हा ब्लॉग शोधा

शिवाजी द्वितीय

शिवाजी द्वितीय

दुसरे शिवाजी किंवा शिवाजी राजाराम भोसले (जून ९, १६९६ - मार्च ४, १७२६) मराठ्यांचे छत्रपती थोरले राजाराम आणि त्यांची जेष्ठ पत्नी महाराणी ताराबाई यांचे पुत्र होते. थोरल्या राजाराम महाराजांचा मृत्यूनंतर, दुसर्‍या शिवाजी महाराजांना १७०० मध्ये त्यांची आई ताराबाईंनी राजमाता म्हणून कारभार पाहून मराठा साम्राज्याचे छत्रपती म्हणून स्थापित केले. त्यांचे चुलत भाऊ, छत्रपती थोरले शाहू हे १७०७ मध्ये मुघलांच्या तावडीतून सुटून आले तेव्हा ताराबाईंनी त्यांचा सिंहासनाचा वारसाचा हक्क धुडकावून आव्हान दिले. त्यामुळे मराठा साम्राज्याचे कोल्हापूर व सातारा असे दोन तुकडे झाले. शिवाजी द्वितीय ने १७१० ते १७१४ पर्यंत कोल्हापूरचा राजा म्हणून सेवा केली. त्या वेळी सावत्र आई राजासबाईने बंड केले आणि कोल्हापूर सिंहासनावर स्वतः चा पुत्र दुसर्‍या संभाजीला बसवले.

शिवाजी राजाराम भोसले 
दुसरा शिवाजी
छत्रपती
Flag of the Maratha Empire.svg
मराठा साम्राज्य - कोल्हापूर संस्थान
अधिकारकाळ१७००-१७०७ - मराठा साम्राज्य; १७१०-१७१४ - कोल्हापूर संस्थान
राज्याभिषेक२ सप्टेंबर १७१०
राज्यव्याप्तीकोल्हापूर संस्थान पर्यंत
राजधानीकोल्हापूर
पूर्ण नावछत्रपती शिवाजीराजे भोसले
जन्मइ.स. ९ जून १६९६
जिंजी
मृत्यूइ.स. ४ मार्च १७२६
रायगड किल्ला
पूर्वाधिकारीराजारामराजे भोसले
उत्तराधिकारीदुसरे संभाजीराजे भोसले
वडीलथोरले राजाराम महाराज
आईताराबाई
राजघराणेभोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट