हा ब्लॉग शोधा

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

*🇮🇳आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष🇮🇳*

*१५ ऑगस्ट इ.स.१६५६*
शिवाजीराजांचा गायकवाड घराण्यातील कन्येशी विवाह ठरला ! शिवाजीराजांची ही सहावी सोयरीक. या धर्मपत्नीचे नाव होते सकवारबाई. हा विवाह प्रत्यक्षात १० जानेवारी १६५७ रोजी झाला.
शिवाजीराजांना सकवारबाईंपासुन कमलाबाई नावाची एक मुलगी होती. महाराजांना त्यांच्या थोरल्या पत्नी सईबाईंपासुन एक मुलगी होती तिलाही सकवारबाई किंवा सखूबाई असे म्हणत.

गायकवाड घराण्यातील सकवारबाई या शिवाजीराजे व त्यांच्या इतर सात राण्यांच्या निधनानंतरही हयात होत्या. नोव्हेंबर १६८९ मधे मुघलांनी रायगड जिंकल्यानंतर राजपरिवारातील जी लोक कैद झाली त्यात सकवारबाईही होत्या. त्या पुढे तब्बल ३० वर्षे मुघलांच्या कैदेत होत्या. १७१९ मधे मराठ्यांनी जी दिल्लीवर स्वारी केली त्यादरम्यान सकवारबाईंची सुटका झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१६६०*
दख्खनच्या सुभेदारीवर आलेल्या शाहीस्तेखानने आल्या आल्या चाकणच्या भुईकोट किल्ल्याला वेढा दिला होता. खानाच्या प्रचंड सैन्यबळामुळे किल्ल्याला कोणतीही रसद पुरवता येणे शक्य नव्हते.तरीही अवघ्या 500 सैन्यानिशी किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी किल्ला महिना उलटून गेला तरी लढत ठेवला होता. हतबल झालेल्या खानाने 14 ऑगस्टला ईशान्येकडील बाजूने एक भुयार खणून त्यात दारूगोळा भरून त्याला बत्ती दिली,त्यासरशी प्रचंड स्फोट होऊन बुरुज उडाला, बुरुजावरील मराठे मारले गेले,पडलेल्या भगदाडातून आत शिरू पाहणाऱ्या 20 हजार पेक्षा जास्त मोगली सैन्याला अवघ्या 500 मावळ्यांनी 12 तासापेक्षा जास्त वेळ थोपवून धरले.दुसरा दिवस उजाडला,मुघलांनी निर्वाणीचा हल्ला केला,कडवा प्रतिकार करूनही बरेच मराठे सैनिक मारले गेले.तरीही त्यांनी 268 मुघल सैन्य ठार केले तर 600 च्या वर जखमी केले होते.अखेर 55 दिवसांनी फिरंगोजीनी नुकसान टाळण्यासाठी भावसिंहाच्या मध्यस्तीने किल्ला खानाच्या हवाली केला.खानाने किल्ला ताब्यात घेऊन उझबेगखानाला किल्ल्याची जबाबदारी दिली.चाकणचा संग्रामदुर्ग मुघलांच्या हाती गेला ती तारीख होती 15 ऑगस्ट 1660.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१६६६*
आग्रा कैदेत शिवाजी महाराजांना बादशहाच्या अंतस्थ गोटातून बातमी समजली की त्यांना विठ्ठलदासच्या हवेलीत नेऊन मारण्यात येणार आहे.बातमी समजताच महाराज कैदेतून निसटण्याची योजना तयार करू लागले.श्रावण जन्माष्टमी ची रात्र संपून वद्य नवमी उजाडली.महाराजांनी आपल्या योजनेप्रमाणे बादशहाची परवानगी घेऊन मिठाईचे पेटारे शहरातल्या प्रतिष्ठित लोक आणि दरबारातील वजिराकडे पाठवणे सुरू केले.सुरुवातीला पहारेकऱ्यांनी चौकशी केली पण नंतर ती गोष्ट त्यांच्या अंगवळणी पडली.या दरम्यानच महाराजानी आपल्याजवळील किमती जडजवाहीर,मोती,सोन्याच्या मोहरा,होन या वस्तू मुलचंद सावकारामार्फत राजगडाकडे पाठवून दिले. आग्रा शहरात या घडामोडी घडत होत्या ती तारीख होती श्रावण वद्य नवमी म्हणजे बुधवार 15 ऑगस्ट 1666
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ ऑगस्ट इ.स.१७९७*
तुकोजीराव होळकरांचे निधन
मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी त्यांची आई अहिल्याबाई (कार. १७६७–९५) यांच्यावर पडली. त्यांनी स्वामिनिष्ठा, कर्तव्यतत्परता, धर्मशीलता इत्यादी गुणांच्या साह्याने संस्थानचे रक्षण करून मल्हाररावाचा मानसपुत्र तुकोजीराव यांस सेनापतिपद दिले. त्यांच्या कारकिर्दीत संस्थानची सर्वांगीण प्रगती झाली. 

तुकोजीरावांनी पेशव्यांना १७६९ च्या जाट व रोहिल्यांविरुद्ध, १७७८-७९ च्या इंग्रजांविरुद्ध, १७८६ च्या टिपूविरुद्ध, १७९५ च्या निजामाविरुद्ध, या मोहिमांत नुसती मदतच केली असे नाही, तर काही वेळा सेनानायक हे पदसुद्धा भूषविले. पेशवाईच्या उत्तरार्धात तर त्यांनी बारभाईंच्या कारस्थानात प्रत्यक्ष भाग घेऊन मराठी साम्राज्याची घडी पूर्ववत बसविण्याचे प्रयत्न केले. पुण्याजवळील वानवडी येथे १५ ऑगस्ट १७९७ रोजी ते मरण पावले. 
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१५ आॅगस्ट इ.स.१९४७*
#भारतीय_स्वातंत्र्य_दिन
१५० वर्षे गुलामगिरीच्या पारतंत्र्यात खितपत पडलेला भारत देश असंख्य क्रांतीकारकांच्या बलिदानामुळे आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानामुळे स्वतंत्र झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*माहिती संकलन :- शिवहिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*जय जगदंब जय जिजाऊ*
*जय शिवराय जय शंभूराजे*
*जय गडकोट*
*!! हर हर महादेव !!*
*🚩मराठा🚩*

*सर्वांना कळविण्यात येत आहे की खाली दिलेली लिंक कोणीही काढण्याचा प्रयत्न करु नये शिवदिनविशेष मध्ये परत जी काय चुक असेल ती चुक आमच्या पर्यंत यावी त्यासाठी आपण ही लिंक टाकत आहोत.*
https://www.facebook.com/shivhindvi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट