विदर्भाशी तीनदा आला शिवाजीराजांचा संबंध
Maharashtra Times | Updated: 07 Jun 2017, 04:00:00 AM
राजे शिवाजी फक्त कारंजाला येऊन परत गेले, अशी माहिती वैदर्भीयांना आहे. वस्तूतः शिवाजीराजांचा तीनवेळा विदर्भाशी संबध आला होता, असे अभ्यासपूर्ण मनोगत विदर्भातील युवा इतिहास संशोधक आणि अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केले. मटाच्या वर्धापनदिन सप्ताहातील व्याख्यानात त्यांनी मांडलेल्या सडेतोड मतांनी श्रोते भारावून गेले.
राजे शिवाजी फक्त कारंजाला येऊन परत गेले, अशी माहिती वैदर्भीयांना आहे. वस्तूतः शिवाजीराजांचा तीनवेळा विदर्भाशी संबध आला होता, असे अभ्यासपूर्ण मनोगत विदर्भातील युवा इतिहास संशोधक आणि अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केले. मटाच्या वर्धापनदिन सप्ताहातील व्याख्यानात त्यांनी मांडलेल्या सडेतोड मतांनी श्रोते भारावून गेले.
शिवाजी महाराज बालपणी पाच वर्षे सिंदखेडराजाला राहिले. विदर्भातील सिंदखेडराजा हे जिजाऊंचे माहेर होते. शहाजी महाराजांना बंगरुळला आदिलशाहीने पाठविले होते. जिजाऊंकडे कुणी नव्हते. आक्रमणे सुरू होती म्हणून मामांच्या गावाला दौलतराव जाधवांकडे ते थांबले होते.
डिसेंबर १६७० मध्ये कारंजा लाडमधून महसूल वसुलीसाठी ते आले होते. तीन दिवस ते तिथे होते. त्यांचे राहणे तंबूत असावे.
जीवा महालांचे आडनाव संपकाळ नव्हे, तर तवरे होते. महाले ही त्यांना दिलेली पदवी होती.
शिवाजींच्या राज्यात पेशव्यांना सर्वाधिक पगार असायचा.
छत्रपतींचे राजगडावरून २४ वर्षे न्यायदान
ज्या राजगडावरील सदरीवरून महाराजांनी सलग २४ वर्षे न्यायदान केले, ती सदर सन २०१६ मध्ये सरकारने बांधली. मात्र, काही महिन्यांत ती पडली. ठेकेदार पळून गेल्याने पडक्या अवस्थेतील सदर आपल्याला अजूनही बघावी लागतेय.
राजे शिवाजींनी आपल्या दोन शत्रूंना पत्रांनी संपविले. त्यातील एक मिर्झाराजे जयसिंग आणि दुसरे सिद्दी जौहर. जयसिंगांच्या बाबतीत औरंगजेबाला पत्र लिहून, तर सिद्दी जौहरच्या बाबतीत आदिलशहाला पत्र लिहून त्यांनी गनिमीकावा खेळला.
‘
अशीच अमुची आई असती अम्हीही सुंदर झालो असतो’ हे गाणे महाराजांबद्दल ऐकविले जाते. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. महाराज वडील शहाजीराजेंसारखे दिसायचे. त्यांचे दूधभाऊ हिरोजी फर्जंद हे शिवाजी महाराजांसारखे दिसायचे. म्हणूनच आग्रा सुटकेच्यावेळी शिवाजींच्या जागेवर हिरोजींना झोपवून ठेवले होते.
मावळ्यांवर राजेंचा होता अतोनात विश्वास
‘मटा’च्या पाचव्या वर्धापन दिनाच्या सप्ताहाला सोमवारी उत्साहात सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांच्या या मालिकेतील ‘राजे शिवाजी आणि मावळे’ विषयावरील व्याख्यान मंगळवारी पार पडले. शेवाळकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रसिद्ध अभ्यासक अनिरुद्ध पाटील यांनी शिवाजी महाराजांचे कार्य आणि त्यांना मावळ्यांची लाभलेली भक्कम साथ यावर प्रकाश टाकला.
‘होता जीवा म्हणून वाचला शिवा’ यावर अनेक आख्यायिका ऐकलेल्या असल्या तरी जीवा महाला दानपट्टा चालवण्यात कसा तरबेज होता आणि राजांनी त्याला कसे हेरले, बहिर्जी नाईक महाराजांकडे नोकरी मागण्यासाठी आला असता त्याने गुप्तहेराचा संदेश कसा चुकीचा होता, हे महाराजांना पटवून सांगत त्यांच्या सैन्यात कसे स्थान पटकावले, कान्होजी जेधे यांनी मृत्यूच्या दाढेत असताना आपली पाच मुले महाराजांच्या चरणी कशी अर्पण, याचे अनिरुद्ध पाटील यांच्याकडून वर्णन ऐकून उपस्थित अचंबित झाले. लढाईला जाण्याआधीच शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांना सोन्याचे कडे बहाल करत आपले या मावळ्यांवर किती प्रेम आणि विश्वास आहे, याचे उदाहरण समोर ठेवले होते. अशा या जिगरबाज मावळ्यांचा इतिहास कितीही शौर्याने भरलेला असला तरी आज मात्र त्यांच्या समाधींची दुर्दशा झालेली असल्याबद्दल अनिरुद्ध पाटील यांनी खंत व्यक्त केली.
जात, पात, धर्म, पंथ कशाचीही तमा न बाळगता शिवाजी महाराजांनी सर्वांना माणूस म्हणून स्वीकारले.
..................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा