शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी अष्टप्रधानांची नेमणूक केली. या आठ प्रधानांच्या हाती राज्यकारभारातील काही अतिशय महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. त्यांची रचना खालीलप्रमाणे
१. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे. यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन पगार मिळत असे.
२. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.
३. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्या येणार्या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
४. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
५. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
६. पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
७. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
८. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
महाराजांनी अष्टप्रधान पद्धति स्वीकारल्यामुळे स्वराज्याचे काम सुकर झाले. कामांची योग्य ती विभागणी करण्यात आल्यामुळे प्रत्येक मंत्र्यास आपापल्या जबाबदारीची जाणीव झाली. कामात कोणत्याही प्रकारची हलगर्जी होणार नाही असेच वर्तन त्यांच्याकडून अपेक्षित होते, त्यामुळे त्यांस दक्षता घ्यावी लागत असे. हे सर्व मंत्री आपल्या कामांसाठी महाराजांस उत्तरदायी होते.
त्याचप्रमाणे पुढील पिढीतील नियुक्त्या ह्या निष्पक्षपाती व्हाव्यात अशी महाराजांची ठाम धारणा होती. केवळ ह्या मंत्र्यांची मुले किंवा नातेवाईक यांच्यावर योग्यता नसताना पदभार सोपवणे या पक्षपाती वृत्तीला महाराजांचा परखड विरोध होता.
अष्टप्रधानांची नेमणूक -
राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्येला पक्वान्नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमलव ईशान्येला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते.
राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.
छत्रपती संभाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ :-
१. पंतप्रधान (पेशवा / पेशवे) – सुरुवातीस मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे आणि नंतर निळकंठ मोरेश्वर पिंगळे
२. पंत अमात्य (मजुमदार) – रामचंद्र निळकंठ बावडेकर
३. पंत सचिव (सुरनीस / सुरवणीस) – आधी अण्णाजी दत्तो प्रभुणीकर, त्यानंतर रामचंद्र निळकंठ बावडेकर आणि शेवटी शंकराजी नारायण गाडेकर
४. मंत्री (वाकनीस / वाकेनवीस) – दत्ताजी पंत
५. सेनापती (सरनौबत) – सुरुवातीला हंबीरराव मोहिते आणि नंतर मोहोळजी घोरपडे
६. पंत सुमंत (डबीर /डंबीर) – जनार्दन पंत
७. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) - आधी प्रल्हाद निराजी नाशिककर आणि नंतर काझी हैदराबाद
८. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) – आधी रघुनाथ पंडितराव व नंतर मोरेश्वर पंडितराव
अष्टप्रधानांबद्दल हा श्लोक प्रचलित होता -
“प्रधान अमात्य सचिव मंत्री,
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।
धन्यवाद!
: )
स्रोत -
माफ करा पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मंत्रिमंडळात काही सुधारणा गरजेच्या आहेत त्या
- पंत प्रधान - सुरवातीस मोरेश्वर त्र्यंबक पिंगळे व नंतर निळकंठ मोरेश्वर पिंगळे
- पंत सचिव - सुरवातीस अण्णाजी दत्तो प्रभूणीकर नंतर काही काळ रामचंद्र निळकंठ बावडेकर व शेवटी शंकराजी नारायण गांडेकर
- पंत अमात्य - रामचंद्र निळकंठ बावडेकर
- न्यायाधीश - सुरुवातीस प्रल्हाद नीराजी नाशिककर व नंतर काझी हैदर
- पंडितराव - सुरुवातीला रघुनाथ पंडितराव व नंतर मोरेश्वर पंडितराव
- सेनापती - सुरुवातीस हंसाजी उर्फ हंबीरराव मोहिते व नंतर मोहोळजी घोरपडे
टिप्पणीसाठी धन्यवाद!
आपण दिलेली माहिती यथार्थ वाटते, याचा काही स्रोत देता येऊ शकेल का आपल्याला?
ही माहिती Maratha chronicles व भारतीय संस्कृती कोषातून मिळविलेली आहे .
♨️१) पंतप्रधान : मोरोपंत त्रिंबक पिंगळे - शिवरायांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असायचा. पंतप्रधान पदाला वार्षिक १५ हजार होन पगार मिळत असे.
२) पंत सचिव : अण्णाजीपंत दत्तो - शिवरायांच्या पत्रव्यवहारावर सांभाळणे, जमीन महसुलाच्या व्यवहारावर लक्ष ठेवणे, स्वराज्याचे दफ्तर सांभाळणे ही कामे यांच्याकडे होती. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
३) मंत्री : दत्ताजीपंत त्रिंबक - यांच्याकडे महाराजांचे खाजगी कारभार, भोजन व्यवस्था, वैयक्तिक संरक्षण याकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
४) सेनापती : हंबीरराव मोहिते - शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींचे अधिकार होते. कोणत्याही युध्दाची आणखी करण्याचं काम सेनापतींकडे होतं. स्वराज्याला कायम उत्कृष्ट सेनापती मिळत गेले. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत होता.
५) पंत सुमंत : रामचंद्र त्रिंबक - परराष्ट्रासंबंधातील व्यवहार सांभाळणे, परराष्ट्रातून हेरांच्या मदतीने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावं लागत होतं. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.
६) न्यायाधीश : निराजीपंत रावजी - स्वराज्याचे सरन्यायाधीश म्हणून ओळखले जाणारे दिवाणी व फौजदारी गुन्ह्यांबाबत खटले चालवून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत होता.
७) पंडितराव दानाध्यक्ष : रघुनाथराव पंडित - धर्मखात्याचे प्रमुख म्हणून दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, ही कामे त्यांची होती. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.
८) पंत अमात्य : रामचंद्र निळकंठ - मंत्रिमंडळातील महत्त्वाचा मंत्री असल्याने स्वराज्यातील सर्व महालांचा एकूण जमाखर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्यांचे काम होते. या मुजुमदारांचा वार्षिक १२ हजार होन पगार होता…
संदर्भ :-लोकमत✍️
♨️पराक्रमी, प्रजाहितदक्ष, गोब्राह्मणप्रतिपालक, अष्टप्रधानवेष्टित श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज ६ जून १६७४ ला सिंहासनाधिश्वर झाले.
त्यावेळी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली. त्यांनी या पदांना फारसी भाषेऐवजी संस्कृत भाषेतील नवे दिली.
१. पेशवा - मुख्य प्रधान - मोरोपंत त्रिमल पिंगळे.
सालाना पगार - १५००० होन.
यांचे काम असायचे - युद्ध करणे, ताब्यातील प्रदेशाची सुरक्षा पाहणे,सरकारी फर्माने काढणे,इ.
२-अमात्य( मुजुमदार) - नारो नीलकंठ व रामचंद्र नीलकंठ हे दोघे अमात्याचे काम बघत.
सालाना पगार - १२००० होन.
काम - जमाखर्च,दफ्तर लिहिणे .
३-सचिव( सुरनीस) - अण्णाजी दत्तो.
काम - राजपत्राचे वाचन,दुरुस्त्या,राजाज्ञा वर ( सरकारी आदेशावर) 'संमत' चिन्ह लिहिणे.
४-मंत्री( वाकनीस) - दत्ताजी त्रिंबक
काम - सर्व खलबते,वाटाघाटी,तडजोडी सावधानतेने करणे.
राजाची रोजची दिनचर्या -डायरी-लिहून ठेवणे.
शिवरायांच्या इतरांबरोबर बैठकी आयोजित करणे,भोजन,मेजवान्या ची व्यवस्था पाहणे.
वेळ पडल्यास युद्धावर जाणे.
महाराजांच्या आज्ञापत्रावर संमत-approved शिक्का मारणे. इ.
वरील चार मंत्र्यांची जागा महाराजांच्या उजव्या बाजूस होती.
५-सेनापती-( सरनोबत)- हंबीरराव मोहिते.
युद्ध,जिंकलेल्या प्रदेशाचा,लुटीचे संरक्षण,सरकारी खजिन्यात जमा करणे.
६-सुमंत( डबीर) सध्याचे आपले परराष्ट्रमंत्री.--रामचंद्र त्रिंबक सुमंत.
७-न्यायाधीश-निराजी राउजी.
८-पंडितराव( दानाध्यक्ष).- रघुनाथ पंडित.
काम - धार्मिक बाबी,प्रायश्चित,पूजापाठ,दानधर्म,अनुष्ठाने करणे.
मंत्री क्रमांक ५ ते ८ महाराजांच्या डावीकडे आसनस्थ होत.
त्यांना सालाना १०००० होन पगार होता.
अष्टप्रधानांकडे स्वराज्यातील काही प्रांतांची पण जबाबदारी सोपविलेली असे.ते ज्यावेळी राजधानीबाहेर जात तेव्हा त्यांचे मुतालिक त्यांची कामे पाहत.
मुतालीकांची नेमणूक पण विशेष जाचंपडताळ,चौकशी करूनच होत.
प्रत्येक प्रधानास सहाय्यक असत ज्यांना दरकदार म्हटले जाई.ते खालीलप्रमाणे.
१-दिवाण,
२-मुजुमदार-हिशेब तपासनीस.
३.फडणीस -महसुलाचा हिशेब.
४-सबनीस-दफ्तर-सरकारी दस्त,दफ्तर सांभाळणे.
५-कारखानीस-पुरवठा अधिकारी.
६-चिटणीस,
७-जामदार( खजिनदार) व
८-पोतनीस-नाणे तज्ञ.
अष्टप्रधानांकडे १८ कारखाने असत. जसे की खजिना,जवाहीर्खाना,तोफखाना,जामदारखाना,नगारखाना,शिकारखाना,वगैरे.
चिटणीस हुद्धा अष्टप्रधानमंडळात नव्हता.चिटणीस महाराजांचा मुख्य लेखक असून राज्यातील सर्व राजपत्रे, पत्रव्यवहार,सनदा,दान्पत्रे तो लिहित असे.
संदर्भ - १.मराठी रियासत खंड १
२. शककर्ते शिवराय.
धन्यवाद.
♨️शिवाजी प्रशासन (Shivaji Maharaj Administration):-
शिवाजी महाराजांच्या कारभारावर मोठ्या प्रमाणात डेक्कन प्रशासकीय पद्धतींचा प्रभाव होता. प्रशासकीय कामकाजात त्यांना मदत करणारे ‘अष्टप्रधान’ म्हणून ओळखले जाणारे आठ मंत्री त्यांनी नेमले.
१. अर्थ आणि सामान्य प्रशासन सांभाळणारे पेशवे हे सर्वात महत्वाचे मंत्री होते.
२. सेनापती (सर-ए-नौबत) मराठा प्रमुख अग्रगण्य प्रमुखांपैकी एक होते ज्यांना मुळात सन्मान मिळाला होता.
३.मजुमदार हे अकाउंटंट होते.
४. वेकनॅव्हिस एक आहे जो बुद्धिमत्ता, पोस्ट आणि घरगुती कामकाज सांभाळतो.
५. सर्णविस किंवा चिटणीस राजाला पत्रव्यवहार करून मदत करतात.
६.डाबीर समारंभांचा प्रमुख होता आणि परराष्ट्र व्यवहारात राजाला मदत करतो.
७.न्यायाधीश आणि पुंडितराव, न्याय आणि सेवाभावी अनुदानाचे प्रभारी होते.
८.सावकार तो जमीनीच्या चौथ्या भागाच्या म्हणजेच चौथ किंवा चौथाई या जमीनीवर कर आकारतो.
केवळ एक सक्षम सेनापती, एक कुशल कौशल्यवान आणि हुशार मुत्सद्दी म्हणूनच सिद्ध झाले नाही तर त्यांनी देशमुखांच्या शक्तीला आळा घालून मजबूत राज्याचा पायाही घातला.
म्हणूनच मराठ्यांचा उदय आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि संस्थात्मक कारणांमुळे झाला. त्या मर्यादेपर्यंत, शिवाजी एक लोकप्रिय राजा होता जो मुघल अतिक्रमणाच्या विरोधात लोकप्रिय इच्छा दर्शविणारा प्रतिनिधी होता. जरी, मराठा प्राचीन जमाती होती पण १६ व्या शतकात त्यांना स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित करण्यासाठी जागा मिळाली.
स्त्रोत:-
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा