हा ब्लॉग शोधा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

 मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा' (Subah) ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रमुख 'सुभेदार' म्हणून ओळखला जात असे. सोळाव्या शतकात मुघल शासकांनी प्रशासनाच्या सोयीसाठी आणि प्रभावी नियंत्रणासाठी सुभ्यांची विभागणी प्रशासकीय विभागात केली होती. उदा. सरकार (District- जिल्हा), परगणा (Pargana- लहान विभाग) आणि कसबा (Qasba/Mauza- छोटे खेडे).

मुघल बादशहाचा प्रतिनिधी म्हणून निजामाने दख्खनमध्ये देखील ह्याच पद्धतीचे/आकृतीबंधाचे पालन केले. हैदराबाद राज्याचा कितीतरी भाग मराठ्यांच्या किंवा इंग्रजांच्या ताब्यात गेला. तरी १८६४ पर्यंत कागदोपत्री पूर्वीचे सुभे म्हणजे प्रांत आणि सरकार म्हणजे जिल्हे यांचा उल्लेख केला जात असे.

त्याकाळी मराठवाड्याचा भाग दोन ते तीन सुभ्यात तसेच जुन्नर आणि कोकण हे भाग औरंगाबाद सुभ्यात मोडत, हे वाचून आपल्याला आश्चर्य वाटेल!

निजाम-उल-मुल्क हा दख्खनचा व्हाईसरॉय असतानाच्या काळात दख्खनमधील सुभ्यांची एकूण संख्या सहा होती.

हे सहा सुभे खालीलप्रमाणे होते.-

१. औरंगाबाद (Khusjistabunyad)

२. खानदेश (Khandesh)

३. वऱ्हाड (Berar)

४. बिदर (Muhammadabad)

५. विजापूर (Darul-Zafar)

६. हैदराबाद (Farkhundabunyad)

▪️सुभे औरंगाबादमध्ये दौलताबाद, अहमनगर, पैठण, परंडा, बीड, जालना, संगमनेर, फत्तेहाबाद धारूर, सोलापूर, जुन्नर, तळकोकण, जव्हार हे सरकार किंवा जिल्हे येत होते.

▪️सुभे खानदेशमध्ये सहा सरकार म्हणजे जिल्हे होते. यामध्ये असीरगड, बिजागडखरगोण, बागलाण, कालणा, नंदुरबार, हंडिया यांचा समावेश होता.

▪️सुभे वऱ्हाड या सुभ्यात पाथरी, मेहकर, बेनालवाडी, पाईनघाट/गाविलगड, कळंब, खेडला, नरनाळा, पूर्णा, देवगड, शिरपूर या जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे बिदर या सुभ्यात बिदर, कल्याणी, मलखेड, यादगीर हे जिल्हे होते.

▪️सुभे विजापूरमध्ये गुलबर्गा, तळगाव, असदनगर, अधोनी, बंकापूर, तोरगल, रायबाग, गाजीपूर, नळदुर्ग, मुद्गल, मुस्तफाबाद, नुसरताबाद, पन्हाळा वगैरे जिल्ह्यांचा समावेश होता.

▪️सुभे हैदराबादमध्ये आंध्र आणि तामिळनाडूमधील भागांचा समावेश असे.

निजाम-उल-मुल्क आसफ जाह पहिला हा मुघल दख्खनचा तीन वेळा प्रांतीय गव्हर्नर होता. पहिल्यांदा १७१३ ते १७१५ पर्यंत, नंतर १७२० ते १७२२ पर्यंत आणि पुन्हा १७२४ ते १७४८ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत. निजाम-उल-मुल्कच्या मृत्यूच्या वेळी मुघल दख्खनचे प्रादेशिक अधिकार क्षेत्र त्रिचीनोलीच्या किल्ल्यापर्यंत (Fort of Trichinoaly) होते आणि त्यामध्ये वर उल्लेख केलेल्या सहा सुभ्यांचा समावेश होता.

तळटीपा

शिवकालीन इतिहासातील परगणा, सुभा व तर्फ अशा शब्दांसाठी सध्या कोणते शब्द वापरात आहेत?

 शिवकालीन इतिहासात सुभा, परगणा आणि तर्फ किंवा तरफ असे गाव आणि लोकसंख्येवर आधारीत प्रशासकीय विभाग होते. आपण या बाबत एक उदाहरण म्हणुन जावळीचा इतिहास पाहिला तर या शब्दांचा आत्ताच्या प्रशासकीय विभागाशी तुलना केल्यास, आपल्याला नेमका अर्थ समजेल.

१) जावळी हे प्रांत किंवा राज्य म्हणू शकतो.

२. सुभा किंवा परगणा म्हणजे जिल्ह्याच्या सम असे म्हणू शकतो. यात एकूण ४ सुभे / जिल्हा होते.

३) तर्फ/तरफ - दिशा, बाजू, पक्ष, तालुका, पेटा.

एकूण १८ तर्फ / तरफ म्हणजे आताचे तालुके असे आपण म्हणू शकतो.

हेच आपण असे पण म्हणू शकतो.

जावळी हा एक प्रांत / राज्य म्हणून ओळखला जायचा. प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा*. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४. आणि तर्फ* म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.

म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.

यात एकूण अठरा तर्फा, कोणते तर खालील प्रमाणे ;

१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.

२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.

३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.

४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.

म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं जावळी प्रांताच्या अधिपत्याखाली येत होती.

म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.

संदर्भग्रंथः-

१) जेधे शकावली

२) प्रतापगडदुर्गामहात्म्य

३) शि.च.सा.ख.-१०-पृ-५४

४) शाहू दफ्तर

५) स्वराज्याची सनद

६) मोरे बखर (ऐतिहासिक 


भारतात महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास 'तालुका' (Taluka) असे संबोधले जाते. तालुक्याला 'तहसील' (Tehsil) असेही म्हणतात. तालुका या प्रशासनाचा प्रमुख 'मामलेदार(हिंदीत-तहसीलदार) असतो. तहसीलदार तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत असतो.

गुजराती, बंगाली, उत्तरेकडील राज्ये तसेच पंजाबी प्रदेशांत तालुक्याला 'तहसील', आंध्रप्रदेश आणि तेलंगणात 'मंडल' (Circle) तर केरळ-तामिळनाडूमध्ये 'तालुक्क' असे म्हणतात.

तालुका निर्मिती-

'तालुका' हा पदोपदी वापरला जाणारा शब्द. 'जिल्ह्याचा एक भाग' असा त्याचा अर्थ आहे. तालुक्याला दैनंदिन कारभाराच्या सोयीसाठी निर्माण केलेला प्रांतविभाग असेही म्हणतात. पूर्वी एखादा किल्ला अथवा गांव यास केंद्र मानून त्याच्या आसपासची गावे समाविष्ट करून 'तालुका' तयार केला जात असे. अनेकदा एखादी नदी हीच सीमारेषा मानून तालुक्याची सरहद्द तयार केली जात असे.

तालुका हा शब्द 'तअलक' किंवा 'तअल्लुक' या फारशी शब्दांपासून मराठीत तयार झालेला शब्द आहे.

मुगल काळात प्रशासकीय युनिटला 'परगणा(Pargana) असा शब्दप्रयोग होता. काही गावांचा (मौजे) समावेश या परगणा महसूली विभागात केला जात असे. परगणा व्यवस्थेची सुरुवात दिल्ली सल्तनतीने केली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी या विभागांना जिल्ह्यामध्ये समाविष्ट केले. तसेच या जिल्ह्यांचे उपविभाग म्हणून 'तहसील' किंवा 'तालुका' यांची निर्मिती झाली.

अशी आहेत इतिहासातील प्रसिद्ध, १२ मावळ ; हा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

 अशी आहेत इतिहासातील प्रसिद्ध, १२ मावळ ; हा इतिहास तुम्हाला माहित आहे का?



सह्याद्रीच्या मुख्य रांगेला पूर्वेकडे अनेक लहान लहान शाखा फुटल्या आहेत. आशा दोन उपशाखांच्या मधून सामन्यात:एखादी छोटीशी नदी उगम पावते. या नद्यांच्या खोऱ्यांना मावळ किंवा खोरी म्हणत. त्यामुळे या प्रांतात वाहणाऱ्या नद्या, उपनद्या, किल्ल्यांच्या अथवा गावांच्या नावावरून हा प्रदेश ओळखला जातो.


छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना हे बारा मावळ एकत्र करून केली.


या डोंगराळ मावळ प्रांतची सिमा दक्षिणेकडे रायरेश्वराचे पठार ते उत्तरेकडे राजमाची किल्ला परिसर, पश्चिमेकडे अभेद्य जावळीचे खोरे, कोकण प्रदेश आणि पूर्वेकडे सपाट पुणे परगणा अशी आहे. या भूप्रदेशात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत .


या मावळांनी सुभान मंगळ लढाई, प्रतापगड रणसंग्राम, सुरतेची लुट, पावनखिंड रणसंग्राम, शाहिस्तेखानावरील छापा, अशा अनेक इतिहास प्रसिद्ध प्रसंगात पराक्रम गाजवला आहे. आशा या लढाऊ भागाची भौगोलिक माहिती.


१. रोहिड खोरे

रोहिड खोरे नीरा नदीच्या खोऱ्याच्या काही भागात वसले आहे. त्यात एकूण ४२ गावं आहेत. तर रोहिडा किल्ला हे या खोऱ्याचं मुख्य ठिकाण होतं. या खोऱ्यातील देशमुखी खोपडे आणि जेधे या दोन घराण्यात विभागली होती. कान्होजी जेधे यांच्याकडे भोर तरफ भागाची देशमुखी होती, तर उत्रोली तरफ भागाची देशमुखी खोपडे यांच्याकडे होती. आशा रोहिडे खोऱ्याच्या दोन तरफ झाल्या होत्या.


कान्होजी जेधेंची राजनिष्ठा अभंग असल्याचा प्रत्यय अफजल खान वध प्रसंगी आला होता. अनेक देशमुख खानाला जावून मिळत असताताना कान्होजींनी शिवरायांना भक्कम पाठिंबा दिला. शिवरायांच्या दरबारात पहिले पान होते, म्हणजे कोणतीही मोहीम आली तरी पहिले पत्र जेधेंना पाठवले जायचे.


२. हिरडस मावळ

हिरडोशी या गावावरून या मावळाला हिरडस मावळ असे म्हटले जायचे. या मावळात एकूण ५३ गावे होती. त्यातील काही काही भाग हा निरा नदीच्या खोऱ्यात येतो. हिरडस मावळची देशमुखी ही बांदल घराण्याकडे होती.


यातील ५३ गावापैकी फक्त शिंद या गावच्या नावामागे कसबा ही उपाधी होती. तर इतर गावच्या मागं मौजा ही उपाधी लावलेली असायची. त्यावरून शिंद हे त्या मावळाचे मुख्य ठिकाण होते. ही सर्व गावं सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात.


३. वेळवंड खोरे

हे खोरं वसलं आहे ते वेळवंडी नदीच्या खोऱ्यात. एकूण ३३ गाव या खोऱ्यात होती. वेळवंडी नदी गुंजण मावळात उगम पावते आणि पुढे वेळवंड खोऱ्यातुन वाहत जावून रोहिड्या खोऱ्यातील नीरा नदीस मिळते.


हर्णस, पसुरे, करंदीकांबरे, तळे मशिवली, लव्हेरी, जोगवडी आदी ऐतिहासिक गावे या खोऱ्यात आहेत. त्यातील हर्णस हे खोऱ्याचं मुख्य केंद्र होते. तर या मावळची देशमुखी होती सरदार बाबाजी धुमाळ यांच्याकडे. “डोहर” यांना “आढळराव” असा किताब होता.


४. गुंजन मावळ

हे मावळ गुंजवणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. गुंजवणी नदी याच मावळात उगम पावते आणि पुढे नीरा नदीस जावून मिळते. जवळपास ८१ गावं या खोऱ्यात होती. खोऱ्याच्या उत्तरेस कानद खोरे, ईशान्येस खेडबारे, पूर्वेस शिवगंगा नदी, अग्नेयेस वेळवंड खोरे, दक्षिणेस हिरडस मावळ, नैऋत्य व पश्चिमेस कोकण आणि वायव्येस मोसे खोरे.


गुंजन मावळातील गावापैकी काही गावे सध्याच्या भोर तालुक्यात येतात. आणि काही वेल्हा तालुक्यात मोडतात. या मावळातील मुख्य गाव आंबवणे. स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही देखील याच खोऱ्यात येते.


इथली देशमुखी होती सिलिंबकर घराण्याकडे. ते शिवाजी महाराज्यांच्या स्वराज्याच्या उपक्रमात पहिल्यापासून सहभागी होते. महाराजांच्या खास घरोब्यातील देशमुख म्हणून त्यांना ओळखलं जायचं. मराठेशाहीच्या अखेरपर्यंत या घरातील पुरुषांनी कर्तबगारी गाजवली.


५. कानद खोरे

हे मावळ कानंदी नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे. कानंदी नदी याच खोऱ्यात उगम पावते आणि पुढे गुंजण मावळात गुंजवणी नदीस मिळते. या मावळाच मुख्य ठिकाण म्हणजे कानद. या मावळच्या सीमेवच स्वराज्यची मुहूर्तमेढ ज्या तोरणा किल्ल्यावर रोवली तो आहे.


या मावळची देशमुखी मरळ घराण्याकडे होती. झुंझारराव हा किताब त्यांना मिळाला होता. भट्टी, पाबे, विंझर, धानेप कोंढावळे, चापटे आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत.


६. मोसे खोरे

हे मावळ मोसे/मोशी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. ही नदी मोसे खोऱ्यातच पुढे मुठा नदीस मिळते. या मावळात ८२ गावे आहेत. त्यात तव, निगडे-मोसे, शिरकोली अशी ऐतिहासिक गावे आहेत. या भागात कुंभा, कावळ्या देव आदी घाट आहेत.


मोसे बुद्रुक हे या मावळच मुख्य ठिकाण. इथली देशमुखी होती पासलकर घराण्याकडे. यशवंतराव हा त्यांचा किताब होता.


७. मुठा खोरे :

मुठा खोरे हे मुठा नदीच्या उगमापासून काही अंतरावरच्या खोऱ्यात वसलं आहे. पुढे ही नदी मोसे खोऱ्यातुन व कर्यात मावळातून वाहत जाते आणि पुणे परगण्याच्या हवेली तरफेतील मुळा नदीस जावून मिळते.


आंदगाव, मुठा अशी ही एकूण १९ गावं या मावळात आहेत. या मावळात एकही किल्ला नाही. मारणे घराण्याकडे इथली देशमुखी होती. त्यांना गंभीरराव असा किताब होता.


८. पौड  खोरे

हे मावळ मुळा नदीच्या उगमा पासूनच्या काही अंतरावरील खोऱ्यात वसलेले आहे. या मावळातील गावांची संख्या एकूण ८२ इतकी होती. पौड हे इथलं मुख्य ठिकाण असलं तरी पौड खोऱ्यात ३ तरफ होत्या. यात गिर्हे तरफ, तामणखोरे तरफ, कोर बारसे तरफ,


या मावळात घनगड व कोरीगड ( कुवरीगड ) हे दोन किल्ले होते. या मावळात ताम्हिणी घाट लेंडी घाट, वाघजाई घाट, गाढवलोट घाट आहेत. इथली देशमुखी होती ढमाले घराण्याकडे. आणि त्यांचा किताब होता राऊतराव.


९.पवन मावळ :

हे मावळ पवना नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. हि नदी पुढे मुळा आणि भीमा नदीला मिळते. या मावळात एकूण ८० गावे आहेत. या मावळात बेबड ओव्हळ, शिंदगाव आदी ऐतिहासिक गावे आहेत.


पवन मावळाच्या दोन तरफा आहेत. त्यापैकी शिंदे तरफेची देशमुखी शिंदेकडे होती. त्यांच्याकडे ३७ गावे आहेत. आणि घारे तरफेची देशमुखी ही भोपतराव घारे देशमुख यांच्याकडे होती. त्यांच्याकडे एकूण ४३ गावे आहेत.


या मावळातील गावे ही सध्याच्या मावळ तालुक्यात व काही गावे पौड तालुक्यात मोडतात. उत्तरेला लोहगड विसापूरची डोंगर रांग; पश्चिमेला आतवण , मोरवे ही गावे; पूर्वेला चांदखेड, बेबड वोहोळ तर दक्षिणेला दखणे, सावरगाव या पवन मावळच्या सीमा होत्या.


तुंग उर्फ कठीणगड व तिकोणा उर्फ वितंडगड हे या मावळातील किल्ले. सतराव्या शतकाचा शेवट ते १९४७ सालापर्यंत पौन मावळातील हे दोन किल्ले व बरीच गावे पंत सचिवांच्या भोर संस्थानात होती.


१०. नाणे मावळ

हे मावळ इंद्रायणी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. इंद्रायणी पुढे भीमा नदीला मिळते. या मावळा ८९ गावे आहेत. यात नाणे, टाकवे, कार्ले आदी ऐतिहासिक गावे आहेत. यातील नाणे हेच या मावळचे मुख्य केंद्र होते.


या मावळात बोरघाट व कुरंवडी आदी घाट आहेत. या मावळात राजमाची, लोहगड, विसापूर, असे अत्यन्त महत्वाचे किल्ले आहेत. इथली देशमुखी गरुड आणि दळवी या घराण्यांकडे होती.


११. खेडबारे मावळ

हे मावळ शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेले आहेत. ही नदी सिहंगडच्या दक्षिणेस उगम पावते आणि सध्याच्या पुणे-सातारा रस्त्याच्या पश्चिमेस समांतर वाहत पुढे जावून गुंजवणी नदीस मिळते. गुंजवणी नदी पुढे नीरा नदीस मिळते.


या मावळात ४२ गावे आहेत. खेड शिवापूर, रांझे, कोंढाणपूर, कल्याण, कापूरहोळ आदी ऐतिहासिक गावे या मावळात आहेत. तर खेड हे या मावळचे मुख्य ठिकाण, या मावळात सिंहगड किल्ला आहे.


इथली देशमुखी कोंडे या घराण्याकडे होती.


१२. कर्यात मावळ

ही पुणे परगण्याची एक तरफ आहे. कर्या म्हणजे खेडेगाव, कर्यात मावळ म्हणजे मावळची खेडी. या मावळात ३६ गावे होती. त्यापैकी १८ गावाची देशमुखी ही करंजावणे घराण्याकडे होती, आणि १८ गावची देशमुखी पायगुडे घराण्याकडे होती.


करंजावणे देशमुखांचा किताब “भालेराव” असा होता तर पायगुडे देशमुखांचा किताब “रवीराव”असा होता.


या मावळात खामगाव मावळ, आगळंबे, मांडवी, आदी ऐतिहासिक गावे आहेत. तसेच पुणे परगण्याच करेपठार, जेजुर , सासवड, पांगारी, नारायण पेठ आदी ऐतिहासिक गावी आहेत. पुरंदर किल्ला या परिसरात आहे.


छत्रपती शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव संबंध
==============================


दादाजी कोंडदेव ह्यांचे मुळचे नाव दादाजी कोंडदेव गोचीवडे कुलकर्णी मलठणकर होत. ह्यांना मलठणचे परंपरागत कुलकर्ण. ह्यांचा इतिहासात उल्लेख दादोजी कोंडदेव असाही येतो परंतु समकालीन पुराव्यानुसार ’ दादाजी कोंडदेउ / दादाजी कोंडदेव ‘ हेच योग्य आहे.

दादाजी कोंडदेव तसे सुरवाती पासून आदिलशाहीचे चाकर,कोंढ़ाण्याचे नामजाद सुभेदार , पण आदिलशहाने वैराण केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा घडी बसवण्याकरिता करीता, दस्तूर खुद्द शाहजी महाराजानी, दादाजी कोंडदेव यांची पुण्यावर नेमणूक केली. शाहजी महाराजांचा जो मुलुख – पुणे, इंदापूर, सुपा याचा कारभार दादाजी कोंडदेव पाहत होते.

दादाजी कोंडदेव यांचा पहिला जुना उल्लेख हा, इ.स. १६३३ मधला मिळतो, पुणे परगण्याच्या महमदवाडी या गावा संबधीचा आहे, त्या गावचा जाऊ पाटिल याने लिहून दिले आहे -
१) बापूजी देऊ पाटिल घुले हा आपला भाऊ दुष्काल पडला म्हणून गाव सोडून परमुलखास गेला, त्यावर वडिल मेले, आम्ही वाचलो, सुकाळ जाला. “यावर दादाजी कोंडदेव दिवाण जाले, त्यानी मुलुख लावला ” असा उल्लेख आहे. (शिव चरित्र साहित्य खंड २, लेखांक ९५ )

२) छत्रपति शाहू महाराज (पाहिले – छत्रपती शंभूराजांचे पुत्र) यांनी शिरवळ परगण्याच्या देश कुलकर्ण विषयी एक निवडा केला आहे, त्या परगण्याचा कुलकर्णी यादित गंगाधर याला दिलेले १ ओक्टोबर १७२८ या तारखेचे अस्सल पत्र उपलब्ध आहे ( शिव चरित्र साहित्य खंड 1 ,ले-८२- पृ ९३-९७),
ह्यावेळी पुरावा म्हणून जी पत्रे शाहू महाराजान्समोर मांडली गेली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ ला शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले पत्र आहे, दादाजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जीजाबाई साहेबांचा उल्लेख ” सौभाग्य वती मातुश्री जीजाआऊ साहेब ” असा आहे (शिव चरित्र साहित्य खंड 1 ,ले-८२-पृ 96 ).

दादाजी पंतांच्या बाबतीत विकृत लिखाण करणाऱ्या समाज कंटकांना आणि अविचारी जेम्स लेन सारख्या व्यक्तिना हे चोख उत्तर नहीं का ?

छत्रपति शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव यांचा संबंध काय होता ? हे पाहूया.

