मी मराठी..
मी कोण आहे?
मी तोच मावळा आहे ज्याने
नेहमी स्वराज्यासाठी आणी राजांसाठी आपला जीव दिला…
मी तोच बाजी पासलकर आहे ज्याने
स्वराज्याच्या पहिल्या लढाईत आपले प्राण वेचले…
मी तोच दर्या सारंग आहे ज्याने तोफांच्या मारात किल्ला बांधुन काढला आणी स्वराज्याचा धाक समुद्रावर
बसविला…
मी तोच नूरखान बेग आहे ज्याने खराधर्म ओळखळा.
तो म्हणजे माणुसकी आणी महाराष्ट्र धर्म…
मी तोच कान्होजी जेधे आहे ज्याने
अफजलखानाच्या वेळी राजांची बाजु घेतली आणी १२ मावळातल्या देशमुखांना एकत्र करुन लढा दिला…
मी तोच जीवाजी महाल आहे ज्याने
शिवाजींसाठी स्वत:च्या जीवाची परवा न
करता गनिमाला ठार केले…
मी तोच शिवा काशिद आहे जो राजांनावाचवायला हसत हसत म्रुत्यु समोर गेला. फक्त मातीत नाही मेला तर
माती साठी मेला…
मी तोच बाजी प्रभू आहे ज्याने म्रुत्युलाही लाजविले.
छातीवर गोळी खाउन पण जो लढला. जो दोन दांडपट्टे घेऊन म्रुत्युशी झुंजला आणी तोफांचा आवाज ऐकुनच देह
सोडला…
मी तोच बहिर्जी नाईक आहे. शिवराज च्या रौद्र
रूपाचा तीसरा डोळा. गरूडाची नजर.
गनिमांच्या हालचालींवर सदा तत्पर…
मी तोच. जावळीतला मुरारबाजी आहे.
गडाचा दरवाजा उघडुन नंग्या तलवारी नाचवनारा.
शत्रुवर म्रुत्यु म्हणुन जो गारजला. वेळ प्रसंगी जीव दिला पण बेईमानी नाही केली…
मी तोच हिरोजी फरजंद. मी तोच मदारी मेहतर. राजा सुखरूप निसटे पर्यंत यामाच्या दरबारात जो आपल्या जीवाची परवा न करता राहिला…
मी तोच तान्हाजी आहे राजाच्या बालपनाचा सवंगडी जो आपल्या मुलाचं लग्न टाकुन कोंढान्याचं लग्न करायला निघाला. पण परत आलाच नाही. किती लोक आहेत जे घरचं काम टाकुन
समाजाचं काम करतात?
मी तोच शेलारमामा आहे. ८० वर्षाचाअसुन सुद्धा तरुणा सारखा डोर धरुन जो कडा चढला.
मी तोच सुर्याजी आहे.
तान्हाजी नावाच्या सिंहाचा भाऊ…
तो सिंह पडला तरिही जो खचला नाही…करेल किंवा मरेल म्हणुन सिंहगड जिंकला ज्याने…
मी तोच समशेरीचा फर्जंद आहे. कोंडाजी फर्जंद. ६० मावळे घेऊन ज्याने पन्हाळा जिंकला. थेट जंजिर्याला धडक दिली. तोफेच्या तोंडी गेला पण स्वाभिमानाने मेला.
मी तोच स्वराज्याचा सरनौबत आहे ज्याने आपलं पुर्ण
आयुष्य स्वराज्यासाठी अर्पण केलं. जो उभ आयुष्य
स्वराज्यासाठी झटला… स्वताच्या जीवाची तर कधीच
परवा नाही केली.मी तोच आहे जो आपल्या पराक्रमाने
शिवराय झाला. होय. मी तोच प्रती शिवराय आहे.
मी तोच नेताजी पालकर आहे…
मी तोच कडतोजी आहे जो आपल्या प्रतापाने प्रतापराव
झाला. जो मनापासनं राजांवर प्रेम कारायचा.
स्वराज्यासाठी क्षणाचाही विचार न करता जो म्रुत्युस
सामोरे गेला…
मी तोच सिद्दी हिलाल आहे जो ‘वेडात वीर’ मरण
पावला.
जो वार्या सारखा आला आणी तीरासारखा गनिम कापुन
गेला…
मी तोच हंब्बिर्राव आहे ज्याने नात्या समोर
कर्तव्याला आणी स्वराज्य निष्ठेला मोठ समजलं.
आणी शेवट पर्यंत आपल्या धन्याची साथ नाही सोडली…
मी तोच ज्याने हंबिरपणे
आतल्या आणी बाहेरच्या दोन्ही शत्रु पासुन स्वराज्य
वाचविलं. मी तोच हंब्बिर्राव ज्याने
अफजलखानाच्या वेळी एकट्याने ६०० गनिमांना नर्क
दाखवलं…
मी तोच राजांचा बालपणाचा मित्र, येसाजी कंक.
राजाचा मान ठेवायला जीवाची परवा न करता थेट
ऐरावताला जो अंकुशा सारखा जाऊन
भिडला आणी गर्दिस आनले.
स्वराज्याचा भार संभाळनारे दोन पैलु, मी तेच,
औरंग्याची झोप उडविनारे, संताजी आणी धनाजी.
धाकल्या धन्याच्या म्रुत्यु नंतर जमिनीचा एक
तुकडा सुद्धा औरंग्याच्या हाती ज्यांनी लागु
नाही दिला…
मी तोच रायप्पा महार आहे. शंभू छत्रपतींचा सवंगडी.
जातीने नाही तर कर्माने जो मराठा आहे.
आणी मी तोच हिरोजी इंदलकर आहे. आपली जमीन, वाडे
विकुन राजधानी बांधुन काढनारा. मी तोच
हिरोजी जो राजांच्या पायाची पायधुळ जरी मस्तकावर
पडली तरिही आयुष्य धन्य झालं हे समजणारा…
हो. मी तोच मावळा आहे जो आजही एक वेळा नाही तर
हजार वेळा राजांसाठी मरायला तयारआहे
आणी राजांसाठीच जगायला सुद्धा…
मी तोच.
॥सेवेठाई सद तत्पर॥
॥शिवराय नाही होता आलं तर ‘शिवा काशीद’ व्हा.
शिवा साठी ‘जिवा’ बना.
शिवाजींसाठी जिवाची ‘बाजी’ लावा.
अवघड क्षणी ‘नेता’ व्हा.
प्रत्येक वेळी ‘प्रताप’ गाजवा.
परिक्षेच्या क्षणी ‘हंब्बिर’ बना.
अंधार दूर करणारा ‘सुर्य’ व्हा.
आणी स्वराज्याची ‘तान्ह’ कधीच मिटु नका देऊ…॥
मी कोण आहे.
मी शिवछत्रपतींचा मावळा आहे.
मी एक विचार आहे.
मी शहाजी राजांचा विचार आहे.
मी जिजाऊंचा विचार आहे.
मी शिवछत्रपतींचा विचार आहे.
मी शंभूछत्रपतींचा विचार आहे.
मी नेताजी पालकरांचा विचार आहे.
मी ‘अमर’ आहे.
कारण माणसं मरतात.
विचार कधीच नाही मरत………… ……
— अभिनव काळे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा