्यावर देसाई संगमेश्वरास संभाजीराजांस भेटायला गेल्याचे कळते. मुळात शिर्के व संभाजी महाराजांचे वितुष्ट नव्हते परंतु मुकर्रबखान कोल्हापुरास आल्यावर शिर्क्यांचा धीर सुटून व जहागिरीचा मुलुख परत मिळावा म्हणून मुगलांस जाऊन मिळाले आणि याचा फायदा पुढे मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी केला.

गणोजी शिर्केंना खालील गोष्टींची जबाबदारी दिली होती:

१. पन्हाळ्याच्या किल्लेदारास लाचलुचपतीस उद्युक्त करून पन्हाळा मुघलांच्या हवाली करणे

२. संभाजी महाराजांची बायको चंपा उर्फ दुर्गा हिला पकडून मोगली कैदेत पाठवणे

३. संभाजीचा नॅश करण्यात शक्य ती मदत करणे

आता हि झाली आधीची पार्श्वभूमी. यामुळे इतक्या गोष्टी स्पष्ट होतात कि संगमेश्वरास जाण्याआधी महाराजांनी शिर्क्यांवर हल्ला केला मुलुख जाळला व देसायांनी पागा नाश केली. तसंच शिर्के यांची जहागिरी जी संभाजी महाराजांनी दूर केली होती ती त्यांना काहीही करून परत हवी होती.

आता कैदेसंबंधित बेंद्रेंनी दिलेले संदर्भ पाहू.

संदर्भ मासिर-ई-आलमगीर: (केवळ हेरांचाच उल्लेख देतो आहे संपूर्ण प्रसंग प्रश्नास धरून नाही.)

:...तेव्हा लागलीच मनमारातबास पात्र होण्यासाठी आकांक्षा धरणाऱ्या व अनुयायांसह पादशाहावर निष्ठा धरून असलेला खान (मुकर्रबखान) जीवाची पर्वा न धरता कोल्हापुरातून निघाला. तेथून कुठेही पृथ्वीत आढळणार नाही अशा दारी डोंगरीच्या भयाण व कठीण रस्त्याने तो गेला. ती जागा ४५ कोस होती. त्याने विनाविश्रांती कूच केले. जरी संभाला त्याच्या हेरांनी मोगली सैन्य येत असल्याची बातमी दिली तरी सत्तमदाने आणि गर्वाने धुंद झालेला तो संभा त्या हेरांवर डोळे वटारून रागावून बोलला कि अरे बिनडोक माणसांनो तुम्ही वेडे आहेत का? मोगली सैन्य येथे येऊ शकेल काय? आणि त्या हेरांचा शिरच्छेद केला...." मासिरी हे मुघलांच्या बाजूने लिहिलेले असल्याने संभाजी महाराजांचं चारित्र्य खराब करण्यासाठी त्यांना "सत्तमदाने आणि गर्वाने धुंद झालेला" असे संबोधले आहे. तसंच संभाजी महाराजांची कारकीर्द पाहता उगाच हेरांचा शिरच्छेद वगैरे करायला संभाजी महाराज म्हणजे काही मुघल नव्हते.

दुसऱ्या संदर्भ काफीखानाचा आहे:

'... हेरांनी त्यास (महाराजांस) बातमी दिली परंतु जी कृत्य पूर्वीपासूनच मोठ्या मोठ्या माणसांचा नाश करतात त्यात बुडलेल्या त्याने याकडे दुर्लक्ष केले.'

यातही मुघलांकडून हा संदर्भ असल्याने संभाजी महाराजांची बदनामी करणारा उल्लेख येथे आहे. परंतु यातही हेरांनी बातमी दिली होती असा उल्लेख आहे.

या आणि अश्या अजून संदर्भांवरून बेंद्रे यांनी खालील निष्कर्ष काढला आहे. हिंदू बखरकारांची बरीच उदाहरणे बेंद्रे यांनी दिली आहेत पण ते कसे अविश्वसनीय आहेत ते सुद्धा सांगितले आहे. मुळात बऱ्याच हिंदू बखरकारांना नक्की तारीख माहिती नाही, संभाजी महाराजांसोबत शाहू आणि येसूबाईंना इथेच अटक झाली असे गैरसमज आणि अश्या बऱ्याच कारणांनी त्यांचे संदर्भ ग्राह्य धरले नाहीयेत.

मासिर आणि काफीखानाने मुकर्रबखानाने निवडलेला मार्ग जो त्याला गणोजी शिर्के यांनी दाखवला होता कारण त्या सर्व भूगोलाशी शिर्के फार जवळचे होते, त्या मार्गाचे वर्णन असे केले आहे कि सुमारे २ ३ फर्लांगापलीकडे काय हालचाली चालू आहेत याची चाहूलसुद्धा लागत नाही. त्यामुळे या मार्गावरून मुकर्रबखान २ ते ३००० च सैन्य घेऊन येत होता याची महाराजांना खबर लागली नाही. वर दिलेला उल्लेख ज्यात महाराजांनी हेरांची मस्तक मारायचा आदेश दिला आहे तो जर खरा असेल तर बातमी उशिरा आणल्यामुळे हा आदेश दिला असेल असे वाटते. मुळात शिर्क्यांचा मुलुख जाळीत असताना जर मुकर्रबखान आपल्यावर हल्ला करीत नाही तर इतक्या आडमार्गाने येऊन संगमेश्वरला तो आपल्याशी दोन हात करेल असे संभाजी महाराजांना वाटलेच नव्हते. त्यात शिर्क्यांच्या मदतीने खान कमी वेळात जास्त स्वारांसकट संगमेश्वरला पोहोचला. या पुढील कैद व वधाचे प्रसंग पुढे देत नाही कारण ते प्रश्नाला धरून नाहीत. यावरून असे कळते कि हेरखात्याने उशिरा किंवा वेळेत महाराजांना हि बातमी पोहोचवली होती परंतु मुकर्रबखाना सारखा मुगली सरदार इतक्या लवकर पोहोचेल असे महाराजांस वाटले नाही. खासकरून जहागिरीसाठी शिर्के इतके उपद्व्याप करतील अशी अपेक्षासुद्धा महाराजांनी केली नसेल[3]. असो सह्याद्रीचा वाघ दुर्दैवाने अश्याप्रकाराने मुघलांच्या हातात सापडला. (हे सर्वस्वी बेंद्रेंचे स्पष्टीकरण आहे, माझे नाही.)

टीप: यामधील संभाजी महाराजांचा उल्लेख एकेरी किंवा अपमानास्पद केलेला आहे कारण तो मुघलांच्या संदर्भांमधून उचललेला आहे. संभाजी महाराजांचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश या उत्तरातून माझा नाही. तसेच हे पूर्ण उत्तर छत्रपती संभाजी महाराज या वा सी बेंद्रे यांच्या पुस्तकातून घेतलेले आहे आणि हे सर्वस्वी त्यांचे विचार आहेत.

तळटीपा

संभाजी महाराजांना पकडण्याची ताकद जगातल्या कोणत्याही साम्राज्यात नव्हती पण आप्तस्वकीय लोकांनीच दगा केला.

संभाजी महाराज संगमेश्वर येथे कशासाठी गेले होते? चे शैलेश हालभावी (Shailesh Halbhavi)ने दिलेले उत्तर हे वाचा. संभाजी महाराज कसे पकडले गेले याचे उत्तर यामध्ये सविस्तर दिले आहे.

धन्यवाद ! 🙏🏻🚩🚩

♨️संभाजी महाराज पकडले गेले त्याच्या महिनाभरापूर्वी बहिर्जी नाईक स्वर्गवासी झाले होते… त्यांच्या जाण्याने हेर खाते कमकुवत झाले होते…

संभाजी महाराज पकडले गेले ते त्यांच्या चुलत सासरे आणि साला गणोजी शिर्के मुळे…. आपलेच फितूर असले की दुष्मानाची गरज नसते… अन् आपल्यातले फितूर ओळखन खूप कठीण आहे ..

♨️माझ्या माहितीप्रमाणे संभाजी महाराज पकडले गेले त्याच्या काही महिने अगोदरच बहिर्जी नाईक स्वर्गवासी झाले होते.बहिर्जी नाईक यांना देवज्ञा झाल्या मुळे जी गुप्तहेर यंत्रणेची टाकत होती ती खुप कमी झाली.जर देवाने बहिर्जीना दीर्घायुष्य दिले असते.तर संभाजी महाराजांचा घात झालाच नसता.आणि कदाचित महाराष्ट्रचा इतिहास वेगळा असता

धन्यवाद

जय शिवराय

जय शंभूराजे

♨️उपलब्ध माहितीनुसार बहिर्जी नाईक आणि संभाजी महाराज यांच्यात वितुष्ट आल्यावर ते त्यांना सोडून गेल

♨️बहिर्जी नाईक यांचे वंशज आज आहेत का?

रामोशी समाजाचे असलेले बहिर्जी नाईक यांचे मूळ गाव शिंगावे जिल्हा नगर. शींगावे गावात त्याच्या मुलाने तुकोजी नाईक ने रामाचे मंदिर बांधले आहे. त्यांचा मृत्यू बनुरगड किंवा भूपालगड जिल्हा सांगली इथे झाला. काही जणांचे म्हणणे आहे की जखमी झालेल्या बहिर्जी नाईक यांचा इथे महादेव समोर मृत्यू झाला. काही जण म्हणतात की मुघलांच्या बरोबर झालेल्या बानुरगड चकमती मध्ये मृत्यू झाला.शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित. अफजल खान ची मोहीम, सुरत ची लूट, आग्रा तून सुटका सुटका,शाहिस्चशाहिस्तेची फजिती, पट्टागड वर राजावर बेतलेले मरण, दक्षिनविजय या मध्ये बहिर्जी नाईक आणि त्यांच्या ३००० हेरांचा प्रंचंड हात होता.त्याची तुलना ही इस्रालय च्या खात्याशी तुलना होऊ शकते. त्यांचे वंशज शींगवे गाव मधून असू शकतात पण नक्की माहिती नाही.गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल त्यामुळे दुर्दैवाने इतिहासात त्यांची जास्त माहिती नाही. शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून त्यांची ख्याती होती.भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता.आटपाडी, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !

तळ टीप

1] बहिर्जी नाईक : जयसिंगराव पवार

2]बहीर्जी नाईक - Aapla Vyaaspith | DailyHunt

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखले स्वराज्यनिर्र्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना त्या गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले.

बहिर्जी नाईक हे फकीर, वासुदेव, कोळी, भिकारी, संत, आदी कुठलेही वेशांतर करण्यात पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातून शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होते. ते विजापूरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व खुद्द अदिलशहा व बादशहा यांच्याकडून पक्की माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशयजरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते.

शिवाजीच्‍या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तीन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होते. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापूर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकीची माहिती देणार्‍यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणू काही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्‍यांचे आवाज असत. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचे. त्या ठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व शिवाजी महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असे म्हटले जाते की, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फक्त महाराजच ओळखायचे. थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहीच अशी सर्वांची समजूत असायची.

बहिर्जी नाईक फक्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहीर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटनेचा ते खूप बारकाईने विचार करीत. श्त्रूरुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रूला चुकीची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रूच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहिती ते ठेवत.

शिवाजी राजे व संभाजी जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काही दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पूर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्‍यांत लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले.

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाचा बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लूटअसो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इथंभूत माहिती महाराजांना दिली होती. बर्‍याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करून पाऊल टाकत. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती, त्यावेळी गुप्तहेर खाते तयार करण्यात आले होते. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

सुरतेची लूट चालू असताना जॉर्ज ओग्झेन्डन हा इंग्रज वखारवाला आपली वखार वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांची विनवणी करावयास गेला. तेव्हा महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम आणि आपल्या वखारीसमोरच्या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले.. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात तसे नमूदही केले.. इंग्रजांच्या कागदपत्रांमध्ये अश्या रीतीने बहिर्जी नाइकांबद्दल उल्लेख आहे पण आपल्याकडे मात्र फारसे काहीच उल्लेख सापडत नाहीत.

महाभारत काळापासून आजपर्यंत राज्यव्यवस्थेबाबत जे जे सिद्धान्त मांडले गेलेले आहेत त्यात गुप्तचरांचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. कौटिल्याने तर आपल्या ‘अर्थशास्त्र’ या ग्रंथात राज्य या संकल्पनेस मानवी शरीराची उपमा देऊन राजा हा त्या शरीराचा आत्मा, प्रधान-मंत्रिपरिषद म्हणजे मेंदू, सेनापती म्हणजे बाहू आणि गुप्तचर म्हणजे राज्यरूपी शरीराचे डोळे आणि कान असल्याचे म्हटले आहे. हे डोळे आणि कान जितके सजग, तीक्ष्ण असतील तितकेच राज्य सुरक्षित असते असा सिद्धान्त कौटिल्य मांडतो.

युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यव्यवस्था निर्माण केली. शिवरायांसारख्याद्रष्टय़ा राजाचे ‘गुप्तचर’ या राज्याच्या महत्त्वाच्या अंगाकडे दुर्लक्ष होणे शक्यच नव्हते. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेत हेरव्यवस्थेला अतिशय महत्त्व होते. या व्यवस्थेस प्रबळ करण्याचे सर्व प्रयत्‍न राजांनी केलेले दिसतात. इंग्रज आणि फ्रेंच यांनीसुद्धा शिवरायांच्या हेरव्यवस्थेचे कौतुक केलेले आहे. शिवरायांचा ‘जाणता राजा’ असा गौरव केला जातो. शिवरायांना सर्वच बाबतीत ‘जाणते’ ठेवण्याचे कार्य त्यांच्या हेरव्यवस्थेने चोखपणे बजावलेले दिसते. शिवाजी महाराजांच्या कल्पनेतील हेरव्यवस्थेला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय निःसंशय बहिर्जी नाईक यांच्याकडे जाते. कुशाग्र बुद्धिमत्ता, समयसूचकता यांना साहसाची जोड देऊन बहिर्जी नाईक यांनी शिवकाळात अचाट कामगिरी बजावली आहे.

बहिर्जी नाईक यांच्या पूर्वेतिहासाबद्दल इतिहासात त्रोटक संदर्भ आहेत. शिवाजीराजांनी अठरापगड जातींना कर्तृत्व गाजवण्याची संधी दिली त्यात रामोशी जातीच्या बहिर्जी नाईक यांचा समावेश होतो. बहिर्जी नाईक स्वराज्याशी कसे जोडले गेले या बाबतीत इतिहासकारांत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आपल्या जहागिरीच्या प्रदेशातील लांडग्या-कोल्ह्यांचा बंदोबस्त करण्यासाठी या लांडग्या-कोल्ह्यांना मारून त्यांचे शेपूट आणून देणार्‍यास शिवरायांनी इनाम जाहीर केले, तेव्हा बहिर्जी नाईक यांनीे सर्वात जास्त शेपट्या आणून दिल्या आणि त्यांना शिवरायांनी हेरले असे काही इतिहासकार मानतात तर शिमग्याचा खेळ पाहात असताना वेगवेगळी सोंगे वठवणारे बहिर्जी नाईक शिवरायांच्या नजरेत भरले असे काही इतिहासकार मानतात. मतमतांतरे काहीही असोत पण बहिर्जी स्वराज्याच्या अत्यंत प्राथमिक अवस्थेपासून शिवरायांसोबत होते हे निश्चित.

स्वराज्यावर पहिले सर्वात मोठे संकट आले अफजलखानाचे. शिवरायांनी ज्या धीरोदात्तपणे अफजलखानावर विजय मिळवला त्याला इतिहासात तोड नाही पण याच वेळी बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याचे कार्य दुर्लक्षून चालणार नाही. अफजलखान पंढरपुरात दाखल झाल्यापासून बहिर्जी त्याच्या सैन्यात सामील झाले होते असे बहुतांश इतिहासकार मानतात. बहिर्जी यांनी खानाच्या गोटाची इत्थंभूत माहिती काढली. खानाचे सैन्य किती आहे, त्यात पायदळ, घोडदल, हत्ती, तोफा-दारूगोळा किती आहे, त्याच्या जवळचे लोक कोण इथपासून ते खानाची दिनचर्या, त्याच्या सवयी इ. विषयी खात्रीशीर माहिती बहिर्जींनी राजांपर्यंत पोहोचवली.

इतकेच नव्हे तर खानाचा हेतू राजांस जीवे मारण्याचा आहे असा नि:संदिग्ध अहवाल बहिर्जी यांनी दिल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली व्यूहरचना पूर्णपणे बदलली. शिवाजी घाबरला आणि आता युद्ध होत नाही, अशी वावडी उठवून खानाचे सैन्य बेसावध ठेवण्याचे काम बहिर्जी यांच्या हेरखात्याने केले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी देखील ‘खाना’ने चिलखत घातले नसल्याची आणि सय्यद बंडा धोकादायक असल्याची माहिती बहिर्जींनी पोहोचवली. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

पन्हाळ्याहून शिवाजी महाराजांची सुखरूप सुटका करण्याचे श्रेय जसे बाजीप्रभू आणि शिवा काशीदकडे जाते तसेच ते बहिर्जी यांच्याकडे देखील जाते. शाहिस्तेखान प्रसंगातदेखील त्याच्या सैन्यात घुसून संपूर्ण माहिती अचूकपणे काढण्याचे काम बहिर्जी यांनी केले. उदा. रात्री पहारे सुस्त असतात इथपासून ते खान कुठे झोपतो, भटारखान्यापासून जनानखान्यात जाणारा रस्ता कच्च्या विटांनी बंद केलेला आहे (हाच रस्ता महाराजांनी खानापर्यंत पोहोचण्यास वापरला पण तो बंद आहे हे ऐन वेळी समजले असते तर योजना फसण्याची शक्यता होती.). तसेच रमझानचा महिना चालू असल्यामुळे रात्री पहारे सुस्तावलेले असतात इत्यादी तपशीलवार माहिती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी शाहिस्तेखानावर हल्ला करायची योजना आखली आणि ती यशस्वी केली. (राजे सहिष्णू वृत्तीचे होते पण राज्यावर आलेले संकट नष्ट करण्यासाठी त्यांनी ‘रमझान महिना’ संपण्याची वाट पाहिली नाही.).

शाहिस्तेखानाचा पाडाव करण्याआधी उंबरखिंडीत कारतलब खानाच्या सुमारे २०००० सैन्याचा महाराजांनी पुरता धुव्वा उडवला आणि त्याला बिनशर्त शरणागती घेण्यास भाग पाडले. खान कोकणात जाण्यासाठी पुण्याहून निघाल्यापासून बहिर्जी आणि त्याचे हेर खानाच्या सैन्याच्या आजूबाजूला राहून माहिती काढत होते. खान बोरघाट मार्गाने कोकणात जाईल असा अंदाज होता, पण खानाने ऐनवेळी उंबरखिंडीचा मार्ग निवडला. राजांना ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपले सैन्य आधीच उंबरखिंडीत आणि आसपासच्या जंगलात पेरून ठेवले. खानाचे सैन्य खिंडीच्या मध्यावर येताच आघाडी आणि पिछाडीची नाकाबंदी करून खानाचा पूर्ण पराभव केला. बहिर्जी यांनी दिलेल्या अचूक आणि योग्य वेळी दिलेल्या माहितीचा यात निश्चितच मोठा वाटा होता.

तीच गत सुरतेच्या लुटीची. सुरत बदसुरत करून राजांनी औरंगजेबाचे नाक कापले. सुरतची मोहीम महाराजांच्या इतर मोहिमांपेक्षा वेगळी अशासाठी ठरते की महाराजांच्या तोपर्यंतच्या कारकिर्दीतील परमुलखात काढलेली ही पहिलीच मोहीम होती. आधीच्या सर्व प्रसंगात शत्रू स्वराज्यात आला होता. त्यामुळे मोहिमेची व्यवस्थित आखणी होणे आणि राजगडापासून सुमारे १५० कोस दूर असलेल्या सुरतेची संपूर्ण माहिती मिळणे अत्यावश्यक होते. सुरत हे मोगलांचे एक मोठे व्यापारी ठाणे होते त्यामुळे बाहेरून कुमक मिळण्याआधी मोहीम पूर्ण करणे आवश्यक होते. म्हणूनच या लुटीची योजना ३-४ महिने आधीपासून सुरू होती. या योजनेचा एक भाग म्हणून बहिर्जी सुरतेत दाखल झाले.

बहिर्जी नाईक भिकार्‍याच्या वेशात सुरतभर फिरत होते. या फिरस्तीत सुरतेच्या संरक्षण सज्जतेबरोबरच, संपत्तीच्या ठावठिकाणांची अचूक माहिती बहिर्जी यांनी संकलित केली. त्यामुळे सुरतेच्या वेशीवरून शिवाजी महाराजांनी इनायतखानास (सुरतचा सुभेदार ) जे निर्वाणीचे पत्र दिले त्यात हाजी सय्यद बेग, बहरजी बोहरा, हाजी कासीम इ. धनिकांची नावेच दिली. इतक्या दूरवरून आलेल्या शिवाजीस आपली नावेदेखील माहीत आहेत हे जेव्हा या लोकांस कळले तेव्हा त्यांची भीतीने गाळण उडाली. शिवाजी महाराजांनी या लुटीदरम्यानदानशूर व्यक्ती, मिशनरी यांना उपद्रव केला नाही केवळ उन्मत्त धनिक लुटले आणि केवळ तीन दिवसांत सुरत मोहीम यशस्वी केली त्यात बहिर्जी नाईक यांच्या गुप्तहेर यंत्रणेचा मोठा वाटा आहे.

आग्र्‍याहून सुटका हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अत्यंत कठीण आणि रोमहर्षक प्रसंग मानला जातो. औरंगजेबासारख्याक्रूर शत्रूच्या हातून सुटका करून घेऊन सुमारे ७०० मैल लांब असलेल्या स्वराज्यात शिवाजीराजे सुखरूप परत आले. या प्रसंगात बहिर्जी यांच्या इंटेलिजन्सची जोड मिळाली नसती तर इतिहास काही वेगळा झाला असता.

शिवाजीस नवीन हवेलीत पाठवून तेथे त्याचा खून करण्याचा औरंगजेबाचा आदेश असल्याचे बहिर्जी यांनी कळवल्यानंतर शिवाजी महाराजांनी जलद हालचाल केली. या संपूर्ण योजनेत बहिर्जी यांचा सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होणे शक्य नव्हते. शत्रूस गुंगारा देण्यासाठी शिवाजी महाराजांनी परतीचा प्रवास उलट दिशेने सुरू केला त्यानुसार ते प्रथम मथुरेला गेले. तेथून अलाहाबाद-बुंदेलखंड-खानदेश-गोंडवन-गोवळकोंडा असा कठीण वेडावाकडा प्रवास करून ते राजगडावर येऊन पोहोचले. हा मार्ग निश्चित करताना आणि प्रत्यक्ष प्रवासात बहिर्जी यांचे हेर खाते राजांच्या अवतीभवती असणार आणि त्यांनी पुढचा मार्ग सुखरूप असल्याची ग्वाही दिल्यानंतर राजांचे मार्गक्रमण होत असणार हे निश्चित.

शिवरायांचे संपूर्ण जीवन धकाधकीने आणि रोमहर्षक प्रसंगांनी भरलेले आहे. जेथे फक्त पराजय शक्य आहे अशा प्रसंगात शिवाजी महाराजांनी विजय मिळवलेला आहे. शिवाजी महाराजांनी बहुतांश लढाया युक्तीने लढलेल्या असून लढाईपूर्वी शत्रूची संपूर्ण माहिती मिळवण्यावर भर दिला आणि त्यानुसार आपली व्यूहरचना केली.

बहिर्जी आणि त्यांचे हेर स्वमुलखात आणि परमुलखातदेखील साधू, बैरागी, भिकारी, सोंगाडे, जादूगार अशा वेशात फिरत असत आणि इत्थंभूत माहिती घेत असत. या हेरांचे नजरबाज, हेजीब असे उल्लेख अस्सल कागदपत्रात आढळतात. महाराजांच्या दूरवर पसरलेल्या सैन्यात आणि गडकिल्ल्यांवर माहितीची देवाण-घेवाण करणे आणि त्यांत समन्वय साधणे हे काम बहिर्जी नाईक यांच्या यंत्रणेने साध्य केले. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक रोमहर्षक विजयाचा पाया बहिर्जी नाईक आणि त्यांच्या हेरखात्याने घातला असे म्हणल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही आणि असे म्हटल्याने कोणावर अन्यायही होणार नाही. शिवाजी महाराजांनीदेखीलत्यांचे महत्त्व ओळखून हेरखाते प्रबळ करण्यावर भर दिला. अष्टप्रधान मंडळात हेरखात्याला स्वतंत्र स्थान देण्यात आलेले नव्हते तरी बहिर्जी यांना सरदारकीचा दर्जा दिला आणि हेरखात्यास साधनसामग्री आणि द्रव्याची चिंता भासू दिली नाही. बहिर्जी यांच्या नेतृत्वाखाली साधारण ३००० हेर कार्यरत होते असे इतिहासकार मानतात. हे हेरखाते इतके सक्षम होते की समकालीन इतिहास फंद फितुरीने भरलेला असूनदेखील शिवाजी महाराजांना मात्र संपूर्ण कारकिर्दीत एकदाही दगा फटका झालेला आढळून येत नाही.

इतक्या जुन्या काळात आणि तंत्रज्ञानाची साथ नसताना बहिर्जी नाईक यांच्या हेरांनी माहितीचे संकलन, विश्लेषण इतक्या अचूकपणे कसे केले, भौगोलिक ज्ञान कसे मिळवले आणि ती माहिती योग्य वेळी इच्छित व्यक्तीपर्यंत कशी पोहोचवली हे एक कोडेच आहे. इतिहास अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवतो तसाच हाही प्रश्न इतिहासाने अनुत्तरित ठेवला आहे. बहिर्जी नाईक यांनी ‘माहिती तंत्रज्ञानाची’ एक अद्ययावत यंत्रणा निर्माण केली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. बहिर्जी नाईक आणि त्यांची यंत्रणा ही त्या काळातील सर्वश्रेष्ठ हेरयंत्रणा होती हे निर्विवाद सिद्ध होते. आज आपणास आदिलशहाचा हेर कोण होता? औरंगजेबाचा हेर कोण होता असे विचारले तर ते आपल्याला माहीत नसते. इतिहास संशोधक त्यांची नावे कदाचित सांगू शकतील पण हेच शिवाजी महाराजांचा हेर कोण असे विचारल्यावर पटकन आपल्यासमोर नाव येते ते ‘बहिर्जी नाईक’.

गुप्तचर मग ते कोणत्याही काळातील असोत त्यांना ग्लॅमर नसते. कारण ते हातात नंगी तलवार घेऊन शत्रूस आव्हान देत नाहीत किंवा रोमहर्षक लढाया जिंकत नाहीत. त्यांचा पराक्रम लोकांसमोर येत नाही, कारण त्या पराक्रमाचे साक्षीदार नसतात. सेनानी लढाईत लढतात पण गुप्तचरांना शांततेच्या काळातदेखील लढावे लागते. ही लढाई बहुतेक वेळा संयम आणि बुद्धी यांची असते. सोंग घेणे, वेषांतर करणे सोपे असते पण ते सोंग वठवणे कठीण काम असते त्यासाठी जे सोंग आपण वठवणार आहोत त्याचा बारकाईने अभ्यास करावा लागतो. गुप्तचरांच्या कामात प्रतिस्पर्ध्यावर अव्याहतपणे बौद्धिक कुरघोडी करणे अपेक्षित असते. वरील सर्व बाबींचा विचार करता बहिर्जी नाईक हे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते हे मान्य करावे लागेल.

बहिर्जी आणि त्यांच्या हेर व्यवस्थेची आताच्या हेरव्यवस्थांशी तुलना करताच येणार नाही. ‘रॉ’बरोबर त्याची तुलना करणे हास्यास्पद ठरेल. ‘आयएसआय’, ‘सीआयए’शी त्याची तुलना करणे बेजबाबदारपणाचे ठरेल. मोसादशी त्याची तुलना करता येईल पण ती उलटय़ा बाजूने करावी लागेल म्हणजे- मोसाद म्हणजे इस्राइलचे बहिर्जी असे म्हटल्यास ते जास्त चपखल ठरेल.

जेम्स बाँड असो किंवा शेरलॉक होम्स, ही दोन्ही पात्रे कल्पनेतील आहेत, परंतु साहित्य आणि दृक्श्राव्य माध्यमांच्या ताकदीमुळे ही दोन्ही पात्रे वास्तवातील वाटतात. ब्रिटिशांनी तर बेकर स्ट्रीटवर शेरलॉक होम्सचे घर वसवले आहे आणि लोक ते पाहण्यास जातात.

जेम्स बाँड किंवा शेरलॉक होम्सने पुस्तकात, सिनेमात जी कामिगरी केलेली आहे त्याहून सरस कामगिरी बहिर्जी नाईक यांनी वास्तवात करून दाखवली आहे हे इतिहासाचा अन्वयार्थ लावल्यानंतर लक्षात येते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की, शिवरायांचा ‘तिसरा डोळा’ म्हणून वावरलेले हे व्यक्तिमत्त्व आपल्या साहित्यात आणि दृक्श्राव्य माध्यमात दुर्लक्षित राहिलेले आहे. भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘बहिर्जी नाईक’ हा १९४३ सालचा सिनेमा, २-४ छोटेखानी पुस्तके, भूपाळगड (ता. तासगाव, जि. सांगली) येथील एकाकी समाधी आणि कुंभारकिन्ही धरणाला दिलेले ‘बहिर्जी नाईक सागर’ हे नाव हीच काय ती आपण या ‘सर्वोत्कृष्ट’ हेरास वाहिलेली आदरांजली.. !

बहिर्जी नाईक यांच्या मृत्यूबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही. ‘भूपाळगडावर हेरगिरी करताना त्याचा मृत्यू झाला’, ‘लढाईत जखमी झालेल्या बहिर्जी यांनी भूपाळगडावर येऊन महादेवाच्या चरणी आपले प्राण सोडले’ अशा आख्यायिका मात्र तत्कालीन बखरीत सापडतात.

बहिर्जी यांच्या कारकिर्दीत त्याला एकदाच ओळखले ते जॉर्ज ओग्झेन्डन या सुरतेच्या इंग्रज वखारवाल्याने..!(शिवराज्याभिषेकाचे जे चित्र आपण पाहतो त्यात महाराजांना लवून मुजरा करणार्‍या हेन्‍री ओग्झेन्डनचा हा भाऊ). सुरतची लूट चालू असताना वखार वाचवण्यासाठी महाराजांची विनवणी करावयास गेला तेव्हा. महाराजांच्या बाजूला उभा असलेला इसम (बहिर्जी) आणि आपल्या वखारीसमोर भीक मागणार्‍या भिकार्‍यात त्याला साम्य आढळले पण तोपर्यंत उशीर झाला होता, पण त्याने ईस्ट इंडिया कंपनीला पाठवलेल्या अहवालात हे नमूद केले.

२१व्या शतकात गुप्तचर यंत्रणांबद्दल जे संशोधन, जो अभ्यास झाला आहे त्यांनी गुप्तचर यंत्रणांच्या यश-अपयशाचे एक महत्त्वाचे सूत्र मांडले आहे. ते सूत्र म्हणजे ‘अज्ञात राहणे’. गुप्तचर जितका वेळ अज्ञात राहील तितका तो यशस्वी होतो. बहिर्जी नाईक तसेच ‘अज्ञात’ राहिले. पण ते अज्ञात राहिला म्हणून यशस्वी झाले की यशस्वी होते म्हणून अज्ञात राहू शकले याचे उत्तर ना इतिहासकारांपाशी आहे ना दस्तुरखुद्द इतिहासापाशी..!!!!

बाणूरगड महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यामध्ये असलेला एक किल्ला आहे. हा किल्ला सांगली जिल्ह्याच्या पूर्व टोकास आहे. येथून पुढे सोलापूर जिल्हा सुरु होतो. मराठी स्वराज्याचे गुप्तहेर बहिर्जी नाईक यांची समाधी येथे आहे.

♨️बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं नाव

छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच नाईक होते

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत . बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते . तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले .

नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं . ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.

महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे . ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं . हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते . चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता . त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती . ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई . महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं . त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे -थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची . ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते . तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते . कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी . शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत . तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत . फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत . शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती . त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले . हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा . त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत . ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती .बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके . राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं . तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते .

♨️माहिती उत्तम आहे, पण प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले.

♨️मूळ प्रश्नाचे उत्तर कुठे आहे ??

♨️स्वराज्य स्थापनेच्या कार्यात श्री शिवरायांच्या पराक्रमी अनुयायांबरोबरच त्यांच्या गुप्तहेर खात्याचा सुद्धा अत्यंत उपयुक्त सहभाग होता. स्वकीय विरोधक व उघड शत्रू यांच्या हालचाली, दूरवरच्या प्रदेशातील परिस्थिती इ. माहिती वेळच्या वेळी मिळण्यावर राजकीय आणि सैनिकी यश अवलंबून आहे हे ओळखून शिवराय गुप्तहेर खात्यावर भरपूर पैसा खर्च करत. शत्रूच्या हालचाली आणि गुप्त कारवाया तसेच शत्रुप्रदेशातील संपन्न शहरे, खजिन्याच्या जागा,हल्ल्यासाठी जाण्याचा आणि परत येण्याचा मार्ग इत्यादी गोष्टींची गुप्तहेरांमार्फत खडानखडा माहिती मिळवून श्री शिवरायांनी अनेक धाडसी हल्ले करून शत्रूंची शहरे लुटली.

छत्रपती शिवरायांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम होते. या गुप्तहेरांपैकी एक नाव प्रसिद्धीस आले ते म्हणजे बहिर्जी नाईक यांचे. बहिर्जी नाईक हे मराठ्यांच्या इतिहासातील एका महानायकाचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या स्वराज्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली त्या स्वराज्याचा सुरुवातीपासुन ते महाराजांच्या निधनापर्यंतचा चा साक्षीदार म्हणजेच बहिर्जी नाईक होते.

दिवसभर बहुरुप्याचे खेळ करुन पोट भरवणारे बहिर्जी एकदा राजे मोहिमेवरती असताना त्यांना भेटले. महाराजांनी त्यांच्यातील कसब ओळखली, नाईक स्वराज्यनिर्मीतीच्या कामाला हिरा आहेत हे राज्यांनी ओळखेले आणि तात्काळ त्यांना त्या कामात रुजु करुन घेतले. महाराज नेहमी आपल्या माणसांतील गुण ओळखुन त्यांना कामे वाटत असत. बहिर्जी नाईक कुणाच्याहि नकला, वेशांतर करायला अगदी पटाईत होते. तसेच ते बोलण्यातही हुशार होते. त्यामुळे राज्यांनी त्यांना गुप्तहेर खात्यात रुजु करुन घेतले.

बहिर्जी नाईक यांचे गुण सांगायचे ठरले तर अंगात स्फ़ुरण आल्याशिवाय राहणार नाही. नाईक हे महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते. फ़किर, वासुदेव, कोळि, भिकारी, संत, अगदी कुठलेही वेशांतर करण्यात ते पटाईत होते. पण फ़क्त वेशांतरच नाही तर समोरच्या माणसाच्या नकळत त्याच्या तोंडातुन शब्द चोरण्याचं चातुर्य त्यांच्याकडे होतं. ह्यातं सर्वात मोठं आश्चर्य हे कि विजापुरचा आदिलशहा आणि दिल्लीचा बादशहा ह्यांच्या महालात वेशांतर करुन जात व स्व:त अदिलशहा व बादशहा कडुन ते पक्कि माहिती घेऊन येत. हेर असल्याचा संशय जरी आला तरी कत्तल करणारे हे दोन्ही बादशहा नाईकांना एकदा देखील पकडू शकले नाहीत यातच त्यांची बुद्धीमत्ता व चातुर्य दिसुन येतं.