काही लोक ते गुरु होते किंवा नव्हते यावर वाद घालत बसतात, महाराज त्याना काय स्थानी मानत होते हे महाराजांनाच माहिती, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला ते कधी समजणार नहीं कारण आपली ती कुवतच नाही, पण एक मात्र निश्चित की महाराजांचे बालपणाचे सगळे शिक्षण, हे त्यांच्याच देखरेखीखाली झाले, कुणी गुरु मानत नसेल नसो; पण महाराजाना राजकीय शिक्षणाचे धडे “दादाजी कोंडदेव” यानीच दिले, महाराजांना मार्गदर्शक म्हणुन तेच लाभले, ह्या मागची प्रेरणा मात्र “शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई साहेब” हे निःसंकोच होतेच.

पंत दादाजी कोंडदेव यांनी घालून दिलेल्या पद्धती सुयोग्य असल्यामुळे त्यात बदल न करणारे शिवाजी महाराज.

‘दादाजीने केले असेल, ते रास्तच असेल’

पंत शिवाजी महाराजांच्या आदर स्थानी होते हे निश्चित. ह्या संबंधात किती तरी अस्सल पुरावे आहेत, ते आपण पाहूया -

१) मावळाचा सुभेदार माहादजी सामराज याने कर्यात मावळ तरफेचा हवालदार माहादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी माहादाजी सामराजास पाठविलेले एक पत्र उद्धृत केले आहे. “साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला नवे करू देत नाहीत दादाजी कोंडदेव यांच्या कारकीर्दीत चालत आले असेल, ते खरे’‘, असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.

(संदर्भ : शिवचरित्र साहित्य, खंड २ ले- ११०)

२) पुणे परगण्याच्या नीरथडी तर्फेतील परिंचे या गावच्या पाटीलकी विषयी शिवाजी महाराजांनी नीरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठवलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही “वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीत चालिले आहे ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे”, असे म्हटले आहे.

(संदर्भ: भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, वर्ष ७, अंक १-४ (एकत्र), पृ. ४६.)

३) पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.
(संदर्भ : मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड १८, लेखांक १८)

४) मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता. त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर १६७८ या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. या पत्रातही “दादाजी कोंडदेव यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे” असे म्हटले आहे. हे पत्र तर विशेष वाचावे. शिवचरित्राचे अनेक पैलू उघड करणारे ते पत्र आहे.
(संदर्भ : भारत इतिहास संशोधन मंडळाचे शक १८३५ चे इतिवृत्त, पृ. ४१-४२)

५) शिवचरित्र साहित्य खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्याची हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. “दादो कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो’‘ असे त्यात म्हटले आहे.

६) दादाजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर पेठ वसवली अशी माहिती खेडेबार्‍याच्या देशपांड्यांच्या करिन्यात आहे.
(संदर्भ : पुरंदरे दप्‍तर, भाग ३, पृ. १३२-३३)

७) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख हा फक्‍त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटचा कलमातील तो उल्लेख असा आहे :

“शके १५५७ युव नाम सवंत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.” ( शिवचरित्रप्रदीप, पृ. ७१ ) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडात आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.

पंत दादाजी कोंडदेवांनी केलेल्या कामगिरीचे आणि शिवाजी महाराजांना त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदराचे द्योतक असे खुद्द शिवाजी महाराजांच्या पत्रांमधील आणि इतर समकालीन व उत्तरकालीन कागदपत्रांमधील पुरावे वर दिलेच आहेत पण ते हयात नसताना देखिल महाराज त्यांचे दाखले देऊन न्याय निवाडे करतात हे विशेष, यावरून ज्याने त्याने ठरवावे की “शिवाजी महाराज आणि दादाजी कोंडदेव संबंध” हा काय होता ते.

|| लेखन सीमा ||

-विशाल खुळे
(http://raigad.wordpress.com/ वरुन साभार)

छत्रपती, दादोजी आणि रामदास


छत्रपती, दादोजी आणि रामदास – शेजवलकरांच्या नजरेतून

shivrai

महाराष्ट्रात मराठा-ब्राम्हण वाद राजकीय स्वार्थासाठी उभा केला गेला आणि त्याला अजूनही भडकता ठेवण्यासाठी काही लोक प्रयत्नशील आहेत. या वादाच्या वणव्यात छत्रपती शिवाजी महाराज, दादोजी कोंडदेव व समर्थ रामदास यांना हवे तसे वापरले गेले आहे … छत्रपती शिवाजी महाराज लोकोत्तर राजे … त्यांचा गुरु कोण? यावरून आजच्या राजकारणात आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न असतो … छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र कट्टर हिंदुत्ववादी रंगात रंगवल्याचा आरोप शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर अनेकदा केला घेला आहे … त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा हा वाद उकरून काढला गेला. … हल्ली श्रीमंत कोकाटे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवारांनी केलेलं विधान पाहूया – “पवार म्हणाले, शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षकाने जे शिकवला त्यावर आधारित होता. शिक्षण देण्याचे काम वरिष्ठ वर्गाला होते. त्यामुळे त्यांनी त्याना हवा तसाच इतिहास मांडला.” आता वरिष्ठ वर्गातले लेखक कोण हे स्पष्ट लिहीलं असतं तर तपासणं शक्यही झालं असतं. हे खरं आहे की शिवाजी महाराजांची मांडणी विविध राजकीय दृष्टिकोनातून वेगवेगळ्या रंगात झाली आहे … कोणाला गो-ब्राम्हणप्रतिपालक महत्त्वाचा वाटलं, कोणाला हिंदुत्ववादी (आजच्या संदर्भात) तर कोणाला कुळवाडीभूषण. काही जण आजच्या संवैधानिक संज्ञेत छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात…. मग त्यांच्या पदरी असलेल्या मुस्लिम अधिकाऱ्यांची नावे येतात … अफझलखानाचा वकील असलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचे नाव येते (पंताजी गोपीनाथचे नाव वगळून) मग एक पाऊल पुढे टाकून अफझलखान, औरंगजेब सर्वांना सेक्युलर सिद्ध करण्यात येते… ही सगळी मांडणी खरा इतिहास आहे, बामणी काव्यावर उपाय आहे म्हणून मांडण्यात येते … आणि शिवशाहीर पुरंदरे इतिहासाचे विकृतीकरण करणारे म्हणून मांडले जातात … हल्लीच रियासतकार सरदेसाई सुद्धा हिंदुत्ववादी आहेत असे शेजवलकरांच्या हवाल्याने एक गृहस्थ आग्रहाने सांगत होते… जे दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासांचा विरोध करतात त्यांना शेजवलकर इतिहासकार आहेत हे मान्य आहे हेही भाग्यच समजले पाहिजे!

कोकण आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते अगदी घट्ट – या समुद्रकिनाऱ्यावर त्यांचे खास प्रेम… माझ्या दर्या फिरस्ती या प्रकल्पासाठी माहिती घेताना शेजवलकरांचे संकल्पित शिवचरित्राचा आराखडा वाचत आहे … आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शेजवलकरांच्या नजरेतून शिवाजी महाराज, त्यांच्या स्वराज्याचे अधिष्ठान आणि त्यांना समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव गुरुस्थानी होते का हे पाहण्याचा प्रयत्न या ब्लॉगच्या माध्यमातून करतो आहे.

दादोजी व समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु होते की नाही हा प्रश्नच खरंतर अडचणीचा आहे … याचं कारण गुरु या शब्दाची सापेक्षता … कोणत्या बाबतीत कोण कोणाचे गुरु? गुरु कोणाला मानावे आणि शिक्षक कोणाला मानायचे यावर आज फेसबुकवर तुम्हाला एकवाक्यता दिसणार नाही … कोणी म्हणते नोकरी म्हणून अभ्यासक्रम शिकवणारा शिक्षक आणि आयुष्याला निष्काम वृत्तीने दिशा देणारा गुरु … गुरु ही व्यापक संकल्पना आहे आणि गुंतागुंतीची देखील गोष्ट आहे त्यामुळे ज्या प्रश्नाचे उत्तर ठामपणे सापडले आहे म्हणून लोक वितंडवाद घालतात, द्वेष पसरवतात तो प्रश्नच भक्कम नाही … म्हणजे तू देव मानतोस का हा प्रश्नही तसाच आहे … प्रश्नकर्त्याच्या लेखी देव या शब्दाची कोणती व्याख्या अभिप्रेत आहे आणि त्या श्रद्धेशी निगडित कोणते आचार अपेक्षित आहेत यावर त्याचे उत्तर अवलंबून आहे.

इतिहासाला दोन बाजू असतात … एक निव्वळ घटना आणि त्यांची समकालीन, विश्वासार्ह साधनांनी केलेली शहानिशा व दुसरे म्हणजे त्या घटनांच्या साखळीचे विश्लेषण करून काढलेले निष्कर्ष. विश्लेषणाला राजकीय दृष्टी असू शकते … भाष्यकार म्हणून लिहीत असताना आपापल्या विचारसरणीची झापडे सगळेच लावत असतात … बरेचदा खूप सजगपणेही हे घडत असते … तर शाहीर, कादंबरीकार नायकाचे स्तुतीपर चित्रण करत असतात … कालांतराने त्यातला अतिशयोक्तीचा भाग समजून घेऊन त्याचंही सांस्कृतिक विश्लेषण केलं जातं.

शेजवलकरांच्या विश्लेषणावर येण्याआधी मला काय वाटते ते मांडतो … शिवाजी महाराज लोकोत्तर युगपुरुष… काळाच्या पुढचा विचार करणारे … रयतेच्या बाबतीत कनवाळू, धार्मिक प्रेरणा असलेले पण तरीही परधर्म-सहिष्णू … शून्यातून स्वराज्य उभे करणारे … मला ते स्वयंप्रकाशी वाटतात … शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊयांचे बाळकडू त्यांना नक्कीच मिळाले …भोवतालच्या विविध लोकांकडून प्रेरणा घेतली असेलच … पण त्यांनी उभं केलेलं स्वराज्य कोणा एका गुरूच्या मार्गदर्शनामुळे घडलं आहे असं नाही म्हणता येणार … चंद्रगुप्त मौर्याच्या मागे ज्या पद्धतीने चाणक्याची दृष्टी होती असे म्हंटले जाते त्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्या मागे कोणत्याही जातीचा कोणीही एक गुरु नाही … दादोजी नाही … समर्थ रामदास नाही आणि संत तुकारामही नाहीत … शिवाजी महाराजांचा दृढनिश्चय हा त्यांनी जे पाहिलं आणि वाचलं त्याचा परिपाक आहे … कोणत्याही एका माणसाला शिवाजी महाराजांच्या गुरुपदी आजच्या राजकारणाच्या सोयीने बसवणे गैर आहे … याची दुसरी बाजू अशी की शिवचरित्र मांडत असताना समर्थ रामदास आणि दादोजी त्याज्य आणि द्वेषाचे धनी असल्याप्रमाणे केला जाणारा विखारी प्रचार … आणि मग संदर्भ सोडून दिले जाणारे दाखले … जितेंद्र आव्हाड याला वैचारिक संघर्ष मानतात पण पुतळे उखडणे, दमबाजी करणे, ब्राम्हण-मराठा तेढ पसरवणे… हेतूवर-निष्ठेवर आरोप करणे ही काही वैचारिक संघर्षाची लक्षणे नाहीत … ऐतिहासिक लेखनातील त्रुटी समोर आणताना शैक्षणिक संशोधन करणे, प्रबोधन करणे यात माणसाची जात पाहून, त्याच्या हेतूवर संशय घेऊन तेढ पसरवणे येत नाही … मला शिवाजी महाराजांवर चित्रपट यावा असं फार वाटतं … हे मी फेसबुकवर व्यक्त केलं तेव्हा त्यात दादोजी दाखवणार का असं मला अनेकांनी विचारलं … याचं उत्तर मी शोधतो आहे … माझं आडनाव भावे असल्यामुळे शिवभक्तीवर प्रश्नचिन्ह लावले जाणे ही आजची स्थिती आहे … त्यातून कऱ्हाडे असलेले शेजवलकर वाचले हे त्यांचं मरणोत्तर सुदैव मानलं पाहिजे … पाहूया शेजवलकर वाचत असताना काय काय सापडले ते ….

shivaji-pune

दादोजी कोंडदेव – पृष्ठ ३७१ (संकल्पित शिवचरित्र प्रस्तावना, आराखडा व साधने)

१. रायरी बखरीप्रमाणे दादोजी मलठण गावचा हिशेबनीस.. शहाजीने आपल्या नावाने जहागिरीचा कारभार पाहण्यास सांगितले व शिवाजीला देखरेखेखाली पाठवले – पादशहानामा i.b. १५०
२. शाहजीकडील हिंगणी बुर्डी देऊळगावचा तो कुलकर्णी-कानूंगो होता – तारिख इ शिवाजी
३. पुणे, इंदापूर, सुपे भागात शांतता आणण्याचे काम केले, त्यापूर्वी पुणे जहागीर ओसाड पडली होती … जंगली श्वापदांचा नायनाट करून शेतीला उत्तेजन देण्याचे काम दादाजीने केले. मलिक अंबरची महसूल पद्धती काही फेरफार करून लागू केली – ९१ कलमी बखर भाग २१
४. युद्ध आणि राजनीतिशास्त्राचे शिक्षण शिवाजी महाराजांना देण्याची व्यवस्था केली – Ibid section २१
५. बारा मावळे अधिपत्याखाली आणण्याचे काम केले – सभासदाची बखर पृष्ठ क्रमांक ४
६. शिवदिग्विजय (११७-१८) आणि चिटणीस बखरीत (६४ दादोजीला स्वराज्याची संकल्पना मान्य नव्हती – शाहजी प्रमाणे शिवाजीने आदिलशहाच्या अखत्यारीत कर्तृत्व दाखवावे असे त्याला अभिप्रेत होते असे मांडले गेले आहे हेही शेजवलकर नमूद करतात

दादोजी कोंडदेवाचा मृत्यू कसा झाला याबाबत असलेला संभ्रम शेजवलकर स्पष्ट नमूद करतात
– शिवाजीने विजापूरच्या प्रदेशावर हल्ला केल्यावर दादाजीने विषप्राशन केले असे साने,सरकार, राजवाडे, फॉरेस्ट म्हणतात तर
शरीरास व्यथा होऊन दादाजी कोंडदेऊचा मृत्यू झाला असे शिवचरित्र साधने खंड १, लेख ८१, पृष्ठ ९२ मध्ये दिसते

थोडक्यात शेजवलकरांच्या मते दादोजी कोंडदेव हा स्वराज्याची दृष्टी देणारा गुरु नव्हे आणि द्वेष करावा असा त्याज्य बामणीही नव्हे. अतिशय वस्तुनिष्ठपणे त्यांनी विविध उल्लेख व्यक्तिपरिचय करताना मांडलेले दिसतात … बाल-शिवाजी बरोबरचा पुतळा हटवला कारण जेम्स लेनच्या पुस्तकात दादाजीला शिवाजीचे पितृत्व देणारी कुजबूज पुण्यात असल्याचा उल्लेख होता अशी मांडणी केली जाते … याला कोणतेही संदर्भ लेन हा हलकटपणा करत असताना देत नाही … मी लहान असताना पुरंदरे लिखित महाराज हे सचित्र-शिवचरित्र वाचले होते … त्यात दीनानाथ दलालांची खूप सुंदर चित्रे आहेत … तिथं नांगराचा सोन्याचा फाळ फिरवणारा शिवाजी दिसतो … ते चित्र पहिले तेव्हा वडिलांच्या चाकरीत असलेला एक आदरणीय वयोवृद्ध अशीच दादाजीची प्रतिमा निर्माण झाली … दादाजीला गुरु मानले नाही तरी ट्रेनर, इस्टेट मॅनेजर या स्वरूपात पाहणे अनैतिहासिक ठरत नाही … आणि शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक ब्राम्हणांचे (इतर सर्व जातींप्रमाणेच) योगदान आहे त्यामुळे दादाजी पेरण्याची काही गरज नाही. आता शेजवलकर दादाजींचा निष्ठेबद्दल काय लिहितात ते पाहू – दादोजी कोंडदेव एरवी मुसलमान राज्यातील फारसी जाणणारा नोकर (नोकर हा ब्रिगेडचा आवडता शब्द आहे) तरीही त्याची निष्ठा यजमानाच्या मुलाचे कल्याण स्वतःचा बाप पाहणार नाही अशा तर्हेने पाहण्याची व त्यासाठी जीव तोडण्याची … आता हे वाचल्यावर काहींना शेजवलकर संघी, बामणी (कऱ्हाडे होतेच जन्माने) आणि हिंदुत्ववादी इतिहासकार असल्याचा साक्षात्कार होईलही पण त्यांच्या कामाची उंची आणि ब्राम्हण्यावर त्यांनी केलेल्या समीक्षेमुळे असले आरोप शेजवलकरांवर लावणे कठीण आहे …

palkar

आता समर्थ रामदासांच्या बाबतीत शेजवलकर काय लिहितात ते पाहू –

तावत्कालपर्यन्त सनातनी असलेल्या मराठ्यांचे तत्कालीन प्राप्त कर्तव्य कोणते याचा विचार समर्थानी मांडला. स्वधर्मावर हल्ला करणाऱ्या म्लेंछांचे पारिपत्य करणे, सर्व जातीच्या मराठ्यांना एकत्र आणणे, जर तसे न येता म्लेंछांचेच साहाय्यकर्ते राहतील तर त्यांचे शासन करणे व अशा रीतीने आपले कर्तव्य पार पाडणे याचेच नाव महाराष्ट्र धर्म वृद्धितें पाववून रक्षिणे असा अर्थ रामदासांनी सांगितला व शिवाजीने आचरणात आणला. ज्यांना रामदासाचे सांगणे आधीचे वाटत नसून छत्रपतींचे करणे हेच पूर्वीचे वाटत असेल त्यांनी शिवाजीच्या आचरणावरून बोध घेऊन आपले तत्त्वज्ञान रामदासांनी बनवले असेही म्हंटल्यास हरकत नाही पण शिवाजीसारख्या युगपुरुषाचे कार्याला आपल्या उपदेशाने बळकटी देण्याचे कार्य रामदासांनी केले एवढे तरी त्यांना म्हणावेच लागेल (पान ३५-३६)

पुढे शेजवलकर स्पष्टपणे लिहितात की दासबोधाची निर्मिती १६५९ मध्ये सुरु झाली आणि दहा वर्षे एकांतात काढून हा ग्रंथ निर्माण झाला त्यामुळे शिवाजी महाराजांच्या कामगिरीवर तो बेतलेला असणे शक्य वाटत नाही …दुसऱ्या बाजूला हनुमानदास आणि रामदासांच्या इतर शिष्यांनी प्रत्येक पावली शिवाजी महाराज कसे रामदासांचे मार्गदर्शन घेत आणि त्यांनी विरक्त वाटून स्वराज्य सोडण्याची इच्छा केली असे अतिशयोक्त वर्णन केले आहे त्याचाही समाचार घेतला आहे. चाफळला त्यांची भेट झाली असावी आणि समकालीन असल्याने दोन परस्परांचा आदर करणारी … परस्पर पूरक काम करणारी दोन स्वतंत्र स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्वे आहेत अशी मांडणी शेजवलकर करतात. संत तुकारामांना शिवाजी महाराजांच्या गुरुस्थानी बसवणाऱ्यांच्या विश्लेषणातील कल्पनेच्या भराऱ्यांचाही शेजवलकर समाचार तिथेच घेतात.

समर्थ रामदासांनीं प्रपंच महत्त्वाचा, प्रवृत्ती महत्त्वाची अशीच मांडणी केली आहे. जरी त्यांनी अद्वैताचाच उपदेश केला असला तरीही त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन माध्व संप्रदायाप्रमाणे द्वैत होता असे शेजवलकर प्रतिपादन करतात. शिवाजीच्या आचरणातही हेच द्वैत दिसते असे ते सांगतात … एकीकडे मराठा होऊन ब्राम्हणावर तलवार केली त्याचा नतीजा तोच पावला असे शिवाजी महाराज एका वाईट मराठ्याबद्दल त्याच्या आत्महत्येचा उल्लेख करताना सांगतात ( राज खंड ८ लेख २४) तर दुसरीकडे ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो (राज खंड ८ लेख ३१) असेही ते लिहितात. याकूतबाबांची भेट घेणारे त्यांना मानणारे पण ३०० वर्षे जंजिरा हबशाकडे राहील असे याकूतबाबांनी सांगूनही हल्ला करत राहणारे शिवाजी राजे (शिवदिग्विजय ९१-२) व चिंचवडकर देवांना आदर देतानाही राजकारणात लुडबूड नको असे स्पष्टपणे बजावणारे शिवाजी महाराज (शिवचरित्र साधने ३७३) हेच द्वैत दाखवतात.

मग शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे शेजवलकरांच्या मते अधिष्ठान काय?

शेजवलकर शिवाजी महाराजांना पाचशे वर्षांच्या हिंदू-मुसलमान लढ्याचा अन्वयार्थ समजलेला करता पुरुष मानतात. हा निबंध टोकाच्या कट्टर हिंदुत्ववादी आणि आजच्या काळात शिवाजी महाराजांना सेक्युलर करू पाहणाऱ्या डाव्या अशा दोघांसाठी झणझणीत अंजन घालणारा आहे.

शेजवलकर लिहितात – शिवाजीने निश्चित केलेली गोष्ट म्हणजे या देशात हिंदूचेंच स्वतःचे राज्य असले पाहिजे. मुसलमान राजवट कितीही चांगली कल्पिली तरीही तींत हिंदू मुस्लिम संघर्षाचा प्रश्न सुटणार नाही. राजकीय अंतिम निर्णय घेणारी सत्ता हिंदूच्याच हातात असली पाहिजे त्याशिवाय या कठीण प्रश्नाचा निकाल लागणार नाही. मात्र जवाहरलाल ज्या अर्थी आज नाक मुरडतात त्या अर्थी हे राज्य धार्मिक नव्हते. मुसलमानांच्या वैयक्तिक उत्कर्षाला वाव होता. शिवाजी दर्ग्यांना भजे व देणग्या देत असे. त्याचा मुख्य दर्यासारंग व अनेक सैनिक मुसलमान होते. पण देऊळ पडून मशीद केली असेल ती पाडून पुन्हा देव स्थापण्यास तो कचरत नव्हता. १६६८ मध्ये त्याने सप्तकोटीश्वर मंदिर पुन्हा उभे केले जे पूर्वी पोर्तुगीजांनी फोडले होते.

पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्लिश, डच यांच्याकडून नकाशे करणे, किल्ले बांधणे, समुद्री व्यापारात भाग घेणे अशा अनेक गोष्टी आत्मसात करायला तो तयार होता. पोर्तुगीज कारिगराच्या मदतीने (कसा दे पालबोरा ) च्या मदतीने त्याने दारूखाना ओतला होता. शिवाजी मराठीचा संरक्षक, प्रसारक होता म्हणून त्याने राजव्यवहारकोश असे ग्रंथ लिहून घेतले. त्याला माणसांची उत्तम पारख होती. तो फारसा फसवून घेत नसे.

मराठा म्हणजे ब्राम्हण, मावळे, हेटकरी, भंडारी, कुणबी, मराठा, भंडारी, मुसलमान, रामोशी, ख्रिस्ती, मुसलमान हे सगळेच अभिप्रेत होते (जवळजवळ असंच वाक्य पुरंदरे लिहितात पण तरी त्यांच्या माथी बामणी काव्याचा शिक्का आहेच) त्याने ट्युडर पद्धतीचे मराठी सार्वभौम स्वराज्य उभे केले. शिवाजी बहुजनांचा राजा होता. हिंदूधर्मसंरक्षक असला तरीही साम्राज्यवादी नव्हता. त्याचा हेतू हिंदूचे स्वतंत्र राष्ट्र मुसलमान शासकांच्या नाकावर टिचून उभे करण्याचा होता हे ज्यांना कळत नाही ते साम्यवादी शिवाजीच्या संस्कृत व हिंदी कवींच्या आश्रयदात्याचे हिंदुत्वप्रसारक कार्य समजू शकणार नाहीत हे उघड आहे. त्याचे अंमलदार आणि अष्टप्रधान पगारी नोकर होते आणि तो वंशपरंपरेचा विरोधक होता. विनयाच्या संयमाच्या भाषेत हिंदू संघटन करत असताना … मराठीयांचे गोमटे करणे, महाराष्ट्र धर्म वाढवण्याची उमेद त्याने आणली. त्याची दृष्टी विशाल होती. असं शेजवलकरांचं विश्लेषण आहे

शिवाजी महाराज छत्रपती होते आणि हे छत्र आणि राज्य त्यांनी स्वतःच्या मनगटातील सामर्थ्यातून उभे केले व स्वतःच्या प्रज्ञेने साकारले … बाकी ते क्षत्रिय कुलावतंस, गोब्राम्हणप्रतिपालक, कुळवाडीभूषण इत्यादी होते की नाही हे आजच्या राजकारणाच्या सोयीने जातीय अस्मितांचा वापर करून वापरले जाते आहे. आपल्या धर्माच्या बाबतीत सार्थ अभिमान बाळगून दुसऱ्याच्या धर्माला सहिष्णूपणे पाहणारे, रयतेचे राजे शिवाजी महाराज जागतिक इतिहासाचा वारसा आहेत … खरंतर मराठी लोकांनी एकत्र यावे म्हणून हे प्रेरणास्थान आहे … पण चाललं आहे उलट… हा लेख लिहिण्याचं प्रयोजन इतकंच की इतिहासाकडे वस्तुनिष्ठपणे पाहण्याची दृष्टी मिळाली तरच इतिहास आपला गुरु होतो. मराठीयांचे गोमटे करू पाहणाऱ्या शिवाजी महाराजांना जातीपातीत दुभंगलेला महाराष्ट्र आणि मराठी समाज नक्कीच अभिप्रेत नव्हता हे आपण जितक्या लवकर समजू तितकं उत्तम.

 

सिसोदिया राजवंश

सिसोदिया राजवंश  

सिसोदिया वंश (गहलौत वंश) के शासक और उनका शासनकाल
शासकशासनकाल
रावल बप्पा(काल भोज)734 - 753 ई.
रावल खुमान753 - 773 ई.
मत्तट773 – 793 ई.
भर्तभट्त793 – 813 ई.
रावल सिंह813 – 828 ई.
खुमाण सिंह828 – 853 ई.
महायक853 – 878 ई.
खुमाण तृतीय878 – 903 ई.
भर्तभट्ट द्वितीय903 – 951 ई.
अल्लट951 – 971 ई.
नरवाहन971 – 973 ई.
शालिवाहन973 – 977 ई.
शक्ति कुमार977 – 993 ई.
अम्बा प्रसाद993 – 1007 ई.
शुची वरमा1007- 1021 ई.
नर वर्मा1021 – 1035 ई.
कीर्ति वर्मा1035 – 1051 ई.
योगराज1051 – 1068 ई.
वैरठ1068 – 1088 ई.
हंस पाल1088 – 1103 ई.
वैरी सिंह1103 – 1107 ई.
विजय सिंह1107 – 1127 ई.
अरि सिंह1127 – 1138 ई.
चौड सिंह1138 – 1148 ई.
विक्रम सिंह1148 – 1158 ई.
रण सिंह (कर्ण सिंह)1158 – 1168 ई.
क्षेम सिंह1168 – 1172 ई.
सामंत सिंह1172 – 1179 ई.
रतन सिंह1301-1303 ई.
राजा अजय सिंह1303 - 1326 ई.
महाराणा हमीर सिंह1326 - 1364 ई.
महाराणा क्षेत्र सिंह1364 - 1382 ई.
महाराणा लाखासिंह1382 - 1421 ई.
महाराणा मोकल1421 - 1433 ई.
महाराणा कुम्भा1433 - 1469 ई.
महाराणा उदा सिंह1468 - 1473 ई.
महाराणा रायमल1473 - 1509 ई.
महाराणा सांगा (संग्राम सिंह)1509 - 1527 ई.
महाराणा रतन सिंह1528 - 1531 ई.
महाराणा विक्रमादित्य1531 - 1534 ई.
महाराणा उदय सिंह1537 - 1572 ई.
महाराणा प्रताप1572 -1597 ई.
महाराणा अमर सिंह1597 - 1620 ई.
महाराणा कर्ण सिंह1620 - 1628 ई.
महाराणा जगत सिंह1628 - 1652 ई.
महाराणा राजसिंह1652 - 1680 ई.
महाराणा अमर सिंह द्वितीय1698 - 1710 ई.
महाराणा संग्राम सिंह1710 - 1734 ई.
महाराणा जगत सिंह द्वितीय1734 - 1751 ई.
महाराणा प्रताप सिंह द्वितीय1751 - 1754 ई.
महाराणा राजसिंह द्वितीय1754 - 1761 ई.
महाराणा हमीर सिंह द्वितीय1773 - 1778 ई.
महाराणा भीमसिंह1778 - 1828 ई.
महाराणा जवान सिंह1828 - 1838 ई.
महाराणा सरदार सिंह1838 - 1842 ई.
महाराणा स्वरूप सिंह1842 - 1861 ई.
महाराणा शंभू सिंह1861 - 1874 ई.
महाराणा सज्जन सिंह1874 - 1884 ई.
महाराणा फ़तेह सिंह1883 - 1930 ई.
महाराणा भूपाल सिंह1930 - 1955 ई.
महाराणा भगवत सिंह1955 - 1984 ई.
महाराणा महेन्द्र सिंह1984 ई.

सन् 556 ई. में जिस 'गुहिल वंश' की स्थापना हुई, बाद में वही 'गहलौत वंश' बना और इसके बाद यह 'सिसोदिया राजवंश' के नाम से जाना गया। जिसमें कई प्रतापी राजा हुए, जिन्होंने इस वंश की मानमर्यादा, इज़्ज़त और सम्मान को न केवल बढ़ाया बल्कि इतिहास के गौरवशाली अध्याय में अपना नाम जोड़ा। महाराणा महेन्द्र तक यह वंश कई उतार-चढाव और स्वर्णिम अध्याय रचते हुए आज भी अपने गौरव और श्रेष्ठ परम्परा के लिये पहचाना जाता है। मेवाड़ अपनी समृद्धि, परम्परा, अद्भुत शौर्य एवं अनूठी कलात्मक अनुदानों के कारण संसार के परिदृश्य में देदीप्यमान है। स्वाधीनता एवं भारतीय संस्कृति की अभिरक्षा के लिए इस वंश ने जो अनुपम त्याग और अपूर्व बलिदान दिये जो सदा स्मरण किये जाते रहेंगे। मेवाड़ की वीर प्रसूता धरती में रावल बप्पामहाराणा सांगामहाराणा प्रतापजैसे शूरवीर, यशस्वी, कर्मठ, राष्ट्रभक्त व स्वतंत्रता प्रेमी विभूतियों ने जन्म लेकर न केवल मेवाड़ वरन् संपूर्ण भारत को गौरान्वित किया है। स्वतन्त्रता की अलख जगाने वाले महाराणा प्रताप आज भी जन-जन के हृदय में बसे हुये, सभी स्वाभिमानियों के प्रेरक बने हुए है।[1]

Ad

इतिहास

सन 712 ई. में अरबों ने सिंध पर आधिपत्य जमा कर भारतविजय का मार्ग प्रशस्त किया। इस काल में न तो कोई केन्द्रीय सत्ता थी और न कोई सबल शासक था जो अरबों की इस चुनौती का सामना करता। फ़लतः अरबों ने आक्रमणों की बाढ ला दी और सन 725 ई. में जैसलमेरमारवाड़, मांडलगढ और भडौच आदि इलाकों पर अपना आधिपत्य जमा लिया। ऐसे लगने लगा कि शीघ्र ही मध्य पूर्व की भांति भारत में भी इस्लामकी तूती बोलने लगेगी। ऐसे समय में दो शक्तियों का प्रादुर्भाव हुआ। एक ओर जहां नागभाट ने जैसलमेर, मारवाड, मांडलगढ से अरबों को खदेड़कर जालौर में प्रतिहार राज्य की नींव डाली, वहां दूसरी ओर बप्पा रायडे ने चित्तौड़ के प्रसिद्ध दुर्ग पर अधिकार कर सन 734 ई. में मेवाड़ में गुहिल वंश अथवा गहलौत वंश का वर्चश्व स्थापित किया और इस प्रकार अरबों के भारत विजय के मनसूबों पर पानी फ़ेर दिया।

गुहिल वंश

मेवाड़ का गुहिल वंश संसार के प्राचीनतम राज वंशों में माना जाता है। मेवाड़ राज्य की केन्द्रीय सत्ता का उद्भव स्थल सौराष्ट्ररहा है। जिसकी राजधानी बल्लभीपुर थी और जिसके शासक सूर्यवंशी क्षत्रिय कहलाते थे। यही सत्ता विस्थापन के बाद जब ईडर में स्थापित हुई तो गहलौत मान से प्रचलित हुई। ईडर से मेवाड़ स्थापित होने पर रावल गहलौत हो गई। कालान्तर में इसकी एक शाखा सिसोदे की जागीर की स्थापना करके सिसोदिया हो गई। चूँकि यह केन्द्रीय रावल गहलौत शाखा कनिष्ठ थी। इसलिये इसे राणा की उपाधि मिली। उन दिनों राजपूताना में यह परम्परा थी कि लहुरी शाखा को राणा उपाधि से सम्बोधित किया जाता था। कुछ पीढियों बाद एक युद्ध में रावल शाखा का अन्त हो गया और मेवाड़ की केन्द्रीय सत्ता पर सिसोदिया राणा का आधिपत्य हो गया। केन्द्र और उपकेन्द्र पहचान के लिए केन्द्रीय सत्ता के राणा महाराणा हो गये। गहलौत वंश का इतिहास ही सिसोदिया वंश का इतिहास है।[1]

मान्यताएँ

मान्यता है कि सिसोदिया क्षत्रिय भगवान राम के कनिष्ठ पुत्र लवके वंशज हैं। सूर्यवंश के आदि पुरुष की 65 वीं पीढ़ी में भगवान राम हुए 195 वीं पीढ़ी में वृहदंतक हुये। 125 वीं पीढ़ी में सुमित्र हुये। 155 वीं पीढ़ी अर्थात सुमित्र की 30 वीं पीढ़ी में गुहिल हुए जो गहलोत वंश की संस्थापक पुरुष कहलाये। गुहिल से कुछ पीढ़ी पहले कनकसेन हुए जिन्होंने सौराष्ट्र में सूर्यवंश के राज्य की स्थापना की। गुहिल का समय 540 ई. था। बटवारे में लव को श्री राम द्वारा उत्तरी पश्चिमी क्षेत्र मिला जिसकी राजधानी लवकोट थी। जो वर्तमान में लाहौर है। ऐसा कहा जाता है कि कनकसेन लवकोट से ही द्वारका आये। हालांकि वो विश्वस्त प्रमाण नहीं है। टॉड मानते है कि 145 ई. में कनकसेन द्वारका आये तथा वहां अपने राज्य की परमार शासक को पराजित कर स्थापना की जिसे आज सौराष्ट्र क्षेत्र कहा जाता है। कनकसेन की चौथी पीढ़ी में पराक्रमी शासक सौराष्ट्र के विजय सेन हुए जिन्होंने विजय नगर बसाया। विजय सेन ने विदर्भ की स्थापना की थी। जिसे आज सिहोर कहते हैं। तथा राजधानी बदलकर बल्लभीपुर (वर्तमान भावनगर) बनाया। इस वंश के शासकों की सूची टॉड देते हुए कनकसेन, महामदन सेन, सदन्त सेन, विजय सेन, पद्मादित्य, सेवादित्य, हरादित्य, सूर्यादित्य, सोमादित्य और शिला दित्य बताया। 524 ई. में बल्लभी का अन्तिम शासक शिलादित्य थे। हालांकि कुछ इतिहासकार 766 ई. के बाद शिलादित्य के शासन का पतन मानते हैं। यह पतन पार्थियनों के आक्रमण से हुआ। शिलादित्य की राजधानी पुस्पावती के कोख से जन्मा पुत्र गुहादित्य की सेविका ब्रहामणी कमलावती ने लालन पालन किया। क्योंकि रानी उनके जन्म के साथ ही सती हो गई। गुहादित्य बचपन से ही होनहार था और ईडर के भील मंडालिका की हत्या करके उसके सिहांसन पर बैठ गया तथा उसके नाम से गुहिल, गिहील या गहलौत वंश चल पडा। कर्नल टॉड के अनुसार गुहादित्य की आठ पीढ़ियों ने ईडर पर शासन किया ये निम्न हैं - गुहादित्य, नागादित्य, भागादित्य, दैवादित्य, आसादित्य, कालभोज, गुहादित्य, नागादित्य।[1]

Ad

टीका टिप्पणी और संदर्भ

  1. ↑ 1.0 1.1 1.2 1.3 1.4 सिसोदिया राजवंश एवं मेवाड़(हिंदी) अंतर्राष्ट्रीय क्षत्रिय महासभा। अभिगमन तिथि: 6 जनवरी, 2013।

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट