शिवकालीन इतिहासात सुभा, परगणा आणि तर्फ किंवा तरफ असे गाव आणि लोकसंख्येवर आधारीत प्रशासकीय विभाग होते. आपण या बाबत एक उदाहरण म्हणुन जावळीचा इतिहास पाहिला तर या शब्दांचा आत्ताच्या प्रशासकीय विभागाशी तुलना केल्यास, आपल्याला नेमका अर्थ समजेल.
१) जावळी हे प्रांत किंवा राज्य म्हणू शकतो.
२. सुभा किंवा परगणा म्हणजे जिल्ह्याच्या सम असे म्हणू शकतो. यात एकूण ४ सुभे / जिल्हा होते.
३) तर्फ/तरफ - दिशा, बाजू, पक्ष, तालुका, पेटा.
एकूण १८ तर्फ / तरफ म्हणजे आताचे तालुके असे आपण म्हणू शकतो.
हेच आपण असे पण म्हणू शकतो.
जावळी हा एक प्रांत / राज्य म्हणून ओळखला जायचा. प्रांत म्हणजे सध्याच्या भाषेत राज्य म्हणजे जावळी प्रांत/ राज्य. सुभा म्हणजे जिल्हा*. म्हणजे एकूण सुभे/ जिल्हे ४. आणि तर्फ* म्हणजे तालुका. ते झाले १८. तर्फ/तालूक्यात येणारी एकूण गावं ५६४. झालं कि नाही सोपं.
म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.
यात एकूण अठरा तर्फा, कोणते तर खालील प्रमाणे ;
१) सुभा मंगळगड, तर्फा ५ - चांढवे, शिवथर, बीरवाडी, नाते, महाड. एकूण गावे २०७.
२) सुभा जावळी, तर्फा ७ - जोर, बारामुऱ्हे, कदंब, सोनाटसोळशे, आटेगाव, विन्हेरे, कोंढवी. एकूण गावे १९५.
३) सुभा व्याघ्रगड, तर्फा ५ - तांबी, बामणोली, हेळवाक, वनवली, मेसे(मेढे). एकूण गावे १५१.
४) सुभा महिपतगड, तर्फ १ - तेतले. एकूण गावे १८.
म्हणजे या यादीनुसार लहान मोठी अशी सर्व मिळून तब्बल ५६४ गावं जावळी प्रांताच्या अधिपत्याखाली येत होती.
म्हणजेच वर दिलेल्या गावांची नेमकी ठिकाणं पाहता ताम्हीणी घाट ते कुंभार्ली घाटांदरम्यान जावळी प्रांत/ खोरं येतं याची खात्री पटते.
संदर्भग्रंथः-
१) जेधे शकावली
२) प्रतापगडदुर्गामहात्म्य
३) शि.च.सा.ख.-१०-पृ-५४
४) शाहू दफ्तर
५) स्वराज्याची सनद
६) मोरे बखर (ऐतिहासिक
भारतात महाराष्ट्र व गुजरात या राज्यात जिल्हा प्रशासनाच्या उप-विभागास 'तालुका' (Taluka) असे संबोधले जाते. तालुक्याला 'तहसील' (Tehsil) असेही म्हणतात. तालुका या प्रशासनाचा प्रमुख 'मामलेदार' (हिंदीत-तहसीलदार) असतो. तहसीलदार तालुक्याच्या अंतर्गत असलेल्या सर्व गावे-खेडी व तालुक्याचे ठिकाण यांच्या प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडत असतो.
गुजराती, बंगाली, उत्तरेकडील राज्ये तसेच पंजाबी प्रदेशांत तालुक्याला 'तहसील', आंध्रप्रदेश आणि तेलंगणात 'मंडल' (Circle) तर केरळ-तामिळनाडूमध्ये 'तालुक्क' असे म्हणतात.
तालुका निर्मिती-
'तालुका' हा पदोपदी वापरला जाणारा शब्द. 'जिल्ह्याचा एक भाग' असा त्याचा अर्थ आहे. तालुक्याला दैनंदिन कारभाराच्या सोयीसाठी निर्माण केलेला प्रांतविभाग असेही म्हणतात. पूर्वी एखादा किल्ला अथवा गांव यास केंद्र मानून त्याच्या आसपासची गावे समाविष्ट करून 'तालुका' तयार केला जात असे. अनेकदा एखादी नदी हीच सीमारेषा मानून तालुक्याची सरहद्द तयार केली जात असे.
तालुका हा शब्द 'तअलक' किंवा 'तअल्लुक' या फारशी शब्दांपासून मराठीत तयार झालेला शब्द आहे.
मुगल काळात प्रशासकीय युनिटला 'परगणा' (Pargana) असा शब्दप्रयोग होता. काही गावांचा (मौजे) समावेश या परगणा महसूली विभागात केला जात असे. परगणा व्यवस्थेची सुरुवात दिल्ली सल्तनतीने केली. त्यानंतरच्या काळात ब्रिटिशांनी या विभागांना जिल्ह्यामध्ये समाविष्ट केले. तसेच या जिल्ह्यांचे उपविभाग म्हणून 'तहसील' किंवा 'तालुका' यांची निर्मिती झाली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा