हा ब्लॉग शोधा

शिवरायांचे अष्टप्रधानमंडळ

शिवाजीचे अष्टप्रधानमंडळ

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ


याचप्रसंगी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.

अष्टप्रधान संस्थेचा राज्याभिषेकविधींत समावेश करून तिला धार्मिक स्वरूप कसे देण्यांत आले हे शिवाजी महाराजांच्या उपलब्ध असेलल्या वर्णनावरून दिसून येते. राज्याभिषेकावेळी सिंहासनाच्या सभोवार हातांत सुवर्णकलश घेतलेले प्रधान आठ दिशांना उभे राहिले होते. पूर्वेला मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे हाती सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. दक्षिणेस सेनापती हंबीरराव मोहिते दुधाचा रौप्यकलश घेऊन उभे राहिले होते. पश्चिमेस रामचंद्र नीलकंठ पंडित अमात्य दही-दुधाने पूर्ण भरलेला तांब्याचा कलश घेऊन उभे राहिले होते, तर उत्तरेस छांदोगामात्य प्रधान रघुनाथ पंडितराव मधुपूर्ण सुवर्णकलश घेऊन उभे राहिले होते. त्यांच्या जवळ मातीच्या कुंभात समुद्राचे पाणी व महानद्यांचे पाणी भरून ठेविले होते. उपदिशांच्या ठायीं क्रमाने आग्नेयेला छत्र घेतलेले सचिव अण्णाजी दत्तो पंडित, सचिव, नैर्ॠत्यला पक्वान्‍नांची थाळी हाती घेतलेले सुमंत जनार्दन पंडित, वायव्येस चामर घेतलेले मंत्री दत्तो त्रिमल व ईशान्यला दुसरे चामर घेऊन न्यायाधीश बाळाजी पंडित उभे राहिले होते,.

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता, कर्तबगारीवर ठरवण्यात यावीत, असे सांगितले.

अष्टप्रधान मंडळातील मंत्री

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री होते.

  1. पंतप्रधान (पेशवा) : मोरोपंत त्रिंबक पिंगळेशिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर यांचा अधिकार चालत असे. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर यांना देखरेख ठेवावी लागत असे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागत असे यावरुन या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे.

  2. पंत अमात्य (मजुमदार) : रामचंद्र नीलकंठमंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल, परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या त्या महाल, परगण्यातील अधिकार्‍याकडून लिहून घेऊन तो तपासून बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम होते. तसेच लिहून तो तपासून महाराजांसमोर सादर करावा लागत असे. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन पगार होता.

  3. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व जाणार्‍या येणार्‍या पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते. शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी आज्ञापत्रे पाठवली जात. प्रत्येक आज्ञापत्र खलिता जाण्यापूर्वी त्यावर पंत सचिवांना लक्ष ठेवावे लागत असे. स्वराज्याचे सर्व दफ्तर सांभाळण्याचे कामही यांच्याकडेच होते. तसेच जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवावे लागत असे. पंत सचिवांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

  4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक. यांच्याकडे महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवण्याचे काम असे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

  5. सेनापती (सरनौबत) : हंबीरराव मोहिते. शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती. घोडदळ वळवून फक्त पायदळासाठी एक स्वतंत्र सेनाप्रमुख होता पण त्याचा महाराजांच्या मंत्रिमंडळात समावेश नव्हता. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींची हुकूमत चालत असे. त्याला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

  6. पंत सुमंत (डबीर) : रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रांना खलिते पाठविणे, परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती आणि सल्ला देणे ही कामे आणि परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे. पंत सुमंतांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

  7. न्यायाधीश (काझी-उल-ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम होते. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

  8. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-मुहतसिव) : मोरेश्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वान ब्राह्मणांचा सन्मान करणे, यज्ञ करणे, नियमित चालणार्‍या धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे, शास्त्रार्थ पाहणे ही यांची कामे असत. त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.


“प्रधान अमात्य सचीव मंत्री,
सुमंत न्यायाधिश धर्मशास्त्री,
सेनापती त्यात असे सुजाणा,
अष्टप्रधानी शिवमुख्य राणा” ।।


मंत्र्यांची नेमणूक करताना महाराजांनी अत्यंत दक्षता घेतली होती. व्यक्तीचे गुणदोष पाहूनच नेमणूक केली होती. एखाद्या प्रधानाच्या पश्चात त्याच्या मुलांना किंवा नातेवाईकांना ते या पदास लायक नसतांनाही केवळ ते मंत्र्यांची मुले म्हणून मंत्रिपद देण्यास महाराजांचा विरोध होता.

भारतातील महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याचा जयघोष केला. शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची कल्पना अतिशय व्यापक व प्रभावी होती. या कल्पनेमुळे निर्विकार पडलेल्या मराठी माणसाला चेतना मिळाली.

संस्थापक: शिवाजी महाराज
स्थापना: १६७४

संबंधित इमेज

संबंधित इमेज

संबंधित इमेज

संबंधित इमेज

संबंधित इमेज
संबंधित इमेज

संबंधित इमेज
संबंधित इमेज

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे

कारकीर्द

इ.स. १६५९च्या प्रतापगडाच्या लढाईत अफजलखानासमारल्यावर विजापुरी सैन्यावर मराठा फौजांनी हल्ला चढवला, तेव्हा मोरोपंत त्र्यंबक पिंगळ्यांनी सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व केले. फेब्रुवारी, इ.स. १६७१च्या सुमारास त्यांच्या सेनापतित्वाखालील मराठा फौजांनी मुघलांच्याताब्यातील पश्चिम खानदेश व बागलाण या प्रदेशांत चढाया केल्या.

इ.स. १६७२मधील उत्तर कोकणातील कोळी राज्यांविरुद्धच्या मराठा मोहिमेचे नेतृत्व पिंगळ्यांनी केले[१]. या मोहिमेत ५ जून, इ.स. १६७२ रोजी मराठ्यांनी कोळ्यांचा राजा विक्रमशाहाच्या सैन्याचा पराभव करत जव्हाराचापाडाव केला. त्यानंतर मराठा सैन्याने उत्तरेस रामनगराकडे कूच केले. मराठा आक्रमणामुळे रामनगराचा कोळी राजा सोमशाह परागंदा झाला. मात्र पावसाळा सुरू झाल्यामुळे व मुघल सेनापती दिलेरखानाच्या सैन्याची जुळवाजुळव सुरू झाल्याने पिंगळ्यांनी रामनगरातून माघार घेतली. सैन्याची पुन्हा जुळवाजुळव करून जुलै, इ.स. १६७२च्या सुमारास पिगळ्यांच्या सेनापतित्वाखाली मराठ्यांनी रामनगरचा मुलूख जिंकून घेतला.

राज्याभिषेकोत्तर पंतप्रधानपद

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे हे शिवाजीराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री होते. स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर त्यांना देखरेख ठेवावी लागे. महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी या नात्याने राज्यकारभार पंतप्रधानालाच सांभाळावा लागे, यावरून या पदाचे महत्त्व लक्षात येते. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन इतका पगार मिळत असे.

मोरोपंत पिंगळे यांच्यावरील पुस्तके

  • स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे (चरित्र, डाॅ. सदाशिव शिवदे)

संदर्भ

  1. ^ जदुनाथ सरकारशिवाजी ॲंड हिज टाइम्स(इंग्लिश भाषेत).


रामचंद्र नीळकंठ बावडेकर

रामचंद्र नीळकंठ बावडेकर उर्फ रामचंद्रपंत अमात्य(१६५०-१७१६) हे छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमलेल्या शिवकालीन अष्टप्रधानमंडळातील राजनीतीचे प्रत्यक्ष ज्ञान असलेले एक प्रधान होते. रामचंद्रपंत अमात्यांची साथ केवळ शिवाजीराजेच नव्हे तर संभाजीराजेराजाराम आणि ताराबाईंना लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलेली राजनीती अमात्यांनी आपल्या उत्तरायुष्यात लिहून काढली. तसेच कोल्हापूरचे छत्रपती संभाजी महाराज (दुसरे) यांच्या आज्ञेने त्यांच्या राजकुमारांना राज्यकारभाराचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 'आज्ञापत्र' हा ग्रंथ लिहिला..

बाह्य दुवे



विकिपीडिया

हम्बीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने "बाजी" हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी साम्भाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील सम्भाजी व धारोजी मोहिते यांचा सम्बन्ध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामील झाले. सम्भाजी मोहिते व धारोजी मोहिते त्या काळातील प्रराक्रमी सेनानी होते. त्यांच्या शौर्याची गाथा आदिलशाही फर्मानामध्ये पहावयास मिळते.

स्वराज्याच्या स्थापनेवेळी सम्भाजी मोहिते हे शहाजी राजेंच्या लष्करात सहहवालदार होते. तेे पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजाशी लावून दिला व भोसले घराण्याशी पुन्हा नाते निर्माण केले. पुढे सम्भाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणे हे छत्रपती शिवाजीचे अगदी जवळचे घराणे झाले.

यातील सम्भाजी मोहितेचा मुलगा म्हणजे हंसाजी ऊर्फ हम्बीरराव मोहिते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हंसाजी मोहिते यांना हम्बिरराव हा किताब देऊन आपल्या सेनेचे प्रमुख सेनापतीम्हणून नेमले. बहलोलखानाशी लढताना प्रतापराव गुजर २४ फेब्रुवारी १६७४ रोजी मरण पावल्याने हम्बीररावांची त्यांच्या जागी नेमणूक झाली.

महाराजांच्या द्वितीय पत्‍नी सोयराबाई या हम्बीरराव मोहित्यांच्या भगिनी होत्या. हम्बीररावांच्या कन्या महाराणी ताराबाई ह्या राजाराम महाराजांच्या पत्‍नी होत्या.

ज्यावेळी प्रतापराव पडल्याचे कळाले तेव्हा हम्बीररावांनी आदिलशाहीच्या सेनेवर जबरदस्त हल्ला केला.शत्रूला विजापूरपर्यन्त पिटाळून लावण्यात हम्बीररावांचे मोठे योगदान आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर मोगल सुभेदार दिलेरखान व बहादूरखान यांच्या छावण्यावर हल्ला करण्याचा आदेश हम्बीररावांना दिला. ही स्वारी यशस्वी करून त्यांनी खानदेशातील मोगलांच्या खानदेश, बागलाण, गुजरात, बऱ्हाणपूर, वऱ्हाड, माहूड, वरकड पर्यन्तच्या प्रदेशांत धुमाकूळ घातला. यानन्तर (सन १६७६) सरसेनापती हम्बीररावाने कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेनखान मियाणाचा येलबुर्गा येथे मोठा पाडाव करून त्याच्या जुलमातून रयतेची मुक्तता केली. सरसेनापती हम्बीररावांच्या तलवारीची कमाल या विषयीचे वर्णन बखरीतून आलेले आहे. (अशीच एक तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मन्दिरात आहे. तिच्यावर सहा चरे पाडलेले आहेत. त्या तलवारीवर ' कान्होजी मोहिते हम्बीरराव' अशी अक्षरे सोन्यामध्ये कोरलेली आहेत. याचा अर्थ असा की ही तलवार हम्बीरराव मोहित्यांची नसून हम्बीरराव 'किताब असणाऱ्या कान्होजी मोहिते नामक वीराची आहे. परन्तु जनमानसात असा समज आहे की ती तलवार 'सरसेनापती हम्बीरराव मोहिते' यांची आहे.)

हुसेनखानाला कैद करून सेनानी धनाजी जाधव व सरसेनापती हम्बीरराव मोहिते हे छत्रपतीना गोवळकोण्ड्यात भागानगर येथे येऊन मिळाले. यानन्तर महाराजांना आपले बन्धू व्यंकोजीराजें बरोबर सामोपचाराने चांगले सम्बन्ध निर्माण करावयाचे होते. मात्र व्यंकोजीची भेट यशस्वी झाली नाही. पुढे महाराजांनी कर्नाटकातील मोहीम आटोपती घेतली आणि ते महाराष्ट्रात आले. हम्बीरराव मात्र नन्तर सन १६७८ मध्ये महाराष्ट्रात आले.त्यानन्तर महाराजांनी लहान पुत्र राजाराम महाराजांचा प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईशी विवाह घडवून आणला. त्यानंतर अवघ्या दहा ते बारा दिवसांनी छत्रपती शिवाजीराजांचे निधन झाले. यावेळी हम्बीरराव कऱ्हाड परिसरात छावणी टाकून होते.

मोहिते घराण्याच्या इतिहासाला ज्ञात असलेला पुरुष म्हणजे रतोजी मोहिते .

शम्भूराजेंच्या पाठीशी खम्बीर मामा हम्बीर

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनन्तर सम्भाजी राजेंना छत्रपतीपदावर न बसविता राजाराम महाराजांचे मंचकारोहण केल्याची बातमी कळताच सम्भाजी राजांनी आपल्या सर्व किल्लेदार व अधिकारांना आपल्या पायाशी रुजू होण्याचे आदेश सोडले. हे आज्ञापत्र सरसेनापती हम्बीररावांनाही मिळाले होते. हम्बीररावांनी सम्भाजी राजांचीच सेवा करण्याचा निर्णय घेतला.

सम्भाजी राजेंच्या राज्याभिषेकानन्तर त्यांच्या आदेशानुसार विविध आघाड्यांवर हम्बीररावांनी आपला पराक्रम गाजवला त्यापैकी बऱ्हाणपूरच्या विजयात त्यांनी मिळवलेली प्रचण्ड लूट महत्त्वाची आहे. या विजयाने मोगलांची नाचक्की झाली. त्यानन्तर मोगल सरदार शहाबुद्दीनखान उर्फ़ गाजीउद्दीखान बहादुर याच्यावरील हम्बीररावांची स्वारी महत्त्वाची आहे. खान रामसेज किल्ल्याला वेढा देऊन होता, त्यावेळी हम्बीररावांनी त्याच्यावर हल्ला करून पराक्रम गाजवला. या वेढ्यात हम्बीरराव जखमी झाले होते. यानन्तर पुढे सम्भाजी राजांच्या आदेशानुसार भीमा नदीच्या परिसरातून मोगल सरदार कुलीचखान व पन्हाळा परिसरातून शहाजादा आज्जमला पिटाळून लावण्यासाठी हम्बीररावांनी शर्थीचा यशस्वी प्रयत्‍न केला. त्यानन्तर कल्याणजवळ रहुल्लाखान व बहाद्दुरखानाचा पराभव केला. सन १६८८ मध्ये रायगडाजवळ हम्बीररावांनी गाजीउद्दीन खानाबरोबर दोन हात केले या लढाईत मराठ्यांचे मोठे नुकसान झाले. यानन्तरच्या कालखण्डात खुद्द सम्भाजीराजेंच्या बरोबर अनेक मोहिमेत हम्बीररावांचा मोठा सहभाग होता. सरसेनापती हम्बीररावांची शेवटची लढाई झाली ती वाईजवळ. या युद्धात मोगल सरदार सर्जाखानाचा पराभव झाला परन्तु हम्बीररावांना तोफेचा गोळा लागून ते धारातीर्थी पडले.

या हम्बीरराव मोहिते यांची समाधी कऱ्हाड तालुक्यातील तळबीड (जिल्हा सातारा) येथे आहे.

केतकर ज्ञानकोशातील माहिती

त्यांचें मूळ नांव हंसाजी मोहिते असे असून इसवी सन १६७४ पावेतों हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या सैन्यांत पांच हजार फौजेवरील एक सरदार होते. परन्तु त्या वर्षी विजापूरच्या सैन्यावर शिवाजी महाराजाचे मुख्य सेनापति प्रतापराव गुजर तुटून पडले असतां त्यांच्या प्राणास मुकून त्याची फौज फुटली. तेव्हां त्याने पाठलाग करणाऱ्या शत्रूच्या सैन्यावर हल्ला करून मोगलांचा पराभव केला म्हणून शिवाजीने त्यावर खूश होऊन यांस 'हम्बीरराव' असा किताब दिला; व प्रतापरावाच्या जागीं यास सेनापति नेमलें. १६७५ सालीं हम्बीररावानें बऱ्हाणपुरावरून थेट माहूरपर्यन्त मोंगलांचा मुलूख लुटला, व भडोच जिल्ह्यातून खण्डणी गोळा करून सर्व पैका रायगडास सुरक्षित आणला. पावसाळा सम्पल्यावर तो पुन्हां मोंगलांच्या मुलुखांत शिरला व त्याचें बरेंच नुकसान केलें. पुढच्या वर्षी यादगिरीजवळ हुसेनखान मायणाचा पराभव केला व पुष्कळ लूट मिळविली. इ.स . १६७८ त छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकांतून महाराष्ट्रांत परत आले तेव्हां त्यांनी हम्बीररावास व्यंकोजीजवळ ठेविलें होतें. तेथें त्याची व व्यंकोजीची एक लढाई झाली होती. शिवाजी व व्यंकोजी यांच्यामध्ये तडजोड झाल्यावर हम्बीरराव मोठ्या त्वरेनें महाराष्ट्रांत यावयास निघाला. मार्गात त्यानें कृष्णा व तुंगभद्रा यांच्या दुआबांत विजापूरच्या सैन्याचा पराभव केला, व सर्व दुआब प्रान्त आक्रमण करून कित्येक बण्डखोर देशमुखांस वठणीस आणलें (१६७८). इ. स. १६७९ त शिवाजीनें मोंगलांकडे पळून गेलेल्या सम्भाजीचा पाठलाग करण्याकरितां याची रवानगी केली. परन्तु सम्भाजी दिलेरखानाच्या छावणींत पोंचल्याचें कळल्यावर यास विजापुराकडे मोंगलाविरुद्ध आदिलशहाच्या कुमकेस पाठविलें. कांहीं दिवसांनीं हम्बीररावानें मोंगल रणमस्तखान याला गाठून त्याचा पराभव केला. यानन्तर हम्बीरराव विजापुरास आला, व वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानाच्या सैन्याभोंवतीं घिरट्या घालून त्यानें मोंगलांच्या सैन्यांत अन्नाची इतकी टंचाई पाडली कीं, पावसाळा सम्पल्याबरोबर दिलेरखाननें विजापूरचा वेढा उठविला (१६७९).पुढें बऱ्हाणपुरावर हल्ला करून (१६८०) कोल्हापुराजवळ सुलतान शहाअलम याचा हम्बीररावानें पराभव केला (१६८०) इसवी स. १६८४ मध्यें औरंगजेबानें आपली छावणी अहमदनगरास आणल्यामुळें खानदेश प्रान्त मोकळा पडला आहे असें, पाहून हम्बीरराव अचानक वऱ्हाणपुरास गेला, व त्या शहरीं कित्येक दिवसपर्यंत खण्डणी गोळा करून तो मिळविलेल्या खण्डणीसह त्वरेनें परत आला. येत असतां वाटेंत त्यानें बऱ्हाणपूरपासून नाशिकपर्यन्त मार्गांतील सर्व प्रान्तांत चौथ-सरदेशमुखी वसूल केली. इ. स. १६८७ मध्यें हम्बीरराव व मोंगलांना सरदार सरझाखान यांची वाईजवळ लढाई होऊन तीत मोंगलांचा पराभव झाला. परन्तु या लर्ढाईंत हम्बीरराव घायाळ होऊन मरण पावला. (जेधे शकावली, मराठा रियासत भा. १; ग्रँट डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती प्रा.डाॅ. बाळकृष्ण माळी इतिहास विभाग, दयानन्द कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर.

हम्बीररावांविषयी पुस्तके

  • सेनापती हम्बीरराव मोहिते (चरित्र - लेखक डॉ. सदाशिव शिवदे)
  • जेधे शकावली, मराठा रियासत भाग १; डफ.) - केतकर ज्ञानकोशातील माहिती

चित्रपट

  • सरसेनापती हम्बीरराव मोहिते (दिग्दर्शक - प्रवीण तरडे). स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हम्बीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच २०२० साली रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयन्तीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.[१]

हेसुद्धा पहा

हंबीरराव मोहिते

  1. ^ "आरं!!! ज्‍याची तरवार खंबीर त्यो ह्यो हंबीर...वाचा InfoMarathi » Info Marathi"Info Marathi (इंग्रजी भाषेत)2019-08-11 रोजी पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पूर्वी दख्खनमधील औरंगाबाद सुभ्यात जुन्नर आणि कोकण हे भाग मोडत होते का? दख्खनचे सहा सुभे कोणते होते?

  मुघल काळात प्रांत/राज्यासाठी 'सुभा'  (Subah)  ही संज्ञा होती. 'सुभा' हा शब्द अरबी आणि पारशी भाषेतून आला आहे. सुभ्याचा प्रम...

इतर पोस्ट