महाराजांच्या गुप्तहेर खात्यात जवळजवळ तिन ते चार हजार गुप्तहेर असायचे. ह्या सर्वांच नेतृत्व नाईकांकडे होतं. हे सर्व गुप्तहेर नाईकांनी विजापुर, दिल्ली, कर्नाटक, पुणे इत्यादी शहरांत अगदी हुशारीने पसरवले होते. चुकिची माहिती देणार्यास कडॆलोट हा पर्याय नाईकांनी ठेवला होता. त्यांनी गुप्तहेर खात्याची जणुकाही एक भाषाच तयार केली होती. ती भाषा फ़क्त नाईकांच्या गुप्तहेरांना कळे. त्यात पक्षांचे, वार्याचे आवाज असे. कुठलाही संदेश द्यायचा असल्यास त्या भाषेत दिला जाई. महाराज आज कुठल्या मोहिमेवर जाणार आहेत हे सर्वात आधी नाईकांना माहित असायचं. त्याठिकाणची खडानखडा माहिती नाईक काढत व महाराजांपर्यंत लवकरात लवकर पोहचवीत. असं म्हटलं जात कि, महाराजांच्या दरबारात नाईक जर वेशांतर करुन आलेले असले तर ते फ़क्त महराजांनाच ओळखायचे-थोडक्यात दरबारात बहिर्जी नाईक नावाचा इसम नाहिच अशी सर्वांची समजुत असायची. ते फ़क्त गुप्तहेरच नाही तर लढवय्ये देखील होते. तलवारबाजीत-दांडपट्यात ते माहिर होते. कारण गुप्त हेरांना कधीही कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागेल हे त्यांना माहित होते. कुठल्याही घटणेचा ते खुप बारकाईने विचार करी. शत्रुचे गुप्तहेर कोण? ते काय करतात? ह्यांची देखील माहिती ते ठेवत. तसेच त्यांच्याकडे एखादी अफ़वा पसरवायची असल्यास किंवा शत्रुला चुकिची माहिती पुरवायची असल्यास ते काम ते चतुराईने करीत. फ़क्त शत्रुच्याच प्रदेशाची नाही तर महाराजांच्या स्वराज्याची देखील पुर्ण माहीती ते ठेवत.

शिवाजी राजे व शंभु राजे जेव्हा दिल्लीच्या बादशहाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला भेटायला गेले असताना त्याआधीच दिल्लीत नाईकांचे गुप्तहेर दाखल झाले होते कारण महाराजांना काहि दगा फ़टका होऊ नये ह्याची त्यांनी पुर्ण काळजी त्यांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी आपले साडे चारशे गुप्तहेर वेगवेगळ्या वेशात दिल्लीच्या कानाकोपर्यात लपवले होते आणि तेही महाराजांच्या येण्याच्या महिनाभर अगोदर केले. हा एकच प्रसंग परंतु महारांजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणुन त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफ़जलखानाचा वध, पन्हाळ्यावरुन सुटका, शाईस्ताखाणाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा, किंवा सुरतेची लुट असो प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पुर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रुची इत्यंभुत माहिती महाराजांना दिली होती.बर्याच वेळा महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्यांचा विचार करुन पाऊल टाके. राज्याभिषेक करताना महाराजांनी ज्या अष्ट मंडळाची निर्मीती केली होती त्यात गुप्तहेर खातं तयार करण्यात आलं होतं. तेव्हा देखील नाईक त्या खात्याचे प्रमुख होते.

राजगडापासून जवळपास ५०० कि.मी. अंतरावर असणारी सुरत हि व्यापारी पेठ लुटण्याचे ठरताच सुरतेची संपूर्ण माहिती, एवढेच नव्हे तर कुठे निश्चितपणे भरपूर धन हाती लागेल अशा सुरतेमधील ठिकाणांची तपशीलवार माहिती आणण्याच्या कामी महाराजांनी बहिर्जी यांना पाठविले. अचूक योजनेसाठी लागणारी अचूक माहिती बहिर्जी नाईकांनी किती कसोशीने मिळविली हे सुरतेची केवळ पाचच दिवसात लुटलेली कोट्यावधींची संपत्ती सांगते. या माहितीसाठी बहिर्जींनी कुठली सोंगे घेतली, गुप्त जागी ठेवलेल्या धनाचा पत्ता कसा लावला हे आजही आपल्यासून गुप्त आहे.

१६७९ साली जालानापूर लुटून महाराज येत असताना ती बातमी लागून संगमनेराजवळ मोगली सैन्याने मराठ्यांना गाठून कोंडीत पकडण्याची वेळ आणली होती. या भागातील डोंगरातील गुप्त वाटांची माहिती असणाऱ्या बहिर्जी नाईकांनी महाराजांना लुटीसह सुरक्षितपणे पट्टा उर्फ विश्रामगड या किल्ल्यावर पोहचविले.

हेर हे राजाचे डोळे आणि कान असतात हि म्हण सार्थ करणारे बहिर्जी नाईक महाराजांच्या अनेक यशस्वी मोहिमांमागे,धाडसी हल्ल्यांमागे, दूरवरच्या प्रदेशात अचानक जाउन केलेल्या लुटीमागे आणि सुखरूप परत येण्यामागे असणारी कल्पक, चतुर, प्रसंगावधानी आणि हरहुन्नरी व्यक्ती.

अश्या ह्या बहिर्जी नाईकांपासुन व त्यांच्या हुशारी पासुन आपण शिकण्यासारखं बरच काहि आहे. हे शक्य झालं नाही तरी नाईकांचे स्वराज्यासाठीचे लाखमोलाचे योगदान विसरु नका.

संभाव्य समाधीस्थान - बाणूरगड (भूपाळगड), ता. खानापूर, जि. सांगली.

http://badrinathraje.blogspot.com/2012/12/blog-post_22.html?m=1

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट