हा ब्लॉग शोधा

रायगडाच्या पायरीवर सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदलकर असा मजकुर का आहे?

रायगडाच्या पायरीवर सेवेच्या ठायी तत्पर हिरोजी इंदलकर असा मजकुर का आहे?

तेव्हा हिरोजींनी मागून पण काय मागितले त्यांनी मागितले की, "रायगडाच्या एका पायरीवर माझे नाव लिहिलेले असावे जेणेकरून आपले चरण त्या पायरीवर पडतील आणि मी धन्य होईन". ही पायरी गडावरील जगदीश्वर मंदिराजवळ आहे.

त्यावर लिहिले आहे, "सेवेशी ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर" याचा अर्थ असा होतो की "हिरोजी इंदुलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल". यातून हिरोजींचे महाराजांवरील निष्ठा आणि निस्सीम प्रेम दिसून येते


हिरोजी इंदुलकर - रायगड - जगदीश्वराच्या पायरीवरील एका दगडावर

स्थापत्य अभियंता "श्री हिरोजी इंदुलकर" (रायगड निर्माता) असा engineer जगात होणे नाही.. आत्ताच्या कोणत्याही सिविल इंजिनिअर ला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. कि जो आपल्या उभारणीचा पुरावा देतो.आताही तो रायगड पाहायला भेटतो .असे फक्त शिवकाळात होऊ

शकते...आणि त्या शिलालेख प्रमाणे आज हि रायगड पाहायला भेटतो.मन मातीत मिसळली की गवतांनाही भाले फुटतात, हे या मातीने आपल्याला शिकवले आहे. या बुलंद, बेलाग आणि बळकट किल्ल्यांवरती अशाच काही घटना घडल्यात. तेथे जायचे ते अश्याच सुवर्णक्षणांच्या आठवणीसाठी. पण सर्वात महत्वाचे म्हणजे त्यातून काहीतरी शिकावे आणि आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करता आला तर पहावा.

रायगडावरील महत्वाच्या वास्तूंविषयी माहिती द्याल का?

आधीही एक उत्तरात म्हटल्याप्रमाणे रायगड हा महाराष्ट्रातील असा एक किल्ला आहे ज्यातील वास्तूंविषयी आज बरेच(खूप बरेच) गैरसमज आहेत. या उत्तरात वास्तूंविषयी माहिती देताना मी ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन.

सुरवात करण्याआधी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की,

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर म्हणजेच १६८९ साली हा किल्ला मुघलांनी जिंकला होता. १६८९ ते १७०७ पर्यंत रायगड मुघलांच्याच ताब्यात होता. सुरसिंग आणि शंभुसिंग नावाचे २ भाऊ रायगडाचे व पाचाडचे किल्लेदार होते. पुढे १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हा किल्ला मुघलांनी जंजिऱ्याच्या सिद्दी ला देऊन टाकला. सिद्दींकडे हा किल्ला तब्बल ४५ वर्ष ताब्यात होता. नानासाहेब पेशव्यांनी पुढे किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर १७८७, १७९६, १८०९ या तीन साली रायगडावर बांधकाम चालू असल्याचे उल्लेख आज आपल्याला मिळतात. मग पुढे १८१८ साली ब्रिटिशांनी किल्ला जिंकून घेतला. त्यांनी १८८५ पर्यंत कोणालाही किल्ल्यावर येऊ दिले नव्हते. १८८५ साली जेम्स डग्लस आणि पुढे रिचर्ड टेम्पल नावाचे ब्रिटिश अधिकारी सर्वप्रथम किल्ल्यात गेले. मग वेगवेगळे भारतीय संशोधक जायला लागले.

हे सगळं सांगण्याचा उद्देश हा की मराठ्यानंतर तब्बल ६० वर्ष आणि पुढे ८० वर्ष हा किल्ला स्वराज्यात नव्हता. त्यामुळे यावरची आज दिसत असलेली सगळी बांधकामं शिवाजी महाराजांच्याच काळातील होती हे आपण कधीही म्हणू शकत नाही.


  • राणीवासा (सहा महाल)

महाराजांच्या सदरेजवळ आज ही वास्तू आपल्याला राणीवासा म्हणजे महाराजांच्या ६ पत्नींची घर म्हणून दाखवली जाते. मुळात ही जागा कधीही राणीवासा नव्हती. हा एक अक्खा हॉल होता. या मधल्या पार्टिशनच्या ज्या ५ भिंती आहेत त्या नंतरच्या काळात बांधल्या गेल्या आहेत ज्यावेळी रायगड स्वराज्यात नव्हता. त्या ५ भिंती बांधून ६ खोल्या केल्या आहेत. फोटो मध्ये प्रत्येक खोली च्या बाहेर एक छोटीशी खोली दिसत असेल. ती शौचालये आहेत. तशा प्रकारच्या शौचालयांची व्यवस्था(आज आपण त्यांना इंडियन टॉयलेट म्हणतो) मराठ्यांच्या काळात नव्हती. ती ब्रिटिशांनी भारतात आणली.

त्यामुळे हा राणीवासा कधीही राणीवासा नव्हता. नंतर कदाचित ब्रिटिशांनी ऑफिसेस किंवा(तुरुंग?) बनवण्यासाठी या हॉलच्या ६ खोल्या केल्या असे आपण म्हणू शकतो.


  • बाजारपेठ

या आजच्या बाजारपेठेत उजवीकडे २१ खोल्या आहेत आणि डावीकडे २२ खोल्या आहेत.

मुळात ही जागा कधीही बाजारपेठ नव्हती. ही बाजारपेठ होती असा कुठेही म्हणजे कुठेही समकालीन कागदात उल्लेख नाही. समकालीन कागदच काय, महाराजांनी रायगडावर शिलालेख लिहून घेतला ज्यात त्यांनी गडावर काय काय बांधकामं केली हे लिहिलं आहे त्यात बाजारपेठेचा कुठेही उल्लेख नाही. हा शिलालेख सध्या जगदीश्वराच्या मंदिरात आहे.

दुसरी गोष्ट ही की या बाजारपेठेच्या बांधकामातील इमारतीचे जे मूळ जोते आहे तेच फक्त शिवकालीन आहे. जोत्यावरील सगळ्या बांधलेल्या भिंती, खोल्या या शिवकालीन नाहीत. उत्तरकालीन आहेत.

तिसरी गोष्ट, कोणत्याही गडावर सामान्य जनतेला कधीही विनाकारणप्रवेश नव्हता त्यामुळे गडावर एवढी मोठी बाजारपेठ असण्याचं कारणही नव्हतं.


  • लोहस्तंभ

या लोहस्तंभविषयी आज ३ गोष्टी प्रचलित आहेत.

  1. हा स्तंभ संभाजी महाराजांचा मल्लखांब होता.
  2. हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.
  3. हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

या तीनही गोष्टी अतार्किक(illogical) आहेत.

  1. हा स्तंभ संभाजी महाराजांचा मल्लखांब होता.

= मुळात मल्लखांब कधीही लोखंडी नसतो. त्यामुळे हा तर्क इथेच पडतो. आणि तसाही हा मल्लखांब होता याचा कोणत्याही समकालीन कागदात उल्लेख येत नाही.

2. हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.

= शिवाजी महाराजांच्या काळी वेळ मोजण्यासाठी घटिकपात्रे होती त्यामुळे असे स्तंभ उभारण्याची गरजच नव्हती. आणि जरी हा स्तंभ सूर्यघटी म्हणून बांधला असता तर तो रायगडावर होळीच्या मैदानातजिथे दिवसातून भरपूर वेळ ऊन असतं तिथे न बांधून इथे जिथे हिवाळ्यात अगदी १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडत नाही तिथे का बांधला?

3. हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

= मुळात हत्ती हा प्राणी डोंगरी गडावर आणला जायचाच नाही. कारण गड चढणीला कठीण असायचा आणि हत्तींना गडावरचे वातावरण सहजा झेपत नाही. राज्यभिषेकाच्या वेळी सुद्धा जो हत्ती गडावर आणला होता तो राज्याभिषेकानंतर लगेच १४-१५ दिवसांनी मेला. त्यामुळे 'हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा' या तर्काचेही इथे खंडन होते.

तर मग हा स्तंभ कशासाठी वापरला जायचा?

याचे काही उल्लेख सापडत नाहीत परंतु आर्किओलॉजिस्ट्स च्या मते हा स्तंभ कैद्यांना बांधून त्यांना फटके मारण्याच्या कामात वापरला गेला असावा. आपण जर नीट स्तंभाकडे बघितलेत तर वरती एक कडं दिसतं त्या कडातून दोरी सोडली जायची आणि कैद्यांना त्या दोरीने बांधून फटके दिले जायचे.

एव्हढच काय तो या लोहस्तंभाचा उपयोग केला जाऊ शकत असावा.


  • जगदीश्वर मंदिर.

रायगडावर शिवसमधीजवळ जे मंदिर आहे त्या मंदिराला आज जगदीश्वर मंदिर म्हणतो. मुळात या मंदिराचे नाव जगदीश्वर मंदिर नसून वाडेश्वर मंदिर आहे.

मग जगदीश्वर हे नाव कसं पडलं? वर उल्लेख केल्याप्रमाणे मंदिरात जो शिलालेख आहे त्याची सुरवात अशी आहे की 'प्रासादो जगदीश्वरस्य..' हे वाचून लोकांनी हे मंदिर जगदीश्वराचे असं ठरवून टाकलं.

मुळात, हा शिलालेख जो आज मंदिरात आहे तो इकडे नव्हता. पुढे गड जेव्हा स्वराज्यात नव्हता तेव्हा कोणी इकडे आणून लावला असेल.

शिलालेख देवनागरीतच आहे. सुरवात 'प्रासादो जगदीश्वरस्य..' अशी आहे. इकडे जगदीश्वरस्य हे छत्रपती शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं आहे. प्रासाद म्हणजे महाल/घर. जगदीश हे बरेचदा राजाला उद्देशून म्हटले जाते. त्यामुळे जगदीश्वर हे मंदिराचे नाव नाही तर शिवाजी महाराजांना उद्देशून म्हटलं आहे. अनेक पत्रात मंदिराचे वाडेश्वर असेच नाव दिसून येते.

हा शिलालेख आणि त्याचे भाषांतर देत आहे.

२६ जुलै १७८८ साली पेशव्यांकडून या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. त्या पत्रातही मंदिराचे नाव जगदीश्वर नसून श्रीवाडेश्वर असेच आहे.


  • पाचाड

आज आपण पाचाड मध्ये जाऊन फक्त आऊसाहेब जिजाबाईंनी समाधी पाहून येतो. पाचाडचा किल्ला कोणीच पाहत नाही. परंतु सत्य हे आहे की तो किल्ला महाराजांनी फक्त जिजाबाईंसाठी बांधला नव्हता. महाराजही राहत होते तिकडे. महाराज त्यांच्या आयुष्यात रायगडापेक्षा जास्त काळ या पाचाडचा किल्ल्यात राहिलेत.


तश्या बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु हे उत्तर खूपच मोठे झाल्यामुळे सध्यातरी इथेच थांबतो.

धन्यवाद ।

♨️छान माहिती दिलीत दादाराव.. मला तो शिलालेख बद्दल अनुवाद घेतला तो कुठल्या पुस्तकातुन घेतला कळवाल का..?

तुम्ही इतिहासाचे गाढे अभ्यासक. रायगडावरील स्तंभा बाबत दिलेली माहिती सोडून इतर माहिती योग्य आहे असे आपण मानू या . परंतु स्तंभा बाबत दिलेली माहिती थोडी न पटलेली वाटते. तुम्ही म्हणालात कि, कैद्यांना शिक्षा देण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा.....

साहेब, एक तर तो स्तंभ अंदाजे १५ -२० फूट उंच असावा. शेवटच्या टोकाला एक लोखंडी कडी दिसते. त्या मध्ये दोरी अडकवून , दोरीने बांधून कैद्यांना शिक्षा दिली जात होती असे वाटत नाही .कारण एक तर आता पर्यंत वाचलेल्या इतिहासात कडेलोट करणे , हत्तीच्या पायी देणे , तोफेच्या तोंडी देणे, फासावर देणे आणि चाबकाचे फटके देणे इत्यादी शिक्षा वाचनात आलेल्या. परंतु १५-२० फुटावर चढून, एखादी दोरी त्या स्तंभाच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कडी मध्ये गुंतवून कैद्यांना कोणत्या प्रकारची शिक्षा दिली जात असेल बरे ?

एवढे उंच चढून , दोरी अडकवून दोरीचे एक टोक कैद्याला बांधलेले आणि दुसरे टोक त्या कडी मधून खाली ओढत आणायचे ? अतार्किक उत्तर वाटते. फासावर द्यायचे असेल तर, दुसरी काही व्यवस्था केलेली असेल .म्हटले तरी ह्या स्तंभाला कोणत्याही अंगाने फाशी द्यायच्या अनुषंगाने कसलाही काहीही तर्क लागत नाही . कृपया ह्या कडे लक्ष देण्याचे करावे.

धन्यवाद , साहेब.


♨️अगदी पटलं. रायगडा बद्दल खऱ्या गोष्टींची आज माहिती मिळाली. मनात हा प्रश्न बरेच दिवस होता की रायगड ही राजधानी त्यात महाराजांचे कुटुंब नेहमी वास्तव्यास गडावरच आणि गड आहे ही इतक्या उंचीवर मग तिथे एवढी मोठी बाजारपेठ कशी काय असू शकते.

खुप छान माहिती दिलीत. धन्यवाद

♨️रायगडावर कुशावर्त तलावाजवळ एक वाडेश्वर मंदिर आहे. मग गडावर एकाच देवाची दोन मंदिरे का असावीत ??

♨️बऱ्याच गडांवर एकाच देवाची एकापेक्षा अधिक मंदिरे असतात.

♨️पाचाड मध्ये किल्ला आहे हेच आपल्या मुळे माहिती झाले. …धधन्यवाद. …

♨️धन्यवाद सर !

आऊसाहेब जिजाबाईंच्या समाधी पाठचा सगळा भाग किल्ल्याचाच होता..

♨️कु.ओंकार,खूप छान व अभ्यासपूर्ण माहिती दिलीत.राणीवसाला सातमहाल देखील म्हटले जाते;याचे आश्चर्य वाटते,कारण यात प्रत्यक्षात सहाच खोल्या दिसतात.मग सातमहाल हा उल्लेख आला तरी कोठून ??? महाराज रायगडावर स्थायिक झाले,तेव्हा एक राणी - सईबाई हयात नव्ह्त्या म्हणजेच सात राण्या हयात होत्या.

मला एक प्रश्न आहे की राणीवसा म्हणजे मूळचे मोठे सभागार होते,तर त्याचा शिवकाळात नक्की कशासाठी म्हणून वापर करत असत ?? त्याला काही विशेष नावाने ओळखले जायचे का ?? याचे काही उल्लेख आढळतात का ??

♨️धन्यवाद सर!

हे सातमहाल वगैरे लोकांच्या कल्पनेतूनच आलं असावं.

त्या हॉल चा शिवकाळात नक्की काय उपयोग होत असावा याबद्दल आज आपण काहीच सांगू शकत नाही. कारण कुठेही नोंदी नाहीत. आज आपण त्या मधल्या भिंती नंतरच्या काळातील आहेत हे आपण दोन्हींच्या दगडांवरून सांगू शकतो. बाकी नोंदी कुठेही नाहीत.

♨️इतिहास मुका असतो असतो हेच खरे.यासंबंधी भविष्यात जर काही उल्लेख वाचनात अथवा प्रकाशात आल्यास ते उत्तरात अंतर्भूत करावे्त.

♨️ओंकार, तुमची उत्तरे फारच अभ्यासपूर्ण आणि छान प्रकारे मांडणी केलेली असतात. हे उत्तर सुद्धा उत्तम होते. मात्र काही शंका होत्या, उदाहरणार्थ 1) महाराज पाचाडच्या किल्ल्यावर रायगडाहून जास्त काळ राहिले ह्याचा काही पुरावा उपलब्ध आहे का 2) तथाकथित राणीवश्याच्या मागील शौचालये ब्रिटिशकालीन असतील मग मराठाकालीन शौचालये कशा प्रकारची असत 3) ब्रिटिशांच्या अखत्यारीत रायगड बराच काळ होता, किंवा त्याआधीही मुघल आणि जंजिऱ्याच्या सिद्धी कडे किल्ला असताना कुठली बांधकामे त्यांनी केली आणि कुठली शिवकालीन ह्याचे काही समकालीन दाखले आहेत का? कारण ब्रिटिश हे उत्तम वास्तुशास्त्रज्ञ होते, त्यामुळे त्यांनी काही बदल केले असल्यास त्यांच्या नोंदीही त्यांनी नक्कीच ठेवल्या असतील. बाकी अतिशय माहितीपूर्ण उत्तर

♨️मलादेखील याच शंका आल्या आहेत.

♨️चला तुम्ही म्हणताय तस रायगडावर शौचालय इंग्रजांनी बांधली अस गृहीत धरलं तर राजगडावर सबंध तटबंदीमध्ये तंतोतंत तशाच प्रकारची शोचालयं आहेत. मग ती कुणी आणि कधी बांधलीत ? कारण महाराजांनतर राजगडावर तर कुठलाच इंग्रज अधिकारी खूप काळ वास्तव्यास असलेला माझ्या तरी वाचनात नाही ( असल्यास संदर्भ द्यावा ) आणि जरी असला तरी संपूर्ण तटबंदी नव्याने बांधणे जरा अवघडच वाटतय.

♨️ओंकार जी मला तुमचा खरंच खूप हेवा वाटतो, किती बारीक सारीक गोष्टी तुम्ही असं सांगतात की महाभारत मधील संजय सारखं तुम्हाला रायगडावर त्याकाळी घडलेल्या गोष्टी जणू काही डोळ्यासमोर दिसतात. म्हणजे राज्यभिषेक झाल्यानंतर तो हत्ती लगेचच मेला हे त्याचंच उदाहरण. दुसरं असं की तुम्ही एकदम स्पष्ट व परखड लिहितात, ते ही समकालीन पुराव्यासह, त्यात भर म्हणजे तुमचे तर्क ही मनापासून पटण्यासारखे च असतात. त्यामुळे मला तुम्हास इतिहासकार म्हणण्यात कसलीही अतिशयोक्ती वाटत नाही. तिसरं असं की जर तुमच्या सोबत रायगडावर जाण्याचा योग आल्यास माझ्या साठी सोन्याहून पिवळं. तुम्हाला मनापासून सलाम.

♨️सर अतिशय महत्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल धन्यवाद,विस्तारभयाचे विचार न करता सम्पूर्ण माहीती ध्यावी,अजून कुठे लिहीत अस्ल्यास किंवा whatsapp वर माहीती देत अस्ल्यास तो no ध्यावा प्लीज।।।

♨️पण त्या शिलालेखात गजशाळा असा उल्लेख दिला आहे मग रायगडावर गज शाळा होती का?

♨️आपण दिलेल्या माहितीचा काही स्रोत आहे का ?

♨️छान माहिती दिलीत दादाराव.. मला तो शिलालेख बद्दल अनुवाद घेतला तो कुठल्या पुस्तकातुन घेतला कळवाल का..?

♨️किल्ले रायगडावर असणाऱ्या लोहस्तंभाचे काय रहस्य आहे?

शिवाजी महाराजांच्या इतिहासातील रायगड असा किल्ला आहे ज्यावरील वास्तूंविषयी आज बरेच गैरसमज पसरवले आहेत. त्यातील एक म्हणजे हा लोहस्तंभ.

या लोहस्तंभविषयी आज ३ गोष्टी प्रचलित आहेत.

  1. हा स्तंभ संभाजी महाराजांचा मल्लखांब होता.
  2. हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.
  3. हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

या तीनही गोष्टी अतार्किक(illogical) आहेत.

  1. हा स्तंभ संभाजी महाराजांचा मल्लखांब होता.

= मुळात मल्लखांब कधीही लोखंडी नसतो. त्यामुळे हा तर्क इथेच पडतो. आणि तसाही हा मल्लखांब होता याचा कोणत्याही समकालीन कागदात उल्लेख येत नाही.

2. हा स्तंभ सुर्यघटी होती. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावरून दिवसा वेळ मोजण्याचे साधन.

= शिवाजी महाराजांच्या काळी वेळ मोजण्यासाठी घटिकपात्रे होती त्यामुळे असे स्तंभ उभारण्याची गरजच नव्हती. आणि जरी हा स्तंभ सूर्यघटी म्हणून बांधला असता तर तो रायगडावर होळीच्या मैदानातजिथे दिवसातून भरपूर वेळ ऊन असतं तिथे न बांधून इथे जिथे हिवाळ्यात अगदी १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडत नाही तिथे का बांधला?

3. हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा.

= मुळात हत्ती हा प्राणी डोंगरी गडावर आणला जायचाच नाही. कारण गड चढणीला कठीण असायचा आणि हत्तींना गडावरचे वातावरण सहजा झेपत नाही. राज्यभिषेकाच्या वेळी सुद्धा जो हत्ती गडावर आणला होता तो राज्याभिषेकानंतर लगेच १४-१५ दिवसांनी मेला. त्यामुळे 'हत्तींना बांधण्यासाठी या स्तंभाचा उपयोग व्हायचा' या तर्काचेही इथे खंडन होते.

  • तर मग हा स्तंभ कशासाठी वापरला जायचा?

याचे काही उल्लेख सापडत नाहीत परंतु आर्किओलॉजिस्ट्स च्या मते हा स्तंभ कैद्यांना बांधून त्यांना फटके मारण्याच्या कामात वापरला गेला असावा. आपण जर नीट स्तंभाकडे बघितलेत तर वरती एक कडं दिसतं त्या कडातून दोरी सोडली जायची आणि कैद्यांना त्या दोरीने बांधून फटके दिले जायचे.

एव्हढच काय तो या लोहस्तंभाचा उपयोग केला जाऊ शकत असावा.


धन्यवाद ।

♨️हा लोहस्तंभ सैरा वैरा किंवा जास्त त्रास देणाऱ्या घोड्याला बांधण्यासाठी वापरला जाई । जेव्हा एखादा घोडा जास्त त्रास देत असे तेंव्हा त्याला शांत होण्यासाठी ह्या स्तंभाला बांधले जाई ।

(हा लेख संतोष काशीद यांचा आहे)

रायगड वरील लोहस्तंभ : या बाबाबत निरनिराळे मतप्रवाह आहेत.कोण म्हणतं की ते लोहस्तंभ कोण म्हणतं की मल्लखांब कोण म्हणतं की घटिकायंत्र किंवा वेळ मोजण्याचे यंत्र.

दिल्लीतल्या लोहस्तंभाला " अगदी लक्ष देऊन जपले जात आहे. त्याच्या maintenance साठी करोड रुपयांचा खर्च पडत आहे. मायर या स्तंभ कडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.

हत्ती तलाव पासून जेंव्हा आपण हनुमान टाक्याकडे जातो तेव्हा स्तंभ पाहायला मिळतो.

दोन मीटर उंचीचा हा लोखंडी खांब असून याला " संभाजीची लाट " असेही म्हणतात.का म्हणतात ते माहीत नाही.त्यावर काही अक्षरे कोरलेली आहेत.

" दुर्गदुर्गेश्वर रायगड "मधे .घाणेकर गो.नि.दांडेकर यांनी काही दशकांपूर्वी पाहिलेली अक्षरं आता दिसत नाही.त्याचीबझिज झालेली आहे.

आपण या स्तंभाचा अभ्यास करतच आहोत तर ज़रा खोलात जाऊन केला तर अधिक योग्य होईल असे मला वाटते, म्हणून प्रथम आपण प्र.के.घाणेकर यांच्या वाचनात आलेली अक्षरे पाहू. ( रंगीत ठिपके म्हणजे त्याठिकाणी कोणतेही अक्षर सध्या दिसत नाही हे दर्शवितात. )

श्री 🔹🔹🔹🔹🔹🔹|| दे

ही 🔹🔹ज्नी 🔹🔹🔹🔹

मा 🔹|| U | ता व ज 🔹

न स ज🔹🔹🔹🔹 ज्या 🔹

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

आता आपण गो.नि. दांडेकर यांच्या वाचनात आलेली अक्षरं पाहू.

श्री 🔹🔹🔹🔹🔹🔹|| दे

ही 🔹🔹रो C 🔹🔹🔹उ नी

मी 🔹 || | मा र्न दी व ज

ज स ब ल ड्या 🔹🔹🔹🔹

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

अर्थात प्र.के.घाणेकर यांनी ही अक्षर पाहिलेला काळ आणि गो.नि.दांडेकर यांनी ही अक्षरं पाहिलेला काळ यात सुमारे ४० वर्षांचे अंतर आहे. यादरम्यान त्यावर असलेल्या अक्षरांची झीज झाली असणार हे नक्की. आजही याचे हळूहळूका होईना पण पोपड़े निघत आहेत. त्यामुळे ही अक्षर अधिकच अस्पष्ट होत आहेत.[1]

हा खांब नक्की कशाकरता या जागेवर उभारला गेला असेल, कोणी उभारला असेल, कोणत्या काळात उभारला असेल, यावर अजुन तरी इतिहास संशोधकांचे मतैक्य झालेले नाही. तसेच त्यावरील अक्षरे सुद्धा याबाबत आपल्याला निटशी माहीती देत नाहीत. यामुळे आजही याचं कोडं अनेकांना उलगडलं नाही.

या धातुशील्पाविषयी ( स्तंभाविषयी ) वेगवेगळ्या इतिहास अभ्यासकांची वेगवेगळी मते विचारात घेऊन आपल्याला याचा अभ्यास करावा लागेल.

१) " रायगड " या आपल्या पुस्तकात प.रा.दाते म्हणतात की, हा स्तंभ हा कोनत्यातरी राजाचा विजयस्तंभ असावा. तसेच याच्या माथ्यावर असलेली कड़ी ही, हा स्तंभ गड़ाखालून वर ओढ़त आणण्यासाठी केलेली सोय असावी असे विधान करतात.

(तसेच तत्कालीन " मावळी ताकद " पाहता गडावर हा स्तंभ आणणे इतकेही अवघड नसावे की तो ओढ़ण्यासाठी त्याला वर लोखंडी कड़ीची आवश्यकता भासावी.)

२) या खांबाविषयी आवळस्कर म्हणतात की, हा मल्लखांब असावा.

(पण अनेकांनी हे मत नाकारले आहे , कारण मल्लखांब लाकडी स्तंभावर खेळला जातो)

३) वि.वा.जोशी म्हणतात की, हा मल्लखांब आहे असे वाटत नाही कारण याच्या माथ्यावर असलेली कड़ी __ त्यामुळे हा ध्वजस्तंभाच्या काठीचा आधार असावा.

४) गो.नि.दांडेकर म्हणतात की याचा उपयोग हत्ती बांधन्यासाठी होत असावा.

५) चांदोरकर मात्र याला तत्कालीन वेळ पाहन्याचे साधन म्हणजे सूर्यघंटी/घटिकायंत्र/नक्षत्र दर्शक ई. नावाने संबोधतात.

६) ज्येष्ठ इतिहास संकलक श्री आप्पा परब मात्र याला ध्वजस्तंभाला आधार देणारा लोखंडी खांब म्हणतात.

७) तर, पुरातत्व खात्याने प्रसिद्द केलेल्या आपल्या " रायगड दर्शन " मधे मात्र हा रायगडवर होऊन गेलेल्या एखाद्या प्रसिद्द व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेला खांब आहे असे विधान केले जाते.

वरील सर्वच अभ्यासु व्यक्तींच्या मतांचा विचार करावयाचा झाल्यास आपल्या समोर काही प्रश्न उभे राहतात__

रायगडावर आशा किती सत्ता नांदल्या आहेत__? मुळात पाळेगारांचा हा डोंगर पुढे अनेकदा आपला मालक बदलत राहिला मात्र " शिवशाही " वगळता यावर एकही मोठी सत्ता नांदली आहे असे वाटत नाही. त्यामुळे हा एखादा विजयस्तंभ असल हे विधान पटत नाही.

हा स्तंभ मल्लखांब असणे तर दुरान्वयेही शक्य नाही कारण मल्लखांब हा शक्यतो लाकड़ी खांबावर खेळला जातो. शिवाय कोणत्याही मल्लखांबाला वरच्या टोकावर अशी कड़ी असणे संभवत नाही. याचे प्रयोजनच नाही ते.

तसेच हा ध्वजस्तंभ असेल असेही वाटत नाही कारण, मुळात ही जागा गडावरील बालेकिल्ला पाहता खुजी आहे. शिवाय नगारखाना हे गडावरील सर्वात उंच ठिकाण आहे. ध्वज लावला जाईल तर या यावरच. मग इथे ध्वजस्तंभ असणे हे अप्रस्तुत वाटते आहे.

बरं, याचा उपयोग हत्ती बांधावयास करत असावेत असे म्हटले तर, त्यावर अशी अक्षर कोरन्याचं प्रयोजन का केले असावे हेही कळत नाही.

चांदोरकर मात्र याला, खांबामुळे सूर्याची सावली पडल्यावर येणारा वेळेचा अंदाज आणि या स्तंभाच्या माथ्यावर असलेल्या कड़ी मधून दिसनारे तारांगण यामुळे याचा उपयोग नक्षत्र आणि वेळ मोजन्याचं साधन असे अनुमान करतात. पण त्यांच्या या मताला कोणताही सज्जड़ पुरावा देत नाहीत.

एखाद्या व्यक्तीच्या स्मरणार्थ असा खांब उभारला असण्याची शक्यता असली तरी, त्याला अजुन तरी निश्चित ऐतिहासिक दुजोरा मिळेल असे दस्तावेज उपलब्ध झाले नाहीत.

( अर्थात ही माझी आणि काही शिवप्रेमींचीही मते आहेत. )

पण असे असले तरी, हे धातुशिल्प म्हणजे केवळ रायगड़च नव्हे तर महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा आहे. याचा कालबद्ध इतिहास केव्हा उजागर व्हायचा ते होवो पण, याला जपले पाहिजे. याच्या समृद्ध ऐतिहासिक वारशाला जपले पाहीजे.

१ ) शिवतीर्थ रायगड - गो.नि.दांडेकर (१९६५ )

२ ) रायगड दर्शन - पुरातत्व खाते ( महाराष्ट्र शासन ) (१९८१ )

३ ) रायगड दर्शन दुर्मिळ पुस्तकांतून - संपादन, प्र.के.घाणेकर ( २०१६ )

४ ) दुर्गदुर्गेश्वर रायगड - प्र.के.घाणेकर (२००९ )

तळटीपा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